Submitted by _आनंदी_ on 24 September, 2016 - 05:40
तर पिंक ..
बघितला खुप आवडला..अमिताभ मस्तच..
खासकरुन तापसी आवडली..खुप छान नॉर्मल अभिनय..
मला असं समिक्षण लिहिता येत नाही..पण बहुतेक इथे अजुन असा धागा आला नाही म्हणुन हा धागा
या चित्रपटातिल खास बाबी अनेक आहेत .. त्यातली एक म्हणजे
हिरोईन्स अगदी चांगल्या गुणी दाखवुन त्यांच्यावर असा अत्याचार झाला असं दाखवतात इथे हिरोइन्स नॉर्मल दाखवल्या आहेत ना उगाच खुप गुणी ना वाईट
तर बोला ...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तर बोला ... << चित्रपट अजून
तर बोला ...
<<
चित्रपट अजून पाहिला नसल्याने, No Comment.
हिंदी चित्रपटांत तीन प्रकारचे
हिंदी चित्रपटांत तीन प्रकारचे डायलॉग्स असतात
1. फक्त टाळ्या मिळवण्यासाठी लिहिलेले जेणेकरून टाळया अपेक्षित !!!
2. कारण जोहर सारखे "लार्जर दॅन लाईफ" म्हणजेच नायक-नायिका वगैरे वगैरेंचे महत्व जरा अतीच कौतुकणारे
3. आनंद किंवा छोटी सी बात यांच्यासारखे 'रियल लाईफ बेस्ड"
माझ्या मते "पिंक" पहिल्या कॅटेगरीत येतो हे नक्की
गुणी असतात की ग! स्वतः
गुणी असतात की ग! स्वतः कमावतात, घरच्यांना त्रास देत नाहीत उलट जमेल तशी घरच्यांना मदतच करतात, एकमेकीशी मिळून मिसळून राहतात, सैपाक करतात, व्यायाम करतात, बर्यापैकी स्वच्छ घर ठेवतात. अजून काय हवं?
(दारू प्यायली, बॉयफ्रेंड्स केले म्हणून लगेच 'नॉर्मल' का?
)
मला आवडला हा चित्रपट . तिन्ही
मला आवडला हा चित्रपट . तिन्ही मुलींनी छान काम केलीत.
मला ही आवडला हा चित्रपट...
मला ही आवडला हा चित्रपट...
>>हिंदी चित्रपटांत तीन
>>हिंदी चित्रपटांत तीन प्रकारचे डायलॉग्स असतात
1. फक्त टाळ्या मिळवण्यासाठी लिहिलेले जेणेकरून टाळया अपेक्षित !!!
2. कारण जोहर सारखे "लार्जर दॅन लाईफ" म्हणजेच नायक-नायिका वगैरे वगैरेंचे महत्व जरा अतीच कौतुकणारे
3. आनंद किंवा छोटी सी बात यांच्यासारखे 'रियल लाईफ बेस्ड"
माझ्या मते "पिंक" पहिल्या कॅटेगरीत येतो हे नक्की<< +१
संवाद आणि हाताळलेल्या मुद्द्याचे सादरीकरण आवडलं. कित्येक गोष्टी गृहित धरल्या जातात आणि त्यामुळे तसेच असंवेदनशील मनांमुळे एखाद्याची किती फरफट होते हे परिणामकारक दाखवलय.
सगळ्याच कलाकारांची कामं एकदम मस्त.
पण हा चित्रपट एक कोर्टरूम ड्रामा म्हणून कमी पडला असं वाटतय मला तरी.
निर्मात्याचा आणि दिग्दर्शकाचा
निर्मात्याचा आणि दिग्दर्शकाचा हेतु ध्यानात ठेवला पाहिजे. इथे कोर्टरूम ड्रामा हा उद्देश नाहीय. एकूणच भारतीय पुरुषांची एकट्या किंवा मिळवत्या आधुनिक मुलींकडे बघण्याची 'घाणेरडी दृष्टी' का नसावी, स्त्री स्वांतत्र्य म्हणजे पुरुषांना सेक्ससाठी एकदा 'हो' म्हटले तरी नंतर 'नाही' म्हणण्याचा मुलींना अधिकार आहे. आणि हेच मूलभूत स्वातंत्र्य आहे. त्याचा प्रत्येक पुरुषाने आदर केलाच पाहिजे (मग तो नवरा का असेना)
अमिताभ बच्चन त्या मुलीला तिने व्हर्जिनिटी कशी लूज केली ते विचारतो. त्यात तिची संमती होती. नंतर ही तिने कुणाशी 'स्वसंमतीने' संभोग केला. पण इथे ती 'नाही', 'नको' म्हणाली होती; तरी तिच्यावर जबरदस्ती झाली. आणि म्हणून तिने स्वसंरक्षणार्थ हल्ला केला हेच या चित्रपटाचे मर्म आहे. ती म्हणते ,"दुबारा उसने ये हरकत की, तो दूसरी आंख फोड दूंगी" हे स्वातंत्र्य तिला (म्हणजेच प्रत्येक स्त्रीला) हवं आहे.
चित्रपटाचा शेवट जबरदस्त आहे. अमिताभ म्हणतो, " She said 'NO' your honour. and NO means NO"
हे स्वातंत्र्य जर स्त्रीला नसेल, तर दुसर्या कुठल्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही!
जसे लहान मुलांचे आई वडिल
जसे लहान मुलांचे आई वडिल कौतुकाने आपल्या मुलांना - आइस एज, कुंग फु पांडा, फाइंडिंग निमो, हॅरी पॉटर सारखे मुव्हीज पहायला थिएटर्समधे नेतात तसे टीन एजर्स / अॅडल्ट मुलांच्या आई वडिलांनी त्यांना 'पिंक' दाखवायला न्यायलाच हवं. मुलांच्या संस्काराचा एक भाग म्हणुन.
चित्रपटाचा शेवट जबरदस्त आहे.
चित्रपटाचा शेवट जबरदस्त आहे. अमिताभ म्हणतो, " She said 'NO' your honour. and NO means NO"
हे स्वातंत्र्य जर स्त्रीला नसेल, तर दुसर्या कुठल्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही! >>>> Exactly
मला हा फार दवणीय वाटला
मला हा फार दवणीय वाटला
आनंद किंवा छोटी सी बात
आनंद किंवा छोटी सी बात यांच्यासारखे 'रियल लाईफ बेस्ड>>> पिन्क तिसर्या गटात येतो.
मला हा फार दवणीय वाटला>>> दवणीय म्हणजे काय? :अओ
हे स्वातंत्र्य जर स्त्रीला नसेल, तर दुसर्या कुठल्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही! >>> सहमत
जसे लहान मुलांचे आई वडिल कौतुकाने आपल्या मुलांना - आइस एज, कुंग फु पांडा, फाइंडिंग निमो, हॅरी पॉटर सारखे मुव्हीज पहायला थिएटर्समधे नेतात तसे टीन एजर्स / अॅडल्ट मुलांच्या आई वडिलांनी त्यांना 'पिंक' दाखवायला न्यायलाच हवं. मुलांच्या संस्काराचा एक भाग म्हणुन.>>>+१