पुणे - आग्रा, सुवर्णमंदीर प्रवास माहिती

Submitted by कबूतर on 17 August, 2016 - 03:41

दिवाळीच्या सुट्टीत ताजमहाल व सुवर्णमंदीर बघण्याचा प्लॅन आहे.
काही वेबसाईट्स वर golden triangle tour असा option दिसतो पण त्यामध्ये जयपूर पण included आहे आणि सुवर्णमंदीर नाहिये. कस्टम टूर करायची झाल्यास वीणा वर्ल्ड किंवा केसरी कडून करून घेता येईल का? cox and kings चा कुणाला अनुभव आहे का?
ह्या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी दिल्ली ला जावेच लागेल. दिल्ली safe वाटत नाही त्यामुळे स्वतः ट्रिप organise करायची भिती वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्ली safe वाटत नाही >> ? why? दिल्लीत तर जगभरातुन पर्यटक येतात. तुम्ही तर भारतीय आहात.

फक्त ताजमहाल व सुवर्णमंदीर बघण्याचा प्लॅन असेल तर दिल्लीला उतारयाची मुळीच गरज नाही.

मुंबई किंव्हा पुण्यातून जाणार असाल तर आधी अमृतसरला जाणार्‍या कोणत्याही ट्रेनचे आरक्षण करुन तिथून सुवर्णमंदीर, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर बघून परतीच्या प्रवासात आग्र्याला ताज महल व तिथला लाल किल्ला पाहून परत पुण्या-मुंबईला येऊ शकता. Happy

शुभेच्छा..!!

फक्त सुवर्णमंदिर आणि आग्रा करायचे असेल तर दिल्ली टाळता येऊ शकते.
मुंबई वरून सरळ ट्रेन ने अमृतसरला जायचे, तिथे सुवर्णमंदिर पाहून झाले की ट्रेनने आग्रा गाठायचे. आग्रा वरून ट्रेन ने मुंबईला परत यायचे.

दिल्लीत राहायची गरज पडत नाही.

काही कारणास्तव विमानानेच जायचे असल्यास मात्र दिल्लीवरूनच फ्लाईट घ्यावी लागेल.

प्रसाद, अतरंगी धन्यवाद!
पुण्याहून जायचे आहे पण विमानाने one way जायचे झाल्यास दिल्ली ला जावे लागेल Sad

पुण्याहून जायचे आहे पण

पुण्याहून जायचे आहे पण विमानाने one way जायचे झाल्यास दिल्ली ला जावे लागेल.

<<

त्या मार्गानी देखिल दिल्ली टाळता येते. पुण्याहून विमानाने 'चंदिगड' ला जायचे, तिथून हरियाणा/पंजाब रोडवेज किंव्हा खाजगी टॅक्सीने अमृतसरला जाता येईल.(अंदाजे अंतर २४५ कि.मी.) किंव्हा चंदिगड हून अमृतसरला रेल्वेने जायचे झाल्यास जवळचे अंबाला स्टेशन गाठा(चंदिगड-अंबाला अंतर ४०-४५ किमी आहे) तिथून अमृतसरला ट्रेन आहेत.

स्पाईस जेटची मुंबई अमृतसर डायरेक्ट फ्लाईट आहे.

दिल्ली वरून अमृतसरला सकाळ दुपार संध्याकाळ फ्लाईट आहेत. दिल्लीत राहायची गरज पडणार नाही

हरियाणा पंजाब मध्ये रात्री चा प्रवास कार किंवा खाजगी टॅक्सीने टाळा.>>+1 आणि दिल्लीत रहा बिन्धास्त. एवढेपण बेकार शहर नाही आहे. अमृतसरपेक्षा तर नक्कीच चांगले आहे.

गाडी चालवायची आवड असेल आणि सोबत दुसरं कुणी असेल (डायवर म्हणून) तर मस्त लाँग रोड्ट्रिप करता येईल. बायरोड थोडं अन्प्लॅन्ड/ऑफबीट ठिकाणं ही करता येतील. Happy

पुणे>अमृतसर>आग्रा>पुणे हे अंदाजे ३६०० किमी आहे.

दिल्ली आग्रा करा हो रस्त्यानं. यमुना एक्स्प्रेसवेचा अनुभव घ्या. दिवसा फिरा हवं तर. रात्रीचा प्रवास टाळा.

Infinite holidays किंवा Go Holidays कडे चौकशी करा.. व्यवस्थित ट्रीप प्लॅन करुन देतील. आणि योग्य ती माहितीही देतील..

पुणे - अमृतसर AI-852, Dep: 07:45, Arr: 13:15

अमृतसर ते आग्रा छत्तीसगड एक्सप्रेस. संध्याकाळी निघुन सकाळी ९ च्या आसापास आग्रा.
किंवा अमृतसर ते दिल्ली शताब्दी, आणि दिल्ली ते आग्रा यमुना एक्स्प्रेस वे. सगळे दिवसा होईल, मजा येईल, संध्याकाळच्या आत आग्रा.

सुवर्णमंदिर दिवसाचे आणि रात्रीचेसुध्दा बघण्यासारखे आहे. त्याप्रमाणे प्रवासाचे प्लॅनिंग करा.

शक्य झाल्यास भरतपुरचे पक्षी अभयारण्य नक्की बघा. आग्र्या पसुन १-१.५ तास अंतरावर आहे. मस्त सायकल भाड्याने घेउन निवांत फेरफटका मारा. एक सकाळ आणि एक संध्याकाळ घालावा तिथे.

पुण्यावरुन डायरेक्ट जाण्याऐवजी मुंबईवरुन जाणं/येणं जमेल का ते बघा. मुंबईवरुन विमानं जास्त असतात आणि किंमतही कमी असते. २५०० रुपयात इनोव्हा पुणे ते मुंबई सहकुटुंब सोडेल.

@टग्या,

आमच्या बरोबर ७० वर्षांच्या सासुबाई आणि ७ वर्षांची कन्या आहेत त्यामुळे सायकल वरून जांणं अवघड वाटतंय पण अभयारण्य बघायला सगळ्यांना नक्कीच आवडेल. धन्यवाद!