भान

Submitted by महेश भालेराव on 27 September, 2016 - 01:38

भान

आम्ही षंढ झालो, बुद्धीने मनाने
विचारांचे आम्हा, कुठे भान आहे ?
लक्तरे उडाली , स्त्री समानतेचि
तयाची आम्हा ,कुठे जाण आहे ?

संस्कृतीही नाही , प्रकृतीही नाही
विकृतीच आता, ओकतो कुठेही
होऊनि हिंस्त्र, पशुसारखे त्या
लाज अंतरीची, सांडतो कुठेही

कुठे सभ्यतेची, व्याख्या मिळावी ?
जावे कुठे , शोधण्या शील-नीती ?
ओरबाडून घेतो, हवे जे आम्हा ते
कोल्हे गिधाडयांना, आता आमुची भिती !

पुढे जायची जिद्द , कुठेही कसेही
खोडी लबाडी, आमुचे कर्म आहे
सदा नित्य सलगी, लोभ लालसे शी
लुटनेच आता ,आमुचा धर्म आहे

संवेदना, भावना शब्द केवळ
आस्तित्व त्यांचे, पुस्तकी कोंडलेले
मुके - बहीरे, आंधळे आम्ही आता
जगण्याने जगाशी, संबंध तोडलेले ….

महेश बाळकृष्ण भालेराव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users