सुरसुरी

Submitted by Poetic_ashish on 28 September, 2016 - 10:20

सुरसुरी सुरसुरी सुरसुरी अरे सुरसुरी सुरसुरी सुरसुरी,
गरागरा फिरते, फराफरा जळते, भिर्रकन वळते,
अशी ही फिरकी, कशी घेते गिरकी, जणू गाय मारकी,
हिला पाहीलं की येते तरतरी,सुरसुरी सुरसुरी सुरसुरी

घेउन आग तनात, देउन वेग मनात, नेउन रग जनात,
भागन् भाग दानात्,घेतली राख पदरात,उद्याची जाग उदरात,
हिला पाहीले की वाटे फूरफूरी,सुरसुरी सुरसुरी सुरसुरी

इतरांच्या सुखासाठी स्वतः भस्म होते, अनंतात विलीन होते,
क्षणिक आनंदासाठी पेटून ती घेते, आठवण फक्त उरते,
हिच्यासमोर फिकी वाटे जरतारी, सुरसुरी सुरसुरी सुरसुरी

कवी आशिष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users