जगाच्या पाठीवर मायबोली (प्रकाशचित्रांचा झब्बू - २) - समाप्त!

Submitted by संयोजक on 4 September, 2016 - 00:40

जगाच्या पाठीवर मायबोली

मायबोलीकर जगात सगळीकडे आहेत आणि त्यांनी जगभरात विविध ठिकाणी प्रकाशचित्रंही काढलेली आहेत. पण या खेळात असे फोटो टाकायचे आहेत, ज्यात ते ठिकाण आणि मायबोलीचा लोगो दिसतो आहे. मग तो टीशर्ट, टोपी , बॅग किंवा इतर कुठल्याही वस्तूवरचा मायबोलीचा लोगो असू शकतो. प्रकाशचित्र देताना ते ठिकाण कुठलं ते लिहायला विसरू नका.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे तुमच्याकडे असलेली मायबोली लोगो आणि ते ठिकाण दिसणारी प्रकाशचित्रं टाकणं अपेक्षित आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नये.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

उदा. इंडिया गेटसमोर मायबोली

20150325_153112.jpg
सौजन्य: वेमा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसबूकवर? नव्हे फेसबूकमधे मायबोली . पहा सापडतेय का?
maayboli-on-facebook-wall.jpg

प्रत्येक फेसबुक ऑफीसमधे एक भिंत असते तिथे ज्याला आत जाऊ दिले आहे तो कुणीही काहीही लिहू शकतो. हा फोटो मे २५, २०१६ ला काढला आहे. म्हणजे कुणी मायबोलीकर त्या अगोदरच तिथे येउन गेला आहे.
सॉरी इथे लोगो नाही. पण मायबोलीकर येऊन गेल्याची खूण आहे Happy

फेसबूक ऑफीस, केंब्रीज, अमेरीका.

अजय, दिसली की मायबोली. माईंडच्या खालीच आहे आणि पहिलं लक्ष तिथेच गेलं.
इकिया की आयकिया?

मला राहून राहून त्या फेसबुकच्या ऑफिसमध्ये मायबोलीचं नाव कोणी लिहिलं असेल याचं आश्चर्य तर वाटतंच आहे.. पण वेबमास्तरांना ते पाहिल्यावर कसं वाटलं असेल याचा विचार जास्त येतोय मनात.

सीअ‍ॅटल, युएसए, बीएमएम २००७. मायबोलीला बीएमएम चा विशेष पुरस्कार
P1010264.JPG
मायबोलीवर पूर्वप्रकाशीत (अ‍ॅडमीन ने मायबोलीचा लोगो असलेला टीशर्ट घातला आहे Happy )

शिकागो, बी एम एम २०११
chicago_bmm_2011.jpg

(मायबोलीवर इतरत्र पूर्वप्रकाशीत)

Pages