आला पाउस गेला पाउस (तरही - बदल करुन)

Submitted by इस्रो on 25 August, 2016 - 22:34

कोणा ना कळलेला पाउस
आला पाउस गेला पाउस

धरणीचा की आभाळाचा?
कोणाचा हा चेला पाउस?

जवळी नसता टोपी, छत्री
नक्की मग ठरलेला पाउस

झाडे, रस्ते, सेतू, ओढे
उखडाया टपलेला पाउस

वाटे यावा, तेव्हा असतो
हा वेडा दडलेला पाउस

कोरा गेला मोसम सगळा
यंदा का रुसलेला पाउस

भेटीसाठी धरतीच्या बघ
आहे आसुसलेला पाउस

तू बिलगावे अलगद मजला
ऐसा ना पडलेला पाउस

अपुल्या पहिल्या भेटीचा तो
ह्रदयी मी जपलेला पाउस

-नाहिद नालबन्द 'इस्रो'
[भ्र्मणध्वनी ९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users