मायबोली मास्टरशेफ - रायगड - मटार-मका, याम, बटाटा यांचे लसूणी कटलेट

Submitted by रायगड on 9 September, 2016 - 19:05

याम ब्रेड करण्याकरीता याम आणायला गेले. ते अर्थातच जास्त आणले. मग याम ब्रेड करताना फ्रीज उघडून काही-काही काढताना मटार-मक्याचं फ्रोजन पाकीट नजरेस पडलं. डोक्यात म, य, ब,ल चा बुभूत्कार चालू असल्याने सर्वत्र त्या अक्षरांचे पदार्थ शोधणं वा आपसूक दिसणं होत होतं. मग म्हटलं जास्तीच्या यामचे मटार-मका घालून कटलेट्स बनवूया. अजून एक रेसिपी झाली पाकृ स्पर्धेत पोस्टायला आणि गोड याम ब्रेडच्या पुढून-मागून खायला काहीतरी तिखट-चमचमीत नको? तिसर्‍या मुख्य घटकाकरीता omnipresent अश्या गुणी बटाट्याचा आधार होताच (बीटही चालले असते पण घरी नव्हते) आणि मग चौथाही पदार्थ घालूच की - म्हणत लसूणी कटलेट्स बनवूया ठरवले. एरव्ही कटलेटस मध्ये आलं-लसूण पेस्ट घालतो, यावेळी फक्त लसणावर भर देऊया - असा विचार केला.

तर साहित्य :

मुख्य :
का व टार - १ वाटी प्रत्येकी - थोडे वाफवून
याम - १ नग
टाटा - २ मध्यम
सूण पाकळ्या - ३-४ (मोठ्या) वा ५-६ (लहान)

इतर :

आमचुर पावडर - १ ते २ टी स्पून
गरम मसाला - १ ते २ टी स्पून
मीठ, साखर - चवीनुसार
तेल - शॅलो फ्राय करीता
हवा असल्यास रवा - कटलेट्स घोळवण्याकरीता

Click for the larger version.

कृती :

१. याम व बटाटे उकडून किसून किंवा हाताने मॅश करून घ्यावेत.
२. त्यात वाफवलेले मटार व मका घालावे. (पीठ होईल इतपत वाफवू नयेत. दाणे दिसावेत व लागावेत.)
३. लसून पाकळ्या बारीक चिरून घ्याव्यात. मी ते घरी एक लसूण कापायचं बारकं यंत्र आहे ते वापरलंय. तसंही ह्या गोष्टी आणून त्या मी नीट जपून सणासुदीलाच बाहेर काढते. ते काढलेलं यावेळी. (आयत्या वेळी सापडलं ही त्या गणोबाची कृपा!)) तो कापलेला लसून घाला.

Click for the larger version.Click for the larger version.

४. त्यात आमचुर पावडर, गरम मसाला व मीठ, साखर - आवडीनुसार घालावे.

Click for the larger version.

५. आवडत असल्यास थोडी कोथिंबीरही बारीक चिरून घालता येईल. (कोथिंबीर कापण्याचेही एक (उगीच) यंत्र आहे. पण कोथिंबीर संपली असल्याने त्याला सणासुदीलाही बाहेरची हवा दाखवली नाही!)
६. तर सर्व एकत्र करून कटलेटस वळून घ्या.

Click for the larger version.

७. तवा गरम करा आणि शॅलो फ्राय करून घ्या.

Click for the larger version.

सॉस (मॅगी हॉट अँड स्वीट मस्त लागतो) बरोबर गरमा-गरम खा!

तर दोन पदार्थ एकदम केल्याने जरा दमल्ये. तर आता पुढील स्वयंपाक घर भेट पुढील वर्षी गणपतीत! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, पर्र्फेक्ट म य ब ल... सुपर्ब कल्पना.. कटलेट्स पण यम्मी दिस्ताहेत...

कान्ट गो राँग विथ दीज इन्ग्रेडिएंट्स.. Happy

सणासुदीला काढायची यंत्रे.. Lol आणी ती जपून अश्या ठिकाणी ठेवणे कि नंतर आठवतंच नाहीत कुठे ठेवलीत ते...अगदी अगदी

छानच दिसतायंत कटलेट्स! ट्राय करणार नक्की!

याम म्हणजे नेमकं काय याबद्दल मी अजूनही गोंधळातच आहे! मी 'याम' म्हणून जे काही मिळतं शेंदरी कंद त्याचा पारंपारिक रताळ्याचा कीस करते. असो जे काही कंद आहे त्याचे आता असे कटलेट्सही करुन बघणार!

मी हे कटलेट्स केले..मस्त झाले.
मी केलेले बदल- उकडलेला बटाटा एकच होता त्यामुळे दोन याम व एक बटाटा वापरला. त्यामुळे का ते माहीत नाही पण मिश्रण जर्रासं ओलसर वाटलं पण रव्यात घोळवल्यावर कटलेट छान झाले. याम जास्त वापरल्याने यामचीच चव जास्त लागत होती..ती खूपच आवडली. आणि मी लाल तिखटही घातलं होतं. बाकी सगळी हीच रेसिपी फॉलो केली.
स्पर्धेच्या थीममध्ये बसवून लिहिलेल्या रेसिपीज काही वेळा ओढून ताणून बनवल्यासारख्या वाटतात पण ही रेसिपी एकदम परफेक्ट आणि वारंवार टी टाईम स्नॅक म्हणून करायला छान आहे. धन्यवाद रायगड!