स्नाईपर रिलोडेड ३

Submitted by Abhishek Sawant on 15 August, 2016 - 11:53

स्नाइपर रिलोडेड 3
कोणाच्याही मनात कसलीही शंका नव्हती. एकच धेय होतं आतंकवाद्यांना संपवणे. आणि मी मात्र माझ्या Bareett XM109 OSW 23 mm स्नाईपर गनच्या प्रतीक्षेत होतो.

क्रमशः

नारायणपुरच्या चेकपोस्ट ला रिपोर्ट करून आम्हाला, तयारी करायची होती. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा साधारणतः पहाटेचे चार वाजले होते. सकाळी लवकरच ५.०० च्या सुमारास मिशनला सुरुवात करण्याचे ऑर्डर होते. कारण शत्रू संखेने कमी असले तरी ते निष्णात आणि स्किल्ड होते. सकाळच्या लो विजन शूटींग मध्ये त्याचा पाडाव करण्यास सोपे जाईल असे आमचे सर्वांचे मत झाले होते. चेकपोस्ट वरील बेसकॅम्प वर आम्ही तयारी करत होतो. तेवढ्यात दोन सोल्जर बॅग्स घेऊन आले, त्यात स्नाईपर गन आणि दुसरे इक्वीपमेंट्स होते. आम्ही बॅग ऊघडली तर समोर होती Bareett XM109 OSW 23 mm स्नाईपर गन.

ती डीअसेम्बल्ड असली तरी तीचं सौंदर्य कमी झालं नव्हत. आम्ही दोघेही पेपर्स पाहण्यात गुंग होतो. सगळ्या ऑर्डर्स लेखी स्वरूपात होत्या, जागेचे कोऑर्डीनेट्स, शत्रुची संभाव्य स्थिती त्यात होती, आणि मिशन साथी लागणार्‍या वस्तुंची चेकलीस्टही होती.

मिशन पॅकेजींग लिस्ट वाचताना तर आम्हाला भोवळच आली. असंख्य वस्तुंची नावे त्यात होती आणि सगळ्यात मोठे आव्हान होते ते या गोष्टी बाळगणे. जरी ट्रेनींग दरम्यान अश्या गोष्टी घेऊन वावरणे शिकवले असले तरी प्रत्यक्ष्य युद्धाच्या मैदानात हे जरा कठीणच वाटत होते. आम्ही चेकलीस्ट मधील एकेक वस्तू घ्यायला सुरूवात केली. पहिलाच पॉइंट होता आर्म्स आनि अ‍ॅमुनिशन त्यामध्ये, Bareett XM109 OSW 23 mm स्नाईपर सिस्टीम आनि M3A skop, M118 चे १०० राऊंडस, M9 पिस्तुल, 9mm बॉल अ‍ॅमुनिशनचे ४५ राऊंडस, M67 ६ ग्रेनेड्स आणि २ माईन्स. त्यानंतर स्नाईपर गनचे डेवलोपमेंट किट- टुल्स आणि रिप्लेसमेंट पार्टस सोबत, पिस्तूल साफ करण्याची सामग्री, हॅन्डसेट रेडीओ चा एक सेट, रेडीओ साठी लागनार्‍या अतिरीक्त बॅटर्‍या ज्या मिशनच्या लेंथ वर आवलंबून असत.

स्नाईपर सिस्टीम पेलणारी एक M15 ट्रायपॅड, नाईट विजन गॉगल्स त्यासाठी लागणार्‍या बॅटर्‍या आणि मॅगझीन्स असा सगळा लवाजमा घेऊन आम्ही सज्ज झालो. युनिफॉर्म आणि कॅमॉफ्लॉज म्हणजेच नजरेचा भ्रम निर्माण करण्यासाठी विशेष असा सूट तयार करण्यात आला, तो प्रदेश झाडांनी आणि पालापाचोळ्याने व्यापला असल्याने ग्रे आणि ग्रीन शेड असलेला आणि पाने चिकटवलेला सूट खासकरून बनवण्यात आला होता. सगळ्या पोझीशन्स आणि कोऑरडीनेटस ची माहिती प्रिंटेड स्वरूपात घेतली. सगळया कम्युनीकेशन इक्वीपमेंट्स ची पडताळनी केली आणि आमची टिम निघाली.

ती चौकी समुद्रसपाटीपासून २०० मीटर्स अंतरावर होती, शत्रू तिथेल्या एका डोंगरापासून ऊत्तरेला अर्धा ते एक किमी अंतरावर कवर घेऊन बसले होते. त्याच्या पोझीशन मध्ये जास्त नजरेत भरावा असा बदल आत्तापर्यंत तरी जणवला नव्हता. तरीही आम्ही संभाव्य हाईड पॉईंट्स आणि कवर्स यांचा अभ्यास केलेला होताच. त्यांच्यापुढे ७०० मीटर्स चे खुले मैदान होते त्यानंतर खुरटया गवताने व्यापलेला एक लहानसा डोंगर. तो डोंगर ५०० ते ६०० मीटर्सच्या अंतरावर पसरलेला होता. डोंगराला वळसा घालून जायच म्हंटले तरीही ते खुले मैदान ए वासून ऊभा होते.

शत्रू चालाख आणि दक्ष होते, डोंगरावर जरा जरी हालचाल झाली किंवा मैदानात एखाद चिटपाखरु जरी ऊडालं तरी तिथं गोळ्यांचा वर्षाव होई. रात्री एकदा लीड घेण्याचा प्रयत्न झाला असता तिकडून फायरींग झाली होती त्या बुलेट्स वरून सांगता येऊ शकत होते की त्यांच्याकडे मिडीयम रेंजची M61नाईट विजन स्नाईपर रायफल होती. आणि म्हणूनच आमच्या टीमने सकाळची ५ ची वेळ निवडली होती. कारण तेव्हा थोडसं तांबड फुटलेलं असत तेव्हा नाईट विजनही नीट वापरता येत नाही आणि अपुर्‍या प्रकाशाअभावी टारगेट मिस होण्याची दाट श्यक्यता असते. याचीच संधी घेऊन दोन्ही स्नाईपर्सना आपली पोझीशन घ्यायची होती.

आम्ही डोंगराच्या आलीकडील बाजूला थांबलो, सुर्यप्रकाशाची तिव्रता पाहून आम्हाला लीड करण्याची ऑर्डर आली. दोन सोल्जर डोंगराच्या डाव्या बाजूने आणि दोन डोंगराच्या माथ्यावरून अशी एकाच वेळेला दोन्हीकडून फायरींग चालू केली. आमच्या कडे फक्त २० ते ४० सेकंद होते पोझीशन घ्यायला, मला ५० मीटर्स वर असणार्‍या एक १७ इंचाच्या मातीच्या ढिगार्‍यावर ऊगवलेल्या १२ ते १४ ईंचाच्या खुरटामागे स्वतःला कवर करायचे होते.

फायरींग चालू झाली तसा मी माझ्या पोझीशनकडे धावलो, छातीत धडधडत होते, चार पास 9mm बुलेट्स जवळून सुईsss आवाज करत निघून गेल्या. तेव्हा परमेश्वरच आठवला, कसाबसा पोझीशन वर आलो आणी कवर घेऊन पालथा पदोन राहीलो. तेव्हढ्यात सॅट रेडीओ खरखरला “D2 चेक D2.. “ मी ईकडून रिप्लाय दिला
F19.. “AO (एरिया ऑफ ऑपरेशन) अंडर ऑब्जरवेशन कॉपी दॅट AO (एरिया ऑफ ऑपरेशन) अंडर ऑब्जरवेशन”
“D2 रॉजर्र दॅट..पोझीशन सिकुर्ड अ‍ॅट 12’Oclock १०० मीटर्स आय रिपीट D2 रॉजर्र दॅट..पोझीशन सिकुर्ड अ‍ॅट 12’Oclock १०० मीटर्स” पलीकडील आवाज

“F19 Got your six” म्हणजेच मी तुला पाहू शकतोय 10oclock, 80 मीटर्स साउथ “ मीही माझे कॉऑरडीनेटस त्याला दिले.

रॉजर्र दॅट अस म्हणुन आम्ही दोघेही परीस्थीती पडताळायला थांबलो, फायरींग थांबली होती, आता कुठे धूळ खाली बसत होती. आम्ही डोळ्यात जीव आणून शत्रुच्या हालचालीचा ठाव घेत होतो. कारण आमच्या पोझीशनचा पुसटसा संशय जरी आला असता तर मिशन ईथेच थांबवावे लागले असते. आम्ही दोघेही श्वास रोखून न हालचाल करता पडून होतो........

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळी स्टोरी एकदमच लिहून पोस्ट करा... वेगवेगळ्या भागात वाचताना आधीचे भाग परत वाचायला लागतात.. आणि फार उशिरा भग आले की लिंक अजिबातच लागत नाही..