ऐन श्रावणामध्ये होते लाही-लाही !

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 August, 2016 - 10:32

ऐलतिरावरती मी पैलतिरी तो राही
विश्वासाच्या लाटा स्पर्शत दोघांनाही

आत्ता आत्ता उन्हे उतरली डोंगरमाथा
चंद्र चांदण्यांसोबत येथे अवतरलाही ?

काजव्यान्मुळे लखलखणारे झाड़ पाहिले
दृष्य मनोरम अलभ्य असले सूर्यालाही

वार्यावरती स्वार होउनी सरी चालल्या
जणू नभातिल पऱ्या विखुरल्या दिशात दाही

गोष्ट ऐकण्या धावत अवखळ लाटा येती
स्तब्ध किनारा सांगत बसतो काही-बाही

दूर क्षितीजापल्याड अविरत कोसळतो तो
ऐन श्रावणामध्ये होते लाही-लाही !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐलतिरावरती मी पैलतिरी तो राही
विश्वासाच्या लाटा स्पर्शत दोघांनाही

दूर क्षितीजापल्याड अविरत कोसळतो तो
ऐन श्रावणामध्ये होते लाही-लाही !>>

छान!

गोष्ट ऐकण्या धावत अवखळ लाटा येती
स्तब्ध किनारा सांगत बसतो काही-बाही

दूर क्षितीजापल्याड अविरत कोसळतो तो
ऐन श्रावणामध्ये होते लाही-लाही !<<<< उत्कृष्ट

उत्तम गझल, निसर्गाचे उल्लेख आशयाच्या दृष्टीने चपखल बसलेले आहेत.

superb

सुरेख!

>>>गोष्ट ऐकण्या धावत अवखळ लाटा येती
स्तब्ध किनारा सांगत बसतो काही-बाही>>>कमालीचा शेर!

सुरेख!

>>>गोष्ट ऐकण्या धावत अवखळ लाटा येती
स्तब्ध किनारा सांगत बसतो काही-बाही>>>कमालीचा शेर!

>>>गोष्ट ऐकण्या धावत अवखळ लाटा येती
स्तब्ध किनारा सांगत बसतो काही-बाही>>>कमालीचा शेर! >> +1

दूर क्षितीजापल्याड अविरत कोसळतो तो
ऐन श्रावणामध्ये होते लाही-लाही !

मला पण या दोन ओळी खूप आवडल्या.

-दिलीप बिरुटे