विरक्त

Submitted by महेश भालेराव on 27 September, 2016 - 05:09

विरक्त

दुःखाशीच आता, खेळीत चाललो मी
काट्यांनीच आता , भाळीत चाललो मी

आता न गंध उरला, मजला मोहनारा
पायी रासी फुलांच्या, तुडवीत चाललो मी

जगण्यास वेदनांचे, हे व्यसन लागलेले
एकेक भाग माझा ,जाळीत चाललो मी

ओठावरी न हुंदका ,डोळा न ये पाणी
आधार भावनांचे ,टाळीत चाललो मी

आता न राहिले मज, कसलेच भय भारी
प्रारब्धाशीच आता , पाश आवळीत चाललो मी

महेश बाळकृष्ण भालेराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users