प्रतिशोध भाग-दुसरा

Submitted by कविता९८ on 17 September, 2016 - 05:51

प्रतिशोध
भाग - दुसरा

"ओय , काऊ लक्ष कुठे आहे ग तुझं??
कॉफी थंड झाली..
हॉट कॉफी कशाला ऑडर केली मग "
जमेल तेवढ्या हळू आवाजात सियाल काव्याला ओरडत होता.
दर रविवारी यांचा कट्टा जमायचा..
आज काव्या आणि सियाल जरा लवकरच आले होते.
तोपर्यंत बबलु , श्रीकांत ऊर्फ श्री , संदेश ऊर्फ सँडी यांची स्वारी तिथे पोहचली.
बबलु : "काय रे कदम एरवी सांगतो की आमच्यात काही नाही आणि आज बरे दोघ ..
बोला तुम्ही ..आम्ही जातो..
आम्ही कशाला कबाब मे हड्डी.."

"अबे Bmc तु तर तसपण हड्डी सारखाच आहे..मांस आहे कुठे तुझ्यावर.."
सँडीच्या हातावर टाळी देत श्री उद्गारला.

बबलु : "मेल्यांनो public place वर तरी नीट नाव घ्या माझं..
बबलु महादेव चिंचोळकर आहे नाव माझं..
त्याच BMC केलात..
मालवणी शिव्या घालेन आता..
काव्या बघ तुझे मानलेले भाऊ इजतीचा फालुदा करत आहे बघ.."

"काऊ अगं बोल गं..
राग आला काय.."
काव्याला शांत बघून सँडी तिच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत बोलला.

"सकाळ पासून मौनव्रत घेतल आहे वाटतं..
परवा रांगोळी काढायला लेट नाईटला गेली.
मग काल मिरवणूक होती त्यात बिझी म्हणून ऑफलाईन होती अस वाटलेलं मला..
पण हिला tag करून बाकीच्यांनी तर पोस्ट केल्या आहेत..
मगास पासून विचारतोय की काय झालं ते सांग..
तरी शांतच.."
थंड झालेल्या कॉफीचा सिप घेत सियाल बोलला..
"मला काही झालं नाही पण कुमार दादा ......"
आतापर्यंत शांत असलेली् काव्या फक्त एकच वाक्य बोलली..
पण त्या एकाच वाक्याने सर्वांच्या लक्षात आलं की कुमार अजूनही आलेला नाही..

कुमार सोबत तर परवा राञीपासुन contact झाला नाही हे एकच सर्वांच्या मनात आल.
सर्वांच्याच फक्त काव्याला सोडून..
"सियाल तू काव्याला घरी सोड आणि लगेच कुम्याच्या घरी ये.
आम्ही आधी जातो तिथे.."
खुर्चीवरुन उठत श्री बोलला.

मी पण येते तुमच्या सोबत ...एवढं बोलून काऊ पर्स उचलून बाहेर निघाली सुद्धा.

स्थळ : कुमारचं घर

दारावरची बेल वाजवून झाली आता कुमारच आतून दरवाजा उघडेल अस वाटलेलं कारण काका काकी तर काही दिवस बाहेरगावी जाणार होते.
पण..
दरवाजा उघडला तो एका मुलीने..
त्या मुलीला बघून सर्व जण आश्चर्यचकीत झाले फक्त काव्याला सोडून..

"अनु तु??
तु पुण्यावरून कधी आली आणि आम्हांला सांगितल पण नाही.
Atleast सियाल ला तरी कॉल करायचा.मानलेला का होईना आहे तर भाऊच ना."
दरवाज्यावरच श्री बोलत होता..

"आत या.मग देते उत्तर."
चेहर्यावरची रेषपण न हलवता अनु बोलली.

सँडी : "कुमार कुठे आहे?"

अनु : "कुमार बद्दल आता आठवण आली का ?
हा..?
मिञ आहात ना तुम्ही त्याचे..
काव्या तु सांगितल नाही का यांना की तु काल रात्री येऊन गेली ते.
तुमच्यापेक्षा एक वर्षाने लहान असून ती भेटायला आली कुमारला .
तिला तेवढी समज आहे आणि तुम्ही कॉल तरी केला का.."

"काऊ तु येऊन गेली इथे?
मग आम्हाला कोण सांगणार हे?"
सियालने रागातचं विचारलेले प्रश्न ऐकून काव्या रडकुंडीला आली.
"हो.. मी आलेली काल इथे..
पण कस सांगितलं असतं रे तुम्हाला
की...
की कुमार दादाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.."

श्री : काऊ काहीपण नको बोलू..

" ती बरोबर बोलतेय..
कुमारच मानसिक संतुलन ठिक नाही..
त्याला सरप्राईज द्यायला आलेली मी..
पण हा काल सकाळी मी आल्यापासून विचित्र वागतोय.
रुममधुन बाहेर येत नाही.
माझा एक मित्र जो मुंबईतच आहे तो मानपसोचार तज्ञ आहे.
आता वर कुमार सोबतच आहे.
त्याला बोलवलं.
आई बाबाना अजून काही नाही सांगितल.."
हुंदका आवरत अनु बोलली..

अचानक एक ओरडण्याचा आवाज आला..
सर्व वर धावत गेले..
आणि
समोर जे होतं ते बघून काव्या आणि अनु किंचाळल्या..
कुमारच्या हातात रक्ताने माखलेली फुलदाणी होती आणि बेडच्या बाजूला डोक्यावर बसलेल्या घावातून येणार रक्त थांबवयाचा प्रयत्न करणारा अनुचा मित्र विशाल जवळ जवळ बेशुध्द होत होता.

कुमार : "ती ना याची मदत घेऊन मला मारणार होती.
मी...मी नाही घाबरत तिला..
अन ए हा मला मारणार होता.
ती परत आली.."

कुमारचा हा अवतार बघून घाबरलेल्या काऊने कसबस एकच प्रश्न विचारला
"कोण ती?
कोण आलं?"

"कस्तुरी...
सियालची कस्तुरी.."
कुमारने सांगितलेलं नाव ऐकून बबलु,सँडी,श्री आणि सियाल एकमेकांकडे बघायला लागले..

"सियाल तुझी कस्तुरी..?
कोण आहे ही कस्तुरी.."
राग , आश्चर्य , दुःख मिश्रित भाव चेहऱ्यावर घेऊन काव्याने विचारलं..

आणि सियाल फक्त एक वाक्य बोलून खाली कोलमडला..
"आहे नाही होती , माझी कस्तुरी.."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्सुकता वाढलीये.
पुढचा भाग टाका लवकर.
'कस्तुरी' खूप दिवसांनी वाचायला/ऐकायला मिळालं हे नाव

'कस्तुरी' खूप दिवसांनी वाचायला/ऐकायला मिळालं हे नाव>>>आधी हासिमच्या कथेत वाचल होत असणार..

भारी लिहीलंय कऊ!Waiting for next!>>>धन्यवाद पण ज्या डायरी मध्ये मी कथा लिहून ठेवते तिच गायब झाली... मग नंतर पुढे लिहायची इच्छा झाली नाही सो अशीच राहिली..पुढच्या रविवारी इथे नक्की पूर्ण करेन

कऊ, छान लिहीतीये.
@संशोधक, हासिम म्हणजे हासिम नागराल. फेसबुक वरील 'माय हॉरर एक्सपिरीन्स' या पेजचा एक जुना admin. खुप छान कथा असतात त्याच्या. कस्तुरी हे नाव त्यानं त्याच्या एका कथेत नायिकेसाठी वापरलेलं.

हा