शिवरायांना बाह्य शत्रूंनी जितका त्रास दिला तितकाच त्रास अंतर्गत शत्रूंनी दिला. भाऊबंदकीच्या शापाने शिवरायांनाही त्रास झाला आणि संभाजीराजांना त्याची अधिक झळ पोहोचली. इतिहासावर चिंतन करताना हा मुद्दा अनेक वेळा माझ्यासारख्या अनेक शिवप्रेमींचा मानसिक छळ करतो. शिवछत्रपतींनी अनेक वेळा आपल्या नातलगांना, आप्तेष्टांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. भाऊबंदकी मिटावी म्हणून प्रयत्न केला, पण वैरभाव संपला नाही. सर्वच शिवप्रेमींना या गोष्टीची खंत वाटते की आपला समाज राजांच्या हाकेस ओ देऊन एकीने का सामोरा गेला नाही. आज हे परिवर्तन घडत्येय. निमित्त कोपर्डीच्या चिमुरडीवरील अत्याचाराचे झाले आहे. त्यातून लाखोंच्या मनात खदखदणारा असंतोष म्हणा वा माझ्यासारख्या सामान्य माणसासारख्यांची ही जुनी नासूर होऊन छळणारी खंत बाहेर पडते आहे. जे काम शिवरायांच्या काळात होऊ शकले नाही ते आज होतेय असे होत असताना निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन बसणे योग्य वाटत नाही. कारण एकीकडे खंत व्यक्त करायची की मराठे कधीच एकत्र येत नाहीत, मराठे एकमेकाला सदैव पाण्यात बघतात, मराठे म्हणजे एकमेकाच्या अंगावर चढणारे खेकडे आहेत म्हणून हिणवायचे आणि प्रत्यक्ष अशी एकत्रित होण्याची पहिलीच ऐतिहासिक वेळ आल्यानंतर त्यातील दोष शोधत बसणे हा दुटप्पीपणा ठरतो.
आपसात बोलताना किंवा नातलगात मिरवताना 'अकरामाशी' वा 'बारामाशी' किंवा 'शहाण्णव कुळी' म्हणून एकमेकाला हिणवणारा हा समाज गेली कित्येक शतके खोटया जहागिरदारीच्या भ्रमात वावरत गेला आणि तळाशी असणारा समाजबांधव अधिक रसातळाला जात गेला. या मोर्च्यात जाणारे पिचलेले चेहरे आणि खंगलेले देह बघितले की कोणीही सांगेल की हा अल्पभूधारक शेतकरी आहे. एकमेकाला मदत न करणारा, सदैव वैरभाव जोपासणारा मराठा या प्रतिमेतून या समाजाचे मोठे नुकसान होत गेले. आज हे सगळे लोक कुळांचे आणि तथाकथित 'तोळ्या माशांचे' भेदभाव बाजूला ठेवून हे लोक एकत्र येताहेत ही बदलाची नांदी आहे. लग्न जुळवताना नात्यांतून 'पदर लागतो का पहा' असं सांगणारा ग्रामीण भागातला मराठा या निमित्ताने का होईना एकत्र येतोय आणि त्याच्या मनातली एकमेकाविषयीची अढी दूर होण्यास यातून सुरुवात तरी होईल अशी आशा या मोर्च्याच्या निमित्ताने दृष्टीपथात आली आहे.
मोठ्या प्रमाणात मोर्च्यात सामील होणारा महिलावर्ग आपल्या भाऊबंदासोबत जेंव्हा रस्त्या रस्त्यातून चालत जातो तेंव्हा महिलांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बदल घडवण्याची मानसिकता त्यातून तयार होऊ शकते. शिवाय स्वतःला एकटे समजून आपल्यावरील अन्याय अत्याचार सहन करणारया महिलांना आपल्या पाठीशी इतक्या मोठ्या संख्येने समाजबांधव उभे राहतात या गोष्टीने उभारी येईल. 'आपल्या सोबत इतके लोक आहेत आपण एकटे नाही' ही जाणीव किती समाधानकारक असते याचा अंदाज घ्यायचा असेल तर 'जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे'ची अनुभूती घ्यावी लागते. वर्षानुवर्षे ग्रामीण असो वा शहरी असो महिलांवर अत्याचार झाल्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांचा कल वेगळाच असतो- 'लोक काय म्हणतील', 'समाज काय म्हणेल', 'भावकी काय म्हणेल', 'आपल्या पाठीशी कोणी आहे का ?', 'मग मिटवून टाकू' किंवा 'थोडंसं गप्प राहू' या विचारांकडे त्यांचा कल असतो. झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याकडे फारसा कल नसतो. या मोर्च्याने महिलांमध्ये आणि सर्वच कुटुंबात ते धारिष्ट्य येण्याची सुरुवात होईल. शिवाय महिलांकडे वाईट नजरांनी बघणारया अपराधी तत्वांना जरब बसवण्यास काही अंशी का होईना सुरुवात होईल. महिलांच्या आत्मविश्वासास पूरक अशा या ऐतिहासिक एकत्रीकरणासाठी एका निष्पाप कळीला अमानुषपणे अकाली खुरडले जावे लागले ही बाब येथे नजरेआड करून चालणार नाही.
मराठा शेतमजूर आणि कष्टकरी वर्ग जो आजवर नागवला गेला. ज्याचे भयंकर शोषण झाले. ज्याला ठाऊक आहे की, 'आजवरच्या काळात सर्वच राज्यकर्ते आपल्याला फसवत गेले आपल्याला जातीच्या प्रलोभनाच्या आधारे मत मागत गेले आणि त्यांनी दाखवलेल्या स्वप्नांना आपण भुलत गेलो. आपल्याला कोणी त्राता नाही' हे त्याने आज ताडले आहे म्हणूनच तो आज रस्त्यावर उतरला आहे. यामुळेच की काय या मोर्च्याच्या मागे अमुक एक राजकीय पक्ष, संघटना वा राजकीय व्यक्ती आहे हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. भलेमोठे राजकीय प्रकांडपंडित देखील यात डोकावून पाहताहेत आणि आपापला अंदाज बांधून ते ज्यांच्या दावणीला बांधलेले असतात त्याप्रमाणे पोपटपंची करून आपला पोकळ अंदाज व्यक्त करताना आढळून येताहेत. सकल समाज बांधव जो आजवर अनेक खोट्या भ्रमात होता की आपणच सत्तधारी आहोत त्याने आज ओळखले आहे की, 'आपल्यापैकी काही मुठभर लोक पुढे गेले आपण आधी होतो तिथेच आहोत.' कित्येक दशकांपासून निद्रिस्त असलेल्या या समाजात ही जागृती येणे आणि त्या अनुषंगाने त्याचे एकत्र येणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे.
लोकांनी पदरमोड करून मोठा निधी उभा करून काढलेले लाखोंच्या संख्येचे हे मोर्चे त्यांच्या मनातली धग जाणवून देतात. जो समाज आपसातच कुणी 'अरे' म्हटले की निमिषार्धात त्याला 'कारे' म्हणतो तो समाज इतक्या शांततेने एकत्र येतोय ही देखील एक अनोखी घटना आहे. कारण भडक डोक्याचे, संतापाने सरकलेले, गुढघ्यात मेंदू असलेले, क्रोधिष्ट अशी मराठा समाजाची प्रतिमा आजही आहे. त्या समजाला आज आरपार छेद देणारा सर्वव्यापक बदल घडत असताना त्याकडे बघ्याच्या दृष्टीकोनातून पाहणे खचितच योग्य नव्हे. समाजमनाची ठेवण बदलण्यास सुरुवात करणारा हा मोर्चा या अर्थाने मला जास्त क्रांतिकारी वाटतो. कारण 'बांधावरच्या भांडणापायी आपल्या आप्तेष्टांचा बळी घेणारा मराठा'च लोकांना माहिती आहे, पंचवीस लाखांवर लोकं जमूनही खाली मान घालून चालणारा मराठा लोकांना पहिल्यांदाच पहायला मिळतोय हा अमुलाग्र बदल क्रांतीच्या बीजांची पेरणी नव्हे का ?
मराठयांची देवस्थाने असो लग्नकार्ये असो एक अजागळपणा, बेशिस्तपणा आणि अस्वच्छता यांचा त्यातून प्रत्यय येत राहतो. या मोर्च्याच्या निमित्ताने शिस्त, शांतता आणि स्वच्छता याचे पाठ हा समाज जगाला घालून देतोय ही नवलाची बाब आहे. या बाबी मराठयांच्या अंगी रुजल्या तर त्यांच्या सार्वजनिक जीवनात देखील मोठे बदल घडू शकतील. हा मोर्चा झाला की लगेच अनेक स्तरांवर क्रांतिकारी बदल घडतील आणि मराठा लगेच बदलून जाईल असे मी म्हणत नाही. कारण या गोष्टी वैयक्तिक सामाजिक व प्रादेशिक स्थित्यंतराच्या आहेत त्या एका रात्रीतून घडणारया नाहीत. मात्र त्यांची कधी कुठेच सुरुवात झाली नव्हती ती या मोर्च्याच्या निमित्ताने होते आहे. हा बदल चांगलाच आहे.
या मोर्च्यात आजवर कुठलीही नुकसानी वा हानी झालेली नाही. आजवरचे मोर्चे पाहता भविष्यातील मोर्चे देखील शांततेतच पार पडतील असा अंदाज व्यक्तवण्यास कुणा ज्योतिष्याची गरज पडणार नाही. 'या आधी मी अनेक हिंसक मोर्चे आंदोलनात भाग घेतला होता. आजच्या मोर्च्यात जाण्याबद्दल मी जितका विचार करतोय तेंव्हाच्या मोर्च्यात जाताना तितकाच विचार केला होता का ?' हा प्रश्न मोर्च्यात जाऊ का नको अशी शंका असणारया प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावा त्याला उत्तर सकारात्मकच मिळेल. ज्या मोर्च्यांनी कुठलेही नुकसान हानी न होता अनेक लहान मोठे बदल एका निद्रिस्त समाजात घडायला सुरुवात होणार आहे, त्या मोर्च्यात सामील झाल्याने राज्याचे, देशाचे कुठले नुकसान होणार नसेल तर त्यात सामील व्हायला हरकत नसावी.
मोर्च्यातील अनेक मागण्या संसद व न्याययंत्रणेशी संलग्न आहेत, काही मागण्या न पटणारया आहेत. काही मागण्या एकाच बाजूने योग्य वाटतात. तर एखादी दुसरी मागणी पूर्णतः पटते देखील. यातील काही मागण्या मनाला पटणारया नाहीत या गोष्टीची खंत मोर्च्यातून सुरु होणारया सकारात्मक बदलांच्या व्याप्तीपुढे थिटी पडते. मागणी योग्य का अयोग्य याचा अर्थ लावत बसण्याच्या नादात मराठा समाजातील क्रांतीकारी बदलांची नांदी ठरणारा आणि ज्या गोष्टीची शिवकालापासून प्रतीक्षा होती ती गोष्ट समोर घडत असताना त्यात सामील न होणे मला तर तर्कसुसंगत वाटत नाही. शिवाय हा मोर्चा कोणा एका जात धर्माविरुद्धही नाही असे असताना त्याला विविध कसोटया लावून त्याची अतिचिकित्सा करत बसणे सुज्ञता नव्हे. सकल मराठा समाजाच्या मोर्च्यात गेल्याने माझे काही मित्र मला जातीयवादी म्हणाले तरी मला फरक पडणार नाही कारण समाजात इतक्या मोठ्या परिवर्तनीय घटकांची लाट आलेली असताना त्यांचे मनोबल वाढवणे मी माझे कर्तव्य समजतो. शिवाय मी कसा आहे आणि माझ्या राजकीय, सामाजिक भूमिका काय आहेत याची धारणा पक्की आहे. ज्यांचा माझ्यावर विश्वास असेल ते माझ्या विचारांवर विश्वास ठेवतील. ज्यांना आज माझे विचार पटत नाहीत त्यांना ते नंतर तरी पटतील.
राजकीय,सामाजिक आणि वैयक्तिक बदल गावपातळीच्या मराठयापासून ते महानगरातल्या मराठयापर्यंत हळूहळू जेंव्हा घडत जातील तेंव्हा या मोर्च्याचे फलित आणखी उत्तम वाटेल. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे' असे संतांनी सांगितलेले आहे. शिवाय आज ज्यांना माझे म्हणणे पटत नसेल त्यांना नंतर कालमानानुसार ते सुसंगत आणि योग्य वाटेल म्हणून मी सकल मराठा समाजाच्या मोर्च्यात सामील होणार आहे. लाखोंच्या मराठयांच्या सुनामीतून त्यांच्या मनात दडलेले असंतोष, त्यांचे पिचलेले दुःख, त्यांच्या व्यथा यांचे काही थेंब जमलेच तर मनात साठवून ठेवणार आहे...
- समीर गायकवाड.
ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in/2016/09/blog-post_21.html

समीर, लेख अतिशय आवडला
समीर,
लेख अतिशय आवडला आहे.
मला या मोर्च्याचे खरेच कौतुक वाटत आहे.
तुमच्या नावानिशी काही मित्रांना फॉर्वर्ड करत आहे.
लेख खूप आवडला. तुमचा हा लेख,
लेख खूप आवडला. तुमचा हा लेख, आधी निघालेला एक धागा व गेल्या काही दिवसांत ह्या विषयावर वाचलेले / ऐकलेले असे सगळे मनात ठेवून पाहिले तर असे वाटते की मलाही ह्या मोर्च्याबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. आवडत आहे असा मोर्चा निघालेला.
त्याचवेळी असेही वाटत आहे की तुम्ही फक्त चांगल्या शक्यता वर्तवत आहात. ह्या संघटीत झालेल्या विशाल समूहाला स्वार्थासाठी आकर्षित करू पाहणारे राजकारणी पुढे काय करतील हे सांगता येत नाही असे वाटते. शेवटी गरीब माणसाला कुठूनतरी काही लाभ होत असला तर त्याचाही कल तिकडे वळू शकतो असे मनात येते. पण ते नंतरचे नंतर! सध्या एक शंका विचारतो, त्याचे तुमच्यामते उत्तर काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
असे मोर्चे निघण्याचे हे जे टायमिंग आहे त्या टायमिंगचे कारण काय? (कोपर्डी हे निमित्त वाटते, मूळ कारण वाटत नाही, म्हणून विचारले.)
धन्यवाद.
समीर गायकवाडजी, अतिशय समर्पक
समीर गायकवाडजी,
अतिशय समर्पक शब्दात सकारात्मकतेने आपण मांडलेली भूमिका आवडली.
अतिशय आवडला लेख!
अतिशय आवडला लेख!
खरच सुन्दर लेख.....अगदी
खरच सुन्दर लेख.....अगदी सहमत...!!!!
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला मोर्चा काढण्या
लेख आवडला
मोर्चा काढण्या मागची कारने वाचन्यात आली ती अशी-
Bhaiya Patil
19 सितंबर को 07:44 अपराह्न बजे ·
काही वाहिनीचे प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चाच्या 5 ते 6 मागण्या असताना केवळ एकाच मागणीला तेही चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत..
मराठ्यांचे मोर्चे फक्त आणि फक्त ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्यासाठी आहेत. असे बिंबविणे सुरु आहे..
मराठा क्रांती मोर्चाची अधिकृत मागणी ऍट्रॉसिटी कायदाचा गैरवापर रोखणे अशी असताना हे लोक मात्र चुकीची मागणी सारखी सारखी उच्चारत आहेत..
इतर मागण्यांवर कोणताही फोकस ते करत नाहीत..
मराठ्यांचे शांततेत होणारे मूक मोर्चे यांच्या डोळ्यात खपत असल्याने कशा प्रकारे वातावरण दूषित करता येईल यासाठी हे कार्य करत आहेत..
शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, स्वामिनाथन आयोग लागू करणे, अण्णासाहेब पाटील महामंडळ ला निधी इत्यादी मुद्द्यांना हे बगल देत आहेत..
नांदेडच्या मोर्चातील ब.मो.पुरंदरे यांचा पुरस्कार परत घेण्याची मागणी तर यांनी गायबच केलेली..
काही मीडिया प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चास बदनाम करण्याची सुपारी घेतल्यासारखे वागत आहेत..
मीडियातील वाटचुकलेल्या माझ्या मित्रानो कृपया मराठ्यांच्या मोर्चाना हिंसक वळण मिळेल अशा प्रकारे वागू नका.. शांततेत मोर्चे होत आहेत ते होऊ द्या यांना उचकावून देऊन तापवले तर यांचा पहिला वार तुमच्यावर असेल..
ज्या मागण्या आहेत त्याच दाखवा उगेच चढून बडून दाखवणे सोडा..
शिवछत्रपतींनी ..........पण
शिवछत्रपतींनी ..........पण वैरभाव संपला नाही
मला असे वाटायला लागले आहे की श्री शिवछत्रपति व पहिले बाजीराव यांच्या खेरीज इतरांना अखंड भारत, हिंदुत्व हे विचार फारसे समजले नव्हते, केवळ वैयक्तिक स्वार्थ, मानापमानाच्या गैर कल्पना, यातच सगळे गुंग होते. जातीपाती यांना फार महत्व देण्यात आले.
हे आता बदलते आहे ही चांगली गोष्ट आहे, मुसलमान हे भारतातले अविभाज्य घटक आहेत.
नि सर्व धर्म सहिष्णुता या चांगल्या गोष्टी आहेत. जर मराठा समाज आपआपसातले मतभेद विसरून एकत्र येऊ शकतो, तर त्यांच्या जोडीला इतरहि जाती त्यांच्या मोर्चात सामिल झाल्या नि कदाचित इतर धर्मीयसुद्धा, तर हिंदुत्व नाही तरी सर्व भारत आपला आहे नि त्यापुढे वैयक्तिक स्वार्थ महत्वाचा नाही हे समाजातील सर्वांच्या मनावर ठरेल व खरीखुरी लोकशाही होईल.
http://www.bbc.com/hindi/indi
http://www.bbc.com/hindi/india-37413202
महाराष्ट्र में सड़कों पर क्यों उतर रहे हैं लाखों मराठे
. . . . . खूपच आवडला हा
. . . . . खूपच आवडला हा बोधप्रद लेख. थोडक्यात म्हणजे ह्या मराठी क्रांती मोर्चांची ठोस अशी काहीच मागणी नाही. एका निद्रिस्त समाजाला स्वतःत काही लहान मोठे बदल घडवून आणायचे आहेत त्या परिवर्तनासाठीच हे मोर्चे निघत आहेत. त्या निमित्ताने हा निद्रिस्त समाज एकूण महाराष्ट्राला शांततामय मार्गाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे ह्यात वाईट काहीच नाही...
http://supersamir.blogspot.in
छान धागा. बेफि तुम्हाला
छान धागा.
बेफि तुम्हाला टायमिंगचे कारण खरच माहित नाही.
अतिशय समर्पक शब्दात
अतिशय समर्पक शब्दात सकारात्मकतेने आपण मांडलेली भूमिका आवडली. >>>>@नन्ध्या४३, आपणांस अनुमोदन.
लेख अतिशय आवडला अन मनापासून
लेख अतिशय आवडला अन मनापासून पटला
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख अतिशय आवडला
लेख अतिशय आवडला
लेख भावनिक वाटला. मोर्चा ज्या
लेख भावनिक वाटला.
मोर्चा ज्या कारणासाठी आहे ती कारणे न पटूनही (किंवा काहीच प्रमाणात पटून) त्या अनुषंगाने जे काही इतर बदल घडत आहेत ते चांगले आहे, म्हणून त्यात माझंही काही योगदान असावं म्हणून मोर्चाला जावे असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? चांगला विचार आहे.
याचा वापर तापल्यातव्यावर पोळी भाजून घ्यायला होऊ देऊ नका, तसा प्रयत्न तरी करा. येरे माझ्या मागल्या व्हायला वेळ लागत नाही. ज्योत पेटती ठेवा.
अमित, +१ मलाही लेख फॅक्चुअल
अमित, +१
मलाही लेख फॅक्चुअल पेक्षा भावनिक जास्त वाटला.
भारतात नसल्यामुळे बर्याचशा गोष्टींचा थेट संबंध येत नाही किंवा बर्याच गोष्टींचा थेट परीणाम होत नाही. पण भारताबाहेर राहून 'by looking at the bigger picture' काही गोष्टी गोंधळात नक्की टाकतात. कदाचित इथे उत्तरं मिळतील म्हणून इथेच विचारते.
भारताची जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल वगैरे गोष्टी आपण वाचतो. तर त्या दृष्टीनं आरक्षणाचा खरोखर किती फायदा होतो आहे? कुठल्या कुठल्या क्षेत्रात, किती काळासाठी, कोणते निकष लावून आरक्षण द्यायचे याचे काही नियम आहेत का? जात ही गोष्ट बाजूला ठेवू काही वेळ. त्यामुळे समाज एका पातळीवर येउन (or is this a wishful thinking?) मग समाजातल्या कुठल्या घटकांना आरक्षण दिले तर समाजाचा पर्यायानं देशाचा फायदा होईल असा विचार झाला आहे का? मराठा समाजाला समजा आरक्षण मिळाले तर फक्त ब्राम्हण हा समाज आरक्षणविना असेल का? जे प्रश्न मराठा समाजाचे म्हणून आहेत, ते बाकी सगळ्या चातुर्वर्णीय समाजांमधेही दिसतात. त्यांनाही या मोर्चांमधे सामिल होता येईल का? कृपया प्रामाणिक प्रश्न आहेत, पण सेंसेटिव्ह विषय असल्यानं कधी विचारले नव्हते. उत्तरांची उत्सुकता आहे.
अंजली आणि अमितव, सध्यातरी
अंजली आणि अमितव,
सध्यातरी मराठा मोर्चा केवळ आरक्षणासाठी नाही तर 'आम्ही सगळे एक आहोत, आमचे इतके इतके संख्याबळ आहे' हे दाखवायला आहे.
ज्या ज्या मराठा लोकांशी बोलले त्यांनी आरक्षण मिळावे हा मुद्दा नसून ओवरऑल आरक्षणाचा फेरविचार व्हावा आणि क्रायटेरिया बदलावेत अशी त्यांची मागणी आहे.
महत्त्वाचं हे वाटतं की गुजरातेतल्या पाटीदारांसारखं या मोर्चाला हिंसक वळण लागलं नाही तसंच अजूनतरी कुठला राजकीय नेता याचा फायदा/गैरफायदा घेताना दिसला नाही.
लांबून पहाताना एकाच जातीचं संघटन होतंय असं वाटतंय पण प्रत्यक्षात मराठ्यांतही कित्येक भेदभाव आहेत.
बरेचसे ऑलरेडी स्वतःला कुणबी म्हणवून ओबिसी आरक्षण घेतलेले आहेत.
सो इन लार्जर पर्स्पेक्टिव्ह हे एक चांगले संघटनही होऊ शकते.
शांतपणे संघटन कसे होऊ शकते याचा हा वस्तुपाठ होऊ शकतो.
साती, त्या मोर्चांच्या काही
साती, त्या मोर्चांच्या काही मागण्या नाहीत हे नक्की का? कारण फेसबुकवर एकजण आहेत, जे आपण या मराठा मोर्चांशी आणि मराठा प्रश्नांशी संबंधित असल्याचं म्हणतात. त्यांनी काही मागण्यांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या त्या पोस्टचा फोटो मी दुसर्या धाग्यावर दिला आहे.
आरक्षण हवं किंवा त्याच्या बेसिसचा पुनर्विचार, अॅट्रॉसिटी कायद्याचा पुनर्विचार या दोन मागण्या आहेत असं दिसतंय . आणखीही आहेत. प्रत्यक्ष मोर्चात मांडल्या जात नसतील, तरी त्यांबद्दल बोललं तर जातंय.
मोर्चाला जाणार्यांपर्यंत किंवा फॉलो करणार्यांपर्यंत फक्त संघटन हाच संदेश पोचला असेल किंवा कोपर्डी प्रकरणामुळे वाचा फुटलेला आक्रोश असेल ,असंही असू शकतं.
शेतीसंबंधी काही मागण्या दिसल्या नाहीत किंवा माझ्या नजरेतून आणि स्मरणातून सुटल्या असतील.
लेख वाचला, चांगला लिहिला आहे.
लेख वाचला, चांगला लिहिला आहे.

फक्त मराठा समाज आता "नांदेडच्या मोर्चातील ब.मो.पुरंदरे यांचा पुरस्कार परत घेण्याची मागणी तर यांनी गायबच केलेली.." या वीषवल्लीपासुन स्वतःस दूर कसा राखतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.
सो इन लार्जर पर्स्पेक्टिव्ह
सो इन लार्जर पर्स्पेक्टिव्ह हे एक चांगले संघटनही होऊ शकते.
शांतपणे संघटन कसे होऊ शकते याचा हा वस्तुपाठ होऊ शकतो>>> ह्म्म्म्म. पण मग एवढाच उद्देश आहे का मोर्चाचा? यानं काय साध्य होणार आहे? एकाच जातीचा मोर्चा काढला तर बाकी जातीही सिमीलर काहीतरी काढणार मग जातीय तेढ, एकमेकांमधली दरी वगैरे प्रॉब्लेम्स वाढणार नाहीत का? तसंच माझ्या बाकी प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत.
लिंबूटिंबूच्या धाग्यावर भरत यांचा आरक्षणासंबंधी प्रतिसाद वाचला. अगदी तटस्थ दृष्टीकोन ठेवून वाचले तरी काही गोष्टी पटल्या तर काही नाहीत. उद्या सकाळी लिहीन काही अजून प्रतिसाद आले त्यातून उत्तरं मिळाली नाहीत तर.
भरत, काही मागण्या नाहीत हे मी
भरत, काही मागण्या नाहीत हे मी लिहिलेले नाही.
केवळ आरक्षण एवढीच मागणी नाही असं लिहिलंय.
ज्या ज्या मित्रांशी बोलले त्यांनी हेच सांगितले.
समीरजी, चांगला लेख
समीरजी, चांगला लेख
लेख आणि प्रतिसाद दोन्हि
लेख आणि प्रतिसाद दोन्हि उत्तम,
जातीय आरक्षण बंद
जातीय आरक्षण बंद व्हावे.
श्रीमंतांचे पेमेंट आरक्षण वापरून ५६ % असताना डिग्री मिळवणारा .... त्याचे काय करायचे ?
जातीय आरक्षण बंद
जातीय आरक्षण बंद व्हावे.
श्रीमंतांचे पेमेंट आरक्षण वापरून ५६ % असताना डिग्री मिळवणारा .... त्याचे काय करायचे ?
लेख वाचताना चांगला वाटला तरी
लेख वाचताना चांगला वाटला तरी मलासुद्धा भावनिक वाटला.
दुसऱ्या धाग्यावर पण मी लिहिले होते, मराठा समाजाच्या म्हणून ज्या समस्या संगितल्या जात आहेत त्या " जात " स्पेसिफिक समस्यांपेक्षा पुर्णपणे शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटूंबांच्या ( त्यातही अल्पभूर किंवा कोरडवाहू दुष्काळी) समस्या आहेत. फारफारतर ओपन वाल्या शेतकऱ्यांच्या समस्या म्हणा.
मराठा समाज यानिमित्ताने एकत्र येतोय हे चांगलय असेही खूप जणांकडून ऐकलं आहे. पण हे एकत्र येवून आपापसातली तेढ वाढतेय कि काय असे वाटतंय. मला फेसबुक / ट्वीटरवर हे काही दिसले त्यात मराठा आणि नवबौद्ध दोन्हीकडचे लोक एकमेकांना शिव्याशापच देत आहेत.
शिवाय मुळात असं सगळ्यांनी आपापल्या जाती पुरतं एकत्र येणं पटत नाही ते वेगळंच.
नवबौध्द मराठा मधे काही तेढ
नवबौध्द मराठा मधे काही तेढ नाहिय असे कोणी दाखवत असेल तर तो खोटा प्रचार आहे सोलापुर व इतरही ठिकाणी मोर्चा आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करुन निघाला होता
(No subject)
विरामचिन्ह राहिली बघा.
विरामचिन्ह राहिली बघा.
Pages