पॅरा कमांडोज थोडक्यात ?

Submitted by Kiranjundre on 5 October, 2016 - 13:46

*पण पॅरा कमांडो म्हणजे काय?*

*सविस्तर माहिती*

काही दिवसांपुर्वी सर्जिकल स्ट्राइक युद्ध पध्दत भारताने आजमावली त्यामधे पॅरा कमांडोनी सहभाग केला होता. ज्या भागात दिवसा सरल चालता येत नाही. त्याभागात अमावस्या च्या रात्री पूर्ण काळोखात एकही जवान जखमी न होता पॅरा कमांडो नी सर्जिकल स्ट्राइक पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडली..
*पण पॅरा कमांडो म्हणजे काय? ते खुप कमी लोकांना माहित आहे.*

बटालियन नाव -
*5 पॅराशूट कमांडो रेजिमेंट*

संक्षिप्त नाव - *पॅरा कमांडो फ़ोर्स*

बटालियन टाइप - *इंडियन स्पेशल फ़ोर्स*

ब्रिदवाक्य - *बलिदान* (अंदर घुसो, नेसनताबुत करो और कुत्तो को मार डालो)

युद्धघोषणा -
*हर हर महादेव,*
*मुश्किल वक्त कमांडो सख्त*

ओळख - *injured Tiger*

मुख्यालय - बेंगलोर व पुंछ सेक्टर (जम्मू व कश्मीर)

कर्नल ऑफ़ द रेजिमेंट - ले. जनरल पी.वी.एम बक्शी

पात्रता - NDA मधून सायन्स पदवी उत्तीर्ण, आर्मी मधे 4 वर्षाचा अनुभव

ट्रेनिंग कालावधी - 2.5 वर्ष फिजिकल व 1 वर्ष मेंटली

सहभाग - 1961. 1977, 1999 चे कारगिल युद्ध, ऑपरेशन ब्लैक टोरनेडो(मुम्बई 26/11), ऑपरेशन इसराइल,
ऑपरेशन वोल्केनो,
ऑपरेशन श्री लंका,
ओपेराशन चिता,
ऑपरेशन ध्रुव,
ऑपरेशन फ़ोर्स,
ऑपरेशन सर्जिकल स्ट्राइक, ऑपरेशन वेंगा,
ऑपरेशन जैश मोहम्मद, ऑपरेशन Z,
ऑपरेशन ब्लैक कैट, ऑपरेशन NSG,
ऑपरेशन म्यानमार,
ऑपरेशन किलिंग ड्रैगन अदि 200+ ऑपरेशन केले आहेत.

दरवर्षी 150 जण सहभागी होतात . त्यातून फक्त 15 जनांची निवड पॅरा मधे केली जाते. काही ट्रेनिंग सोडून पळून जातात तर काही नापास होतात.

अस मानलं जातं की एक पॅरा कमांडो दर दिवशी 150 किमी रनिंग करतो.

जवळ जवळ 50 किलो वजन, 1 एके 47, 2 पिस्तौल, 8 हंडग्रनेड, 5 किलो बुलेट प्रूफ जैकेट घेऊन 50 किलोमीटर ची चढाई करतो व् तेवढी खाली उतरतो.
ईथे आम्हाला स्कूल बैग घेऊन नीट चालता येत नाही.

पॅरा कमांडो वर कोणती परस्तिथि केव्हा येईल सांगता येत नाही . त्यामुळे त्याला दररोज वेगवेगळ ट्रेनिंग दिलं जातं.
त्यामधे - 20 तापमानाच्या पाण्यामधे 10 min पाेहतो.

कंबरे एवढ्या चिखलामधे रांगत जातो.

दररोज 150 किलोमीटर पळतो.

8 दिवस झोपु दिल जात नाही. 3 दिवस पानी दिल जात नाही. 6 दिवस अन्न दिल जात नाही

जेव्हा एक कमांडो 150 किलोमीटर पळून येतो. तेव्हा त्याला साप, बेड़की, विंचु, कोणत्याही जनवराचे माँस खायला दिल जातं तेही कच्चं.

जेव्हा त्यांना 8 दिवस झोपु दिलं जात नाही. तेव्हा त्याना H.D Firing ला सामोर जावं लागतं H.D fire म्हणजे 8 दिवस झोपलेले नसताना. आपल्याच साथीदाराला समोर ठेवलं जातं व त्याच्या साइड ला टारगेट ठेवलं जातं. त्यावर फायरिंग करायच असते. त्यावेळी खरी बन्दूक व खऱ्या बुलेट वापरल्या जातात.
तोहि समोरून फायरिंग करत असतो.
यामागेही विशिष्ट कारण आहे. कोणत्याही युद्धजन्य परस्तिथी मधे समोरासमोर येऊन फायरिंग करायची वेळ जर आली तर आपल्या साथीदारला नुकसान न होता मिशन पूर्ण व्हावे म्हणून ही पद्द्त वापरली जाते

आजपर्यन्त चा इतिहास आहे. ज्या मोहिमेमधे पॅरा कमांडो सहभागी आहेत ती मोहीम भारताने केव्हाच हरली नाही.

पॅरा कमांडो 2.5 वर्ष ट्रेनिंग असतं. व 1 वर्ष मेंटली..मेंटली ट्रेनिंग म्हणजे त्याला पूर्णपणे feeling less केल जातं.
तो काहीच बर-वाइट समजत नाही. समोर येईल त्याला मारायचं. मग तो कोणीही असो.

त्यांच महत्वाचं काम म्हणजे विमानामधुन पैराशूट परिधान करुण उडी मारने व् पैराशूट मधून जेव्हा ख़ाली उतरत असतो. तेव्हा खाली फायरिंग करत येणे. ह्यमुळेच आपण 1961 1977. व् 1999 चे कारगिल युद्ध जिंकले आहे

महत्त्वाचे यातल्या बय्राच गोष्टी मुद्देसुद वाटत नाहीत
यातले खरे कितपत आणि खोटे कितपत जाणुन घेण्यासाठी ही पोस्ट टाकली आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहिती व्यवस्तीत मांडाय हवी होती, तसेच माहिती अपूर्ण आहे. Operation कुकरी वाचा, हे एक अतुल्य शौर्य आणि प्लँनिंग च उदाहरण आहे 2 para SF च.
https://en.m.wikipedia.org/wiki/Operation_Khukri

लेखातील बऱ्याच गोष्टी चुकीच्या वाटतंयत, उदारणार्थ पात्रता, मांस भक्षण, रोज 150 किमी पळणे, मुख्यालय इत्यादी. कदाचित माझी माहिती जुनी/चुकीची असेल तुम्ही वाचलेली लिंक द्या वाचाय आवडेल. अधिक माहिती खाली
https://en.m.wikipedia.org/wiki/Para_(Special_Forces)

150 किमी रोज पळणे म्हणजे तर कहर आहे. ट्रेनिंगचा भाग म्हणून 150 एका स्ट्रेच मध्ये पळणे आणि रोज पळणे यात फरक आहे.

अहो शीर्षक बघा, त्यात प्रश्नचिन्ह आहे. धागाकर्त्याला विचारायचे आहे की पॅरा कमान्डोज म्हणजे हेच काय? Happy

अहो शीर्षक बघा, त्यात प्रश्नचिन्ह आहे. धागाकर्त्याला विचारायचे आहे की पॅरा कमान्डोज म्हणजे हेच काय? >>>हा हा
*अंदर घुसो, नेसनताबुत करो और कुत्तो को मार डालो* हे ब्रीदवाक्य म्हणजे कहर च आहे.

त्यामधे - 20 तापमानाच्या पाण्यामधे 10 min पाेहतो. >> गोठत नाही का पाणी त्या तापमानाला ?

.मेंटली ट्रेनिंग म्हणजे त्याला पूर्णपणे feeling less केल जातं.
तो काहीच बर-वाइट समजत नाही. समोर येईल त्याला मारायचं. मग तो कोणीही असो. >> आं ? म्हणजे आपले अ‍ॅलायस जरी आले तरी मारणार ? मेड्युसा सारखं ?

"मेंटली ट्रेनिंग म्हणजे त्याला पूर्णपणे feeling less केल जातं.
तो काहीच बर-वाइट समजत नाही. समोर येईल त्याला मारायचं. मग तो कोणीही असो. " नि "कोणत्याही युद्धजन्य परस्तिथी मधे समोरासमोर येऊन फायरिंग करायची वेळ जर आली तर आपल्या साथीदारला नुकसान न होता मिशन पूर्ण व्हावे म्हणून ही पद्द्त वापरली जाते " ह्यात प्रचंड विरोधाभास आहे.

त्यामधे - 20 तापमानाच्या पाण्यामधे 10 min पाेहतो. >> गोठत नाही का पाणी त्या तापमानाला ?

>> -२० डिग्री सेल्शिअसला पाणी गोठलं तरी त्यात होल पाडून जंप करत असतील. पोलार बेअर डिप असते दरवर्षी आटोवाला १ जानेवारीला तेव्हा अशा जंप करतात लोकं. -२० विथ फील्स लाईक -३० होतं दोन वर्षांपूर्वी.

https://www.youtube.com/watch?v=XEtz9M1jv5k

हा डिस्क्व्हरी चॅनलच्या एका साद्यांत डॉक्युमेंट्रीचा व्हिडीओ , मॅसेज अन सत्य पडताळुन घेण्यात यावे ही नम्र विनंती.

सोन्याबापू, डिस्कव्हरीवरील या डॉक्युमेंट्रीमधला बर्फासारख्या थंड पाण्यात ज्यांना पॅरा कमांडो बनायचे आहे त्यांना जी परिक्षा द्यावी लागते तो भाग मी पाहिला आहे. बाकी डॉक्युमेंट्री आता तुनळीवर पाहता येईल. लिंक बद्दल धन्यवाद.