फुलाची पाकळी आहेस तू

Submitted by जयदीप. on 15 August, 2016 - 23:44

एक गझल :

फुलाची पाकळी आहेस तू
निघाली वेगळी आहेस तू

कसे काढायचे असते तुला
गळ्यातिल साखळी आहेस तू

तुला जग चांगले दिसते म्हणे
खरोखर आंधळी आहेस तू

मिळो शेपूट कुत्र्याचे तुला
'सरळ', 'साधी' नळी आहेस तू

जिची होती परीक्षा राहिली
अशी मधली फळी आहेस तू

नको स्पर्धा फुलांशी येथल्या
उमलणारी कळी आहेस तू

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान