मराठी मालिकांची शीर्षकगीते आणि मोबाईल रिंगटोन :-)

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 28 August, 2016 - 02:46

काय अफाट सुंदर असतात आजकाल मराठी मालिकांची शीर्षकगीते Happy

रोज रोज दाखवल्या जाणार्‍या या डेलीसोप मालिका कूर्मगतीने का होईना पुढे सरकत असतात. पण त्यांची शीर्षकगीते मात्र दरवेळी तीच राहतात आणि तीच ऐकावी लागतात. माझ्या कितीही आवडीचे गाणे असे मी रोज ऐकू लागले तर पंधरा-वीस दिवसांत वा फार तर महिन्याभरात कंटाळा येऊ लागेल. पण या मालिकांची शीर्षकगीते मात्र मनात आणखी आणखी घर करू लागतात. काही पहिल्याच ऐकण्यात आवडतात तर काही स्लो पॉयजनसारख्या डोक्यात भिनू लागतात. थॅन्क्स टू अजयातुल हल्ली मराठी चित्रपटसंगीताचा दर्जा सुधारलाय. अन्यथा मधल्या काळात आनंदीआनंदच होता. पण या मराठी मालिकांची गाणी मात्र कालही आणि आजही, तितकीच भन्नाट. नक्की काय कमाल आहे कल्पना नाही, पण सत्यनारायणाचा शिरा नेहमी चवदारच लागतो. राष्ट्रावरचे देशभक्तीचे कुठलेही गाणे ऐकले की अंगावर हमखास शहारा येतो. तसेच कुठलीही मालिका घ्या तिचे शीर्षकगीत आपल्याला नाद लावतेच. जाहीरातींसारखे त्यांना टाळून पुढे जावे वा तेवढ्या वेळात पटकन आपले काम उरकावे असे होतच नाही. आणि गेलोही जवळच स्वयंपाकघरात उठून तरीही एक कान नेहमी तिथेच Happy

आमच्या घरात तर रिंगटोन म्हटले की मराठी शिरेलीतील गाणेच हवे Happy

माझी सध्याची रिंगटोन -
लेटेस्ट शीर्षकगीत - लेटेस्ट मालिका - खुलता कळी खुलेना - https://www.youtube.com/watch?v=2hkRGGSyPb4

माझ्या भावाची रिंगटोन - (आईच्या शिव्या खाऊनही बदलत नाहीये Happy )
रात्रीस खेळ चाले - https://www.youtube.com/watch?v=mhSVZn_8aG8

माझ्या बाबांची या आधीची आणि बरेच काळापर्यंत असलेली -
जय मल्हार - https://www.youtube.com/watch?v=2w2qAm6KjZk&index=12&list=RDDiHDy00EbSg

तर आजवर काही गाजलेल्या आणि बरेच काळापर्यंत मोबाईवर रेंगाळलेल्या आणि दिवसरात्र आमच्या घरात वाजलेल्या रिंगटोन -

वादळवाट - https://www.youtube.com/watch?v=dEYpyhzybiQ
(अशक्य सुंदर. भावाने भांडून घेतलेली माझ्याकडून. पण मग एकाच घरात दोन रिंगटोन कश्या वाजणार म्हणत मी भाऊबीजेच्या ओवाळणी सोबत हे बलिदान देऊन टाकले Happy )

एका लग्नाची तिसरी गोष्ट - https://www.youtube.com/watch?v=NeWZR2gQlXo&index=18&list=PL4kq_-tnPuIFQ...
(हि माझ्या भावाच्या आवडीची. आणि मला अशक्य ईरीटेट करणारी म्हणून विशेष लक्षात. पण खरे तर आवडायची. पण ते असते ना भावाबहिणींच्या भांडणातील गंमत. म्हणून कबूल करायचे नाही. आणि मला त्रास होतोय या आनंदापोटीच बरेच काळपर्यंत आमच्या घरात वाजत होती. पुढे ती मालिकाच फार कंटाळवाणी होऊ लागली तसे त्यानेच लाज वाटूब बदलली Happy )

आणि या खालील दोन माझ्या फार फार फेव्हरेट पैकी दोन Happy
कळत नकळत - https://www.youtube.com/watch?v=wZxIRiThce0&list=PL4kq_-tnPuIFQ6UePBTnuH...
जुळून येती रेशीमगाठी - https://www.youtube.com/watch?v=g84OjTgOZu4

या सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे सध्या आईनेही मोबाईल वापरायला सुरुवात केली आहे. पण आमच्या घरात मालिकांचे सर्वात जास्त वेड असणार्‍या या बाईने मात्र अजून कोणत्याही शीर्षक गीताला आपली रिंगटोन बनवायचा मान दिलेला नाही.

तुमच्या घरातही मोबाईल खणखणताच ऐकू येतात का ही शीर्षकगीते - तुमच्या आवडीची मराठी मालिका शीर्षकगीते Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मातोश्रींच्या मोबाईल ची रिंगटोन गेल्या दीड वर्षा पासून एकच आहे : उंच माझा झोका
या विरुद्ध चे माझे डिसेंबर १५ चे बंड दडपण्यात आले....

होणार सून मी या घरची जेव्हा फॉर्मात(!) होती तेव्हा, म्हणजे जेव्हा डिलीव्हरी चौदाव्या महिन्यात पोहोचली होती अगदी तेव्हाच, आमच्या ऑफिसमध्ये एका मुलीने त्याची रिंगटोन ठेवली होती. थोडी थोडी कसरत तारेवरची होणार सून मी या घरची. आधी गंमत वगैरे करून झाली पण नंतर लोकांना ईरिटेट होऊनही ती बदलायचे नाव घेत नव्हती. तसे एकदिवस ती वाजताच तिच्याच एका मैत्रीणीचा संयम सुटून ती भर ऑफिसमध्ये ओरडली, अग्ग ए बाई बदल ना ती, तुला सांगून समजत नाही का... च्यायला घरी पण तेच ईथे पण तेच... जरा जास्तच सिरीअस मोडमध्ये भडकली. कदाचित आधीच खराब मूडमध्ये वा कामाच्या प्रेशरमध्ये असावी. मजाक मजाक मध्ये सीन क्रिएट होता होता वाचला. काही असो, पण रिंगटोन दुसर्‍याच दिवशी बदलली गेली.

Proud

बादवे, हत्तीणीचे ओरीजिनलमध्येच १४ प्लस महिने असतात का?
मग बरे झाले नव्हतीच ते, नाहीतर आजच्या तारखेला डोहाळेजेवणाचा एपिसोड चालू असता

अवांतर - ओरिजिनल धाग्यावरही लिहा रे. नाहीतर अश्याने धागाकर्त्यांचा उत्साह मावळतो Happy

Dil Dosti Duniyadari aani sadhyache Yuva varil Shravanbal Rockstar' pan aavadtat.

वनश्री - दिल दोस्ती दुनियादारी आमच्या ग्रूपमध्ये ईतकी कॉमन झाली होती की काही दिवसांतच सर्वांनी पटापट बदलली आणि मग कोणीच ठेवली गेली नाही Happy

मालगुडी डेज देखील माझी ठेवून झाली आहे. फार पूर्वी, बहुधा पहिल्या मोबाईलच्या काळात.

अवांतर - ओरिजिनल धाग्यावरही लिहा रे. नाहीतर अश्याने धागाकर्त्यांचा उत्साह मावळतो स्मित >>> बरं झालं तुम्हीच बोल्लात हे Happy

u r rite vanashree,
म्हणूनच तर सर्वांनीच ती एकाच वेळी ठेवली आणि मग कॉमन रिंगटोन कोणाला चांगली वाटते. सर्वांनीच बदलली.

meanwhile, फायनली आमच्या मातोश्रींनी हॅण्डसेटमधील टिपिकल रिंगटोनला सोडचिठ्ठी द्यायचा निर्णय घेतला आणि सवार लू या हिंदी गाण्याला पहिला मान दिला. मराठीला अजून थोडे वाट पाहावे लागेल.

मी सरळ एमपीथ्री फॉर्मेट मधील गाणे हवे तेवढे कट करून ठेवतो. स्पेशल रिंगटोनसाठी बनलेले वगैरे शोधायच्या भानगडीत पडत नाही. नवीन नवीन मोबाईल जेव्हा घेतलेला तेव्हा खूप क्रेझ होती, विविध गाणी काळजीपूर्वक ऐकत त्यातील एखादा मस्त पीस जो फोन येताच असा वाजेल की सर्वांचे लक्ष वेधून घेईल असा शोधायचा आणि रिंगटोन म्हणून ठेवायचा..