रंगावली श्रीगणेश - घोषणा

Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 15:42

​नमस्कार!

आपल्या मायबोलीवर वेगवेगळी कलाकौशल्यं अवगत असणारी भरपूर कलाकार मंडळी आहे. गणेशोत्सव हा सर्व कलागुणांचा उत्सव! या वर्षी मोठया मायबोलीकरांसाठी घेऊन आलो आहोत 'रंगावली श्रीगणेश'. या उपक्रमात भाग घेण्यासाठी ’मूर्त किंवा अमूर्त स्वरूपातील श्रीगणेश’ या विषयावर स्वतः एक रांगोळी काढायची आहे. रांगोळीसाठी रांगोळीचे रंग, शिरगोळा, फुले, धान्य, डाळी, पाण्यावरची रांगोळी इ. काहीही प्रकार वापरू शकता.

rangoli ganesh (2).jpg

उपक्रमाविषयी -

१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.

२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांसाठीच आहे.

३) उपक्रमात सहभागी होण्यासाठी मायबोलीचं सभासद असणं आवश्यक आहे.

४) उपक्रमासाठी वयोगट १५ वर्षं व पुढचा आहे.

५) स्वतः काढलेल्या रांगोळीचं प्रकाशचित्र काढून 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपामध्ये प्रकाशित करायचं आहे.

६) रांगोळीसाठी विषय - ’मूर्त किंवा अमूर्त स्वरूपातील श्रीगणेश’.

७) प्रकाशचित्रं प्रकाशित करण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्य असणं आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता ५ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

८) 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.

९) याच ग्रुपामध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१६ ग्रुपामधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत.)

१०) प्रवेशिका ’रंगावली श्रीगणेश- <मायबोली सदस्यनाम>’ या नावानं द्यावी.

११) प्रकाशचित्रं गणेश चतुर्थीपासून, ५ सप्टेंबर २०१६ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, १५ सप्टेंबर २०१६ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपक्रम!
माबोवर इतके एक्सपर्ट रांगोळी कलाकार आहेत की हा उपक्रम म्हणजे डोळ्यांना एक पर्वणीच असणार आहे.

मस्त उपक्रम . छान छान रांगोळ्या बघायला मिळतील

मामी, शिरगोळा म्हणजे आपली नॉर्मल पांढरी रांगोळी

रांगोळी ज्या पासून बनते तो शिरगोळा. मला आठवतंय लहानपणी आम्ही हे दगड गोळा करून आणायचो. मग कुटायचे.

हा उपक्रम पण मस्त, हटके वाटतोय एकदम. मी लहानपणी एक(च) गणपतीची(च) रांगोळी काढायचे, ती कशी काढायचे हे आठवलं तर एक प्रवेशिका देइन नक्की Happy