बदफैली - भाग - 6 (अंतिम)

Submitted by निशा राकेश on 15 September, 2016 - 07:05

http://www.maayboli.com/node/60195

"अच्छा.. खरं बोलतोयस तु ...मग ती कोण होती....जिला तू मिठी मारत होतास...माझ्याकडे फोटो आहे तुमच्या दोघांचे ."

"काय....."

अपर्णाने लगेच ते तीनचार फोटो त्याच्या पुढ्यात फेकले....

त्यातला एक फोटो उचलून...."हा फोटो......ह्या फोटोतली ही बाई...त्यादिवशी हि बाई मी बसस्टोपवर उभा असताना जबरदस्ती माझ्या गळ्यात पडली....मला कुण्या वेगळ्याच नावाने हाक मारू लागली... नंतर सॉरी माझा गैरसमज झाला असं बोलून निघून गेली...पण त्यावेळी फोटो काढले कुणी..."

"कशावरून तू खरं बोलतोयस .."

"मी कशाला खोटं बोलू ....मला सांग हे फोटो कोणी काढले....आणि ह्या फोटोवरून तुला असं वाटतंय का कि माझं चारित्र्य ठीक नाहीये....पण तुझ्याकडे हे फोटो कसे आले..."

"मला हे फोटो सोहमने दिले ....त्याचा संशय होता तुझ्यावर ..म्हणून त्याने तुझ्यावर पाळत ठेवली....आणि तुला रंगे हात पकडलं...."

"कसलं रंगेहात ..... तो लफंगा माणूस ...ज्यांच्या नादाला तू लागलीयेस ...त्याने हे सगळं केलं..... माझ्यावर पाळत होतीना त्याची.. मग त्याला मी एकाच ठिकाणी दिसलो का त्या बाईसोबत आणि ती बाई कोण तीच नाव काय ...हे देखील माहित असायला हवं ना त्याला...... हे नाही विचारलंस तु....एक गोष्ट मला पक्की समजलीये.....ती बाई त्या सोहमनेच आणली होती.....तिला माझ्या गळ्यात पडायला त्यानेच सांगितलं.... त्यानंतर आमचे तसल्या अवस्थेचे फोटो काढून त्याने तुला दिले....हे बघ तुला जायचंय ना ..जा तू ...तुझं तोंड काळं कर ......पण मला बदफैली म्हणून नकोस....आणि चारित्र्याच्या गोष्टी तू मला शिकवूस नकोस..."

अपर्णा सुन्न होऊन सर्व ऐकत होती.....तिला कळत न्हवत ..कि अशोकच खरच कुणासोबत अफेयर आहे कि नाही....तिने सोहमला फोन केला.....तो फोन उचलत न्हवता .....शेवटी ती बाहेर पडली...आणि एका पब्लिक बुथवरून तिने सोहमला केला ..अननोन नंबर वरून आलेला फोन मात्र त्याने उचलला....

"सोहम...अपर्णा...बोलतेय...मला भेटायचंय तुला आत्ताच्या आता "

"अपर्णा ..काय झालं..अशोकच काही कळलं...आला ना तो घरी..."

"हो आला...मला त्याचसाठी भेटायचंय ....कुठे आहेस तू आता .."

"मी नाशिकला आहे....काय झालं काय पण...अशोक काय म्हणाला तुला...."

"तू नाशिकला कधी गेलास...तू खोटं का बोलतोयस....आणि मला सांग अशोक सोबत जी बाई होती त्या फोटो मध्ये....ती कुठे राहते मला घेऊन चल तिच्याकडे....तो मान्य नाही करत त्याच्या अफेयर बद्दल..."

"अपर्णा खरं सांगू का....मला माफ कर....मी चुकलोय....हवं तर शिव्या दे मला....मी खरच चुकलो...अशोकच कुठंच अफेयर वगैरे नाहीये ती बाई मीच पाठवली होती...मीच त्यांचे फोटो काढले आणि तुला पाठवले....मला अशोकबद्दल तुझ्या मनात राग निर्माण करायचा होता फक्त..."

"पण का ...कशासाठी.....का केलास तू असं ?"

" तुझ्यासाठी....तू हवी होतीस मला....पण तूला काही पटत न्हवत....म्हणून नाईलाजाने .मला हे करावं लागलं...."

"नाईलाज....कशासाठी ......फक्त मी हवी होते म्हणून.....शरीरसुखासाठी.....तुझ्या ह्या वासनेसाठी माझा संसार मोडलाय कळतंय का तुला.....तू काय केलंस हे.....तुझ्या सुखासाठी आमच्या दोघांच्या नात्याला सुरुंग लावलास तु..मी आता कुठल्या तोंडाने मी जाऊ अशोककडे....तो कसा स्वीकारेल मला....."

"अपर्णा...खरच मला माफ कर....पैशांच्या धुंदीत आणि तारुण्याच्या मस्तीत मला काहीच कळत न्हवत मी काय वागतोय....मी तुझ्याशी लग्न न्हवत करायच .."

"हो....फक्त वापरायच होत....किती नीच माणूस आहेस तू....तुला काय समजत होते मी...अरे तुझ्या सारख्या माणसांमुळे आम्हा बायकांची सर्व पुरुषांकडे बघायची दृष्टी म्हणूच तर बदलते....तुझ्या सारखी मानस म्हणजे समाजाला लागलेली कीड आहात....तू समोर अस्ता ना माझ्या..तर तुझं तोंड फोडलं असत मी थुंकले असते तुझ्या तोंडावर....आता जरा तरी शरम बाकी असेल ना तुझ्यात तर आयुष्यात मला कधीच तोंड दाखवू नकोस तुझं..."

अपर्णाने जोरात फोन आपटला....तिला खूप रडू येत होत.....काहीच सुचत न्हवत ....घरी कोणत्या तोंडानं जावं अशोकला कस समजवावं तिला काहीच कळत न्हवत....तेव्हढ्यात तिला एका नंबर वरून फोन आला...

"हॅलो...अपर्णा आई बोलतेय....कशीयेस बाळा.."

आईचा आवाज ऐकून अपर्णा खूप रडायला लागली....

"अप्पू..काय झाल...अशी रडतेय का तू,...सर्व ठीकेय...ना..."

"आई...तुझी खूप आठवण येतेय.....मी खूप मोठ्या संकटात सापडलीये.."

"नाही आई काहीच ठीक नाहीये ..आई...तुझी खूप आठवण येतेय.....मी खूप मोठ्या संकटात सापडलीये.. मला काहीच सुचत नाहीये मी काय करू...."

"तू आधी रडणं थांबावं बर.....मला नीट सांग काय झालय..."

अपर्णाने सर्व काही आईला सांगितलं....आईला देखील अपर्णाचा वागणं अजिबात आवडलं नाही...पण माणूस चुकतो...अपर्णा वाहवत गेली....एका चुकीच्या माणसाच्या आहारी गेली हे तिन समजून घेतलं....आई बोलली.."अपर्णा तुझी चूक झालीये कि नाही तू अशोकची मनापासून माफी माग...त्यालाहि तुझी गरज असणार.....जा बाळा डोळे पूस....आणि आता जे करशील जे आयुष्य जगशील ते स्वतःच्या बळावर कोणत्याही पुरुषच्या आधारावर नाही....अशोकने जर तुझ्यावर मनापासून प्रेम केलं असेल आणि त्याला हि तू मनापासून हवी अशील तर तो तुला नक्की माफ करेल..."

अपर्णा घरी आली....घर बाहेरून बंद होत ..अपर्णा तशीच दारात बसून होती..खूप वेळाने अशोक घरी आला....काहीसा थकल्यासारखं ..त्याचे डोळे सुजले होते ..जणू खूप वेळ रडत होता....अपर्णाला पाहताच त्याने तिला मिठी मारली...

" कुठे होतीस तू.....मला वाटलं तू परत नाही येणार आता....कायमची सोडून गेलीस मला ....कुठे कुठे शोधलं मी...."

"मला माफ कर अशोक....मी मुद्दाम नाही काही केलं....त्याने फसवलं मला "

"काहीच बोलू नकोस...मला कळलं सगळं.....तू गेल्या नंतर त्या सोहम म्हात्रेचा फोन आला होता....त्याने माफी मागितली आपली....आता पर्यंत जे घडलं ते सगळं त्याने सांगितलं....मी खूप तुझी वाट पहिली....तू नाही आलीस ....मला वाटलं तू तुझ्या जीवाचं काहीतरी बरंवाईट तर नसशील ना केलं...म्हणून कुठे कुठे वेड्यासारखा नुसता शोधत होतो...अपर्णा परत नाही हा असं वागायचं ...नाहीतर बघ..."

"मी वेडीये का अशोक.....मी खरंच स्वताला खूप सावरलं होत....तू बीझी असायचास त्यावेळी मी देखील स्वतःला कशाततरी कायम गुंतवून ठेवत होते ....पण त्याने तुझ्याबद्दल माझ्यामनात विष..."

"तो विषय नको आता...."अशोक ने तिला मधेच अडवलं..."आणि तुझी तक्रार असते ना मी तुला वेळ देत नाही सतत काम करत असतो....आता तुला सांगतोच तुला आठवतंय का काही वर्षांपूर्वी आपण डॉक्टर कडे चेकअप ला गेलो होतो...त्यावेळेस खरतर तुझे रिपोर्ट्स नॉर्मल न्हवते अपर्णा ..डॉक्टरने आपल्याला टेस्टट्यूब बेबीचा सल्ला दिला होता....ज्याचा खर्च लाखभर रुपये आहे ..आता .मला सांग मी कुणासाठी करत होतो हे सगळ"

"किती मूर्ख होते मी....तुला कधीच नाही ओळखू शकले..तू हे सगळं माझ्यासाठी करत होतास..आणि मी मात्र किती दुर्दैवी....तुझ्यासारखा माणसाला किती त्रास दिला...मला खरच माफ कर अशोक....."

अशोक ने अपर्णाला मिठीत घेतलं ...आणि म्हणाला."तू मला त्रास दिलास ना....आता तुला त्रास द्यायला कुणीतरी लवकरच तुझ्या आयुष्यात येईल.....आपण टेस्टट्यूब बेबीची ट्रीटमेंट ह्या महिन्यातच चालू करूया....मग राहशील बीझी संबंध दिवस"

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कथा आहे. छान लिहीलीत आणी चटकन पूर्ण केलीत. वाचकाला गुंतवुन इतक्या झपाट्याने कथा पूर्ण करणे सोपे नसते. तुम्हाला चांगले जमलेय. पुढे पण कथा आणी ललित लिहीत रहा.:स्मित:

वा. झपाट्याने पूर्ण केलीत. छान.. शेवट बाळ्बोध अन गुंडाळल्या सारखा वाटला,, पहिल्या काही भागांत ज्या आशा उंचावल्या होत्या त्यामानाने. असो.

अनघा + १०००००

सोहम सारखा चलाख माणूस , ईतक्या चटकन आपली चूक मान्य करेल असं वाटत नाही .

स्वस्ति
कदाचित सोहमने विचार केला की ही तर जाळ्यात फसणार नाही त्यापेक्षा हिला खर सांगून पळ काढू आणि दुसरा मासा जाळ्यात अडकवू..