थर्मोकोलचे मखर न्यु जर्सीत कुठे मिळेल?

Submitted by mansmi18 on 23 August, 2016 - 08:27

म्यु जर्सीत थर्मोकोलचे (रेडीमेड) मखर कुठे मिळते? (गणेश मुर्ती १७ इंच उंचीची आहे)
समजा न्यु जर्सीत नाही तर ऑनलाईन कुठले पोर्टल आहे का जिथुन मागवता येइल?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पटेल / पातिदार इ. मधे चेक केले का? तिथे गणेश मूर्ती आणि सजावटीचे सामान गेल्या वर्षी तरी होते. यावर्षी पाहिल्याचे आठवत नाही. यायचे असेल बहुधा.

सुमा फुड्स वालाही गणपतीचे सामान विकतो. नक्की मिळेल.
नाहीतर ओक ट्री रोडवर पूजा सामानाचे दुकान आहे म्हणे.. तिथे.

गोगा,

अहो पुण्यात शोधायला कशाला हवे? Happy
माझ्या न्यु जर्सीतील मित्राला हवे आहे. त्याला सांगेन.

धन्यवाद.

ब्रिजवॉटरच्या बालाजी मंदिरात आणि रॉबिन्सविलच्या स्वामी नारायण मंदिरात स्टोअर्स आहेत, तिथे सुद्धा बरच सामान विकत मिळतं. तिथेही मिळायची शक्यता आहे.

अवांतर प्रतिसाद. क्षमस्व : पाटीदार, लेवा पाटीदार, ही पटेल आडनांवाच्या लोकांची 'जात' असते. त्यामुळेच पटेल / पातिदार नव्हे, तर पाटीदार.

असे विकतचे मखर आणून देखावा करण्यापेक्षा स्वतःच्या हाताने भक्तिभावाने जसे जमेल तसे मखर, पूजा करावी. भक्तिभाव खरा असेल तर देव नक्कीच प्रसन्न होतो.

आता भक्ति, देवावर प्रेम या पेक्षा नुसते सीझनल डेकोरेशन, बोलायला एक विषय म्हणून घरात ठेवायचा असेल तर काही म्हणणे नाही. देव काही रागावणार नाही, त्याची काळजी नको.
काही अमेरिकन लोकांना घरी बोलवा, त्यांना गोष्ट सांगा - मातीपासून पार्वतीने गणपति बनवला, शंकराने त्याचे डोके उडवले, नि मग हत्तीचे मुंडके त्याला लावले वगैरे. मग अमेरिकन लोक म्हणतील गंमतच आहे हिंदू धर्म म्हणजे!

साईनफेल्ड सिरिज मधे जसा जॉर्ज च्या बापाचा फेस्टिवस सण होता तसे.

नंतर त्यांनाहि तो विषय पुरेल इतर पार्ट्यांमधे सांगायला.

तुमच्या मित्राने नेटवर शोधलंय का? बर्‍याच ठिकाणी अगदी सहज अवलेबल आहे.
अर्र, मखर नाहीये ऑनलाईन पण बनवायचं असल्यास थर्मोकोल शीट्स सहज मिळतील.