हसतेस भारी तु जेव्हा........

Submitted by श्रीमत् on 13 September, 2016 - 03:27

एक प्रियकर आपल्या लाड्क्या प्रेयसीची एक झलक पाह्ण्यासाठी काळ, वेळ, स्थळ यापैकी कशाचीच तमा न बाळ्गता जीवाचा आटापिटा करत आहे. अशा अनेक प्रेमवीरांसाठी हे गानं समर्पित.

हसतेस भारी तु जेव्हा, जीव वरती खालती होतो.
मीलनाची उत्कट आशा, मीलनाची उत्कट आशा, II२II
दिन उगाच भटकत जातो.

हसतेस भारी तु जेव्हा.....

चनीदार खळी गालावर, अन मासोळीपर डोळे II२II
तु उगाच बघते जेव्हा, तु उगाच बघते जेव्हा,
जीव पार गांगरुन जातो.

हसतेस भारी तु जेव्हा.....

मुखदर्शन रोज घडावे, ही आस जीवाला मनभर II२II
तु मध्येच वाट बदलते, तु मध्येच वाट बदलते,
मी वाट चुकावे क्षनभर.

हसतेस भारी तु जेव्हा.....

तव स्मरता रोज तुला, मी, हा वेळ संपुनी जातो II२II
ही वेळच क्षणिक आहे, ही वेळच क्षणिक आहे,
मी रोज मला समजवतो.

हसतेस भारी तु जेव्हा, जीव वरती खालती होतो.
मीलनाची उत्कट आशा, मीलनाची उत्कट आशा,II२II
दिन उगाच भटकत जातो.

हसतेस भारी तु जेव्हा.....

श्री सलील कुलकर्णी यांच्या नसतेस घरी तु जेव्हा.. या चालीवर आधारीत.

समाप्त.

श्रीमत (महेन्द्र लक्ष्मण कदम)
https://shrimat.blogspot.in या संकेतस्थळावर प्रकाशित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users