मिसळ - महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न!
सौमित्रच्या गारवावाली कुंद पावसाळी हवा असावी, आजूबाजूला हिरवाईनं नटलेला (अर्थ आपल्या सोयीनुसार घ्यावा) परिसर असावा, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात. मंद झुळुकेसोबत त्याक्षणाला केवळ ‘दैवी’च म्हणता येईल, असा खमंग सुवास सुटावा. क्षणभर डोळे मिटून आपण तो सुवास अनुभवत राहतोय, तोपर्यंत बाळू, पिंट्या, बारक्या असं ‘एरवीचं’ नाव धारण केलेल्या यक्षानं आपल्यासमोर, बादशहासमोर नजराणा पेश करताना आणतात त्या पद्धतीनं ट्रेमध्ये ठेवलेला, उसळीवर मुक्तहस्ते पेरलेल्या शेवफरसाणानं भरलेला चिनी मातीचा बोल, त्याच्यासोबत डोक्यात सुरू असलेले जगातले सगळे विचार तात्पुरते संपवायची ताकद असणाऱ्या रश्श्याचा भलाथोरला वाडगा आणि पांढर्याशुभ्र पावाची जोडी अवतीर्ण व्हावी. त्यासोबत नवपरिणीत वधूबरोबर पाठराखिणीसारख्या येणाऱ्या खमंग तळलेल्या भज्यांची प्लेट आणि अधमुर्या ताकाचा शुभ्र चषक पेश करावा.
आपण जगाचा विचार सोडून काठोकाठ भरलेल्या मिसळ-रश्श्याच्या बोलकडे आणि भज्यांकडे एकदा मन भरून बघत ‘चांगभलं’ म्हणत मिसळीवर ताव मारावा. ताकात चिमटीएवढीच मिठाची कणी घालत त्याचा पेला रिचवावा. 'प्लीज, रिटायर होऊ नकोस रे' अशी विनवणी करायची वेळ आणणाऱ्या गावसकरच्या बॅटिंगसारखी हुरहूर लावत, तरी समाधानानं योग्य वेळेत मिसळीच्या कार्यक्रमाची चवदार सांगता व्हावी. आणि कार्यक्रम न राहता तो मिसळीचा महोत्सवच होऊन जावा...
पुणे फूड फेस्ट सादर करत आहे - ‘पुणे मिसळ महोत्सव’, पुण्यात पहिल्यांदाच. तोही आमराईत.
इथे मिळेल हरतर्हेची मिसळ. गोडसर झाक असलेली पुणेरी मिसळ, कोल्हापूरची झटका देणारी मिसळ, नाशिकची चटकदार मिसळ, बिर्याणी स्टाईल ‘दम’ मिसळ, जैन मिसळ, १००% उपासाची आणि तरीही ‘तर्रीदार’ मिसळ. थोडक्यात, तुम्हांला जशी पाहिजे तश्शी मिसळ! सोबत कांदाभजी, वडे, चहा, कोल्ड कॉफी आणि वेगवेगळी डेझर्टस् तर आहेतच. शिवाय मनोरंजनाचे इतरही बरेच सुखद धक्के असणारेत.
तर पुण्यातल्या पहिल्यावहिल्या मिसळ महोत्सवात सहभागी व्हा, सिंहगड पायथ्याला अगदी खर्या निसर्गाच्या सान्निध्यात. मिसळीचा आस्वाद घ्या, ’टिपीकल’ हॉटेलात नाही, तर मस्त आंब्यांच्या झाडाखाली टेबल-खुर्चीचा जामानिमा मांडून.
नक्की या, कारण एकूणच 'चुकवू नये' अशा काहीपैकी असणार आहे सगळंच.
पुणे फूड फेस्ट आयोजित ‘पहिला पुणे मिसळ महोत्सव’.
आमराई, गोळेवाडी, सिंहगडच्या घाटरस्त्याला जायच्या आधीच उजवीकडे, पुणे - ४११ ०२५.
(मायबोलीकरांना सहज आठवण म्हणून - सिंहगडावरच तेरा वर्षांपूर्वी पहिल्यावहिल्या वर्षाविहाराची सुरुवात झाली होती).
दिनांक - ७, ८, ९ ऑक्टोबर, २०१६.
वेळ - शुक्रवार, दि. ७ ऑक्टोबर - सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
शनिवार, दि. ८ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
रविवार, दि. ९ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
अरे वा! कोणकोणते फेमस
अरे वा!
कोणकोणते फेमस मिसळवाले सहभागी आहेत इथे?
जत्रा होणार इथे....
जत्रा होणार इथे....
मिसळ महोत्सव वॉव!!!!
मिसळ महोत्सव वॉव!!!! पुणेकरांची मज्जा आहे.
कोणी लिहिलयं हे ? छान
कोणी लिहिलयं हे ? छान लिहिलयं.
मिसळ महोत्सवाची आयडिया भारी आहे.
वरचा मजकूर श्री. अंबर कर्वे
वरचा मजकूर श्री. अंबर कर्वे यांनी लिहिला आहे. तेच या महोत्सवाचे आयोजक आहेत.
माहितीबद्दल थँक्स चिनुक्स .
माहितीबद्दल थँक्स चिनुक्स .
अंबर मस्तच जाहीरात!! नक्की
अंबर मस्तच जाहीरात!! नक्की भेट देणार.
यात कोण कोण सहभागी होणार आहे याची पण माहिती दिल्यास आणखी जास्त प्रतिसाद मिळेल. शुभेच्छा!!
प्रस्तावना कसली छान लिहिलीये
प्रस्तावना कसली छान लिहिलीये नुसतं वाचूनच तोंडाला पाणी सुटलं!
अंबर आद्य माबोकरांपैकी एक आहे. म्हणजे हे घरचंच कार्य आहे, आपण सगळ्यांनी उचलून धरायला पाहिजे मिसळ महोत्सव.
Ek praamaNik prashna - एका
Ek praamaNik prashna -
एका वेळेस एक माणूस किती प्रकारच्या किती मिसळी खाऊ शकेल? महोत्सवात कितीही मिसळी असल्या तरी सगळ्या एकाच वेळी एंजोय कशा करता येतील?
नानबा, अनेकांच्या गृपने
नानबा, अनेकांच्या गृपने जायचं, प्रत्येकाने एकेक नमुना मागवायचा. मग प्रत्येकातली जराजराशी चव घ्यायची. हाकानाका!
शिवाय बेडेकर, काटाकिर्र, श्रीकृष्ण वगैरे फेमस मिसळी अनेकांनी आधीच खाल्लेल्य असल्याने या महोत्सवात न खाल्लेल्या मिसळी खायच्या! म्हणाजे असं आपलं मला वाटतंय.
नक्की येणार.आधी बुकिंग करावे
नक्की येणार.आधी बुकिंग करावे लागेल की डायरेक्ट आले तर चालेल.
चला एक मिसळ गटग करायच्चं का?
चला एक मिसळ गटग करायच्चं का? धागा उघडू का?
पिन्कि८०. आगाऊ नोंदणीची गरज
पिन्कि८०.
आगाऊ नोंदणीची गरज नाही. प्रवेश फी वीस रुपये प्रत्येकी आहे.
दक्षिणा,
मिसळ महोत्सवात गटग आहे, तर इथेच लिही.
*
महोत्सवात अस्सल कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ, दही मिसळ, जैन मिसळ, निखारा दम मिसळ, उपासाची मिसळ, नाशिकची स्पेशल मिसळ, दही बुत्ती, मटार उसळपाव, पियुष, सोलकढी, जामून शॉट, दाल पकवान आणि मस्ताना शॉट इत्यादी असतील. शिवाय कोल्ड कॉफी, खरवस, शनिवारी उपवासाचे थालिपीठ, सिंहगडावरचं खास मडक्यातलं दही ही आकर्षणं आहेतच.
टॅटू आर्टिस्ट, अक्षरगणेश (तुमच्या नावातून गणपतीचं चित्र), बलून स्कल्प्टिंग, बलून शूटिंग हेही मिसळ खाऊन झाल्यानंतर करमणुकीसाठी आहेत.
एका वेळेस एक माणूस किती
एका वेळेस एक माणूस किती प्रकारच्या किती मिसळी खाऊ शकेल? महोत्सवात कितीही मिसळी असल्या तरी सगळ्या एकाच वेळी एंजोय कशा करता येतील?>>
इच्छा असेल तर ३ दिवसात ६ प्रकारच्या मिसळे चापता येतील की.
>>अंबर आद्य माबोकरांपैकी एक
>>अंबर आद्य माबोकरांपैकी एक आहे. म्हणजे हे घरचंच कार्य आहे, आपण सगळ्यांनी उचलून धरायला पाहिजे मिसळ महोत्सव.>>> +१००
अंबर आणि मा. प्र., मिसळ महोत्सवासाठी तुम्हाला भरघोस शुभेच्छा!!!
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स..
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स............. मेरी फेव.. काटाकिर्र!!!!!!!! ती ही असणारे ना... दक्षु..माझ्या वाटची खाऊन्ये बरं ...
चिनुक्स - अरे या मिसळीचा
चिनुक्स - अरे या मिसळीचा स्वाद घ्यायला सगळ्या पुण्यातल्या मबोकरांनी एकत्र वेळ ठरवून जायचं का? अशासाठी धागा काढू का, असं विचारतेय.
वर्षु - नक्कि खाईन तुझ्या वाटची.
अरे भारीच. शुभेच्छा
अरे भारीच. शुभेच्छा महोत्सवाला.
दक्षे, सई माझ्या नावाने तिखट मिसळ खा ग थोडीतरी किंवा एखाद्या तिखट मिसळीसमोर उभं राहून माझं नाव घ्या . एन्जॉय. इतक्या लांबून यायला नाही जमणार.
सरमिसळ... स्मित
सरमिसळ... स्मित
अरे वा! भारीच आयड्या. आम्हाला
अरे वा! भारीच आयड्या. आम्हाला जमलं नाही तरी आमचे प्रतिनिधींना कळवते
मिसळ स्वप्नं पडायला लागली
मिसळ स्वप्नं पडायला लागली आताच! मैत्रिणींबरोबर यायचा प्लान ठरतोय. उपाशी मैतरणींना उपासाचे पदार्थ आहेत खायला हे फार छान आहे. महोत्सवाला शुभेच्छा व अशा प्रकारचा मिसळ महोत्सव पुण्यात आमराईत करावा या कल्पनेचे कौतुक!
मस्त रे, अंबर! पुण्यातल्या
मस्त रे, अंबर! पुण्यातल्या लोकांना कळवलेलं आहे
महोत्सवाला शुभेच्छा!
अंबर, बेस्ट लक. नक्कीच
अंबर, बेस्ट लक. नक्कीच प्रयत्न करणार यायचा!
व्वा:! ह्या महोत्सवाला नक्की
व्वा:! ह्या महोत्सवाला नक्की जाणार. मिसळपाव आणि उसळपाव ह्यांमधे फार गोंधळ होतो अजून. ह्या महोत्सवात सामील झाल्यावर तो गोंधळ नाहीसा होईल...
http://supersamir.blogspot.in
>>अंबर आद्य माबोकरांपैकी एक
>>अंबर आद्य माबोकरांपैकी एक आहे. म्हणजे हे घरचंच कार्य आहे, आपण सगळ्यांनी उचलून धरायला पाहिजे मिसळ महोत्सव.>>> +१००
अंबर आणि मा. प्र., मिसळ महोत्सवासाठी तुम्हाला भरघोस शुभेच्छा!!!>>>>>+१००००
काय मस्त कल्पना आहे.
काय मस्त कल्पना आहे.
महोत्सवाला शुभेच्छा ! जमल्यास
महोत्सवाला शुभेच्छा ! जमल्यास मुंबईतही आयोजित करा.
व्वा..!!! भारीच कल्पना...!!!
व्वा..!!! भारीच कल्पना...!!! महोत्सवाला शुभेच्छा.....
<<<जमल्यास मुंबईतही आयोजित करा.>>> अनुमोदन
मला जमले नाही तर निदान घरच्यांना तरी जायला सांगायला हवे...
महोत्सवाला शुभेच्छा ! जमल्यास
महोत्सवाला शुभेच्छा ! जमल्यास मुंबईतही आयोजित करा. >> +१
वा..मूळ धागा आणि त्यावरची
वा..मूळ धागा आणि त्यावरची चिनुक्सची पोस्ट वाचून मोह होतोय पुणे भेट द्यायचा.. माबो पुणेकर मंडळी कधी हजेरी लावणारेत? इथून काही फारसे लांब नाही पुणे.
Pages