उदासीन मागासलेल्या जमाती

Submitted by बेफ़िकीर on 17 August, 2016 - 11:49

उदासीन मागासलेल्या जमाती, निरुत्साह सरकारतर्फे सदा
नसे हक्क एकास माहीत अन् आणतो एक हक्कांवरी त्या गदा

मुलांना जिला पाजता येत नाही, खपे एक शेतात महिला अशी
पिके नेक मिंधी बुळ्या पावसाची नि तान्ही तिची खंगती सर्वदा

म्हणाली दरी, काय कवटाळता उंच ह्या पर्वतांच्या समस्या तुम्ही
मला जर बुजवलेत, देशात कोठे न लागेल काढायला बोगदा

कुणाला हवे सांग स्वातंत्र्य असले, दवडलीत मी सात दशके जिथे
नको त्या ठिकाणी हलाखी सदा तर नको त्या ठिकाणी सदा संपदा

स्वतःवाचुनी ज्यास मी भेटतो तो निराळाच कोणी कसा वाटतो
'जिथे एवढी लोकसंख्या तिथे सांग जाती कश्या तेवढ्या' एकदा

=============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणाली दरी, काय कवटाळता उंच ह्या पर्वतांच्या समस्या तुम्ही
मला जर बुजवलेत, देशात कोठे न लागेल काढायला बोगदा

छान!

मुलांना जिला पाजता येत नाही, खपे एक शेतात महिला अशी
पिके नेक मिंधी बुळ्या पावसाची नि तान्ही तिची खंगती सर्वदा...वा वा
कठीण व्रुत
गजल मस्त ......

माफ करा, पण मला वटत की गजल चा अर्थ गहिरा आहे आणि तो सर्वसामान्याला लगेच कळेल असा नाही,
अनील जी तुम्ही ग्रेस वाचला आहे का? कदाचित तो पण कळणे जड जाइल तुम्हाला

डॉर्सी,

१. प्रत्येकाला जे वाटते ते (अर्थातच संयत शब्दांत) लिहायचा येथे पूर्ण हक्क आहे.
२. माझ्या स्वतःच्याही मते ही गझल सुधारण्याचा निश्चित वाव आहे, पण सामाजिक विषयावर जे म्हणावेसे वाटत होते तेवढे मी ह्या गझलेत म्हंटलेले आहे.
३. ही माझ्या जातकुळीचीही गझल नाही. अश्या विषयांवरील माझ्या इतर गझला (आई मेंढ्या हाकत आहे, पायथा बांधायला) वगैरे बर्‍याच अधिक चांगल्या आहेत. पण तरी माझ्या गझलांची मूळ जातकुळ आणि हे विषय ह्यात अंतर आहे.

Happy