लहान मुलांसाठी उपक्रम - 'खेळ'कर बाप्पा - घोषणा

Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 15:16

नमस्कार मंडळी,

’मायबोली गणेशोत्सव २०१६’साठी घेऊन आलो आहोत आपल्या छोट्या दोस्तांच्या आवडीचा उपक्रम! यावर्षी सगळीकडे ऑलिंपिकची धूम होती, बच्चेकंपनीनंही मन लावून बरेचसे खेळ पाहिले आहेत. आपण भारतानं जिंकलेल्या पदकांचा आनंद साजरा करणार आहोत 'खेळ'कर बाप्पा रंगवून!

Bappa-Badminton.jpgBappa_Wrestling.jpg

१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आयडीनेच भाग घ्यायचा आहे.
४) वयोगट - ४ ते १० वर्षं
५) वरीलपैकी एक किंवा दोन्ही चित्रांची प्रिंट काढून रंगवणं अपेक्षित आहे. आपल्या पाल्यानं रंगवलेलं चित्र/ चित्रे स्कॅन करा किंवा त्याचं छायाचित्र काढा व इथे अपलोड करा.
६) चित्रं गणेश चतुर्थीपासून, म्हणजे ५ सप्टेंबर, २०१६पासून (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, म्हणजे १५ सप्टेंबर, २०१६पर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
७) चित्रं पाठवण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्य असणं आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीसाठी ५ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
८) 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचं सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
९) याच ग्रुपामध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१६ या ग्रुपातले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
१०) नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
'खेळ'कर बाप्पा - पाल्याचे नाव आणि वय
११) ’विषय’ या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यू)मधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.
१२) शब्दखुणा या चौकटीमध्ये ’मायबोली गणेशोत्सव २०१६’ हे शब्द लिहा.
१३) आता या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच मजकुरात प्रकाशचित्र टाका. यासाठी आपल्या 'माझे सदस्यत्व'मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' इमेज फाईल अपलोड करा. त्या फाईलचे आकारमान १५० kb इतकेच असू द्या.
१४) मजकुराच्या चौकटीखाली 'मजकुरात image किंवा link द्या’, यातील image या शब्दावर टिचकी मारा. एक नवीन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' या पर्यायावर टिचकी मारून तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटीत तशी पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वांत वर दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.
१६) नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ’ग्रूप’ असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. ’सार्वजनिक’ या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
१७) Save ही कळ दाबा.
१८) जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल /बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

बच्चेकंपनीनं रंगवलेला सगुण-साजिरा बाप्पा पाहायला सगळे खूप उत्सुक आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावा!
मस्तं गोड आहेत चित्रे!
आम्ही अगदी वाटच बघत होतो यांची!

सिंधुगणेश आणि साक्षीगणेश!

right click on the picture
Save image
and then print image

फक्त चित्रांची प्रिंट कशी घ्यायची???>>> चित्रावर उजव्या बाजूला क्लिक करा सेव्ह इमेज ओप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तुमच्या पीसी अथवा लॅपटॉप मध्ये सेव्ह करा. आणि मग प्रिंट घ्या.

दोन्ही चित्र गोड आहेत. या उपक्रमातल्या प्रवेशिका बघायला फार धमाल येते दर वर्षी. आमचं तट्टु राजी झालं तर मी पण पाठवेन एक प्रवेशिका.

मा. संयोजक,
खेळ्कर बाप्पा मध्ये सर्व मुलांची नावे का दिसत नाही?

म्हणजे मला असे म्हणायचे आहे कि... सर्व मुलांची नावे का दिसली असती तर "मायबोली गणेशोस्तव २०१६" यामध्येच जाऊन त्यांना प्रतिसाद लगेच देता आले असते.....यामुळे "नवीन लेखन" यावर शोधत बसण्याचा वेळ वाचेल...

असो,

संयोजक, खुप चांगल्या चांगल्या, तुमच्या अनेक उपक्रमाबद्द्ल धन्यवाद आणि अभिनंदन...

'खेळ'कर बाप्पा मध्ये "रेयांश" नावाच्या आयडी मध्ये बाप्पा च्या जागी दगडूशेठ गणपतीची आरती दिसतेय....
म्हणून प्रतिसाद देता आला नाहि/ देता येत नाही....