बाहेर ऊन आहे

Submitted by प्राजु on 10 August, 2016 - 09:23

झाले बरेच काही, बाकी अजून आहे..
अर्धीच रात्र सरली, अर्धी उरून आहे

माझ्यातला किनारा मज मागतोय वादळ
भिडण्या अधीर ते पण, जाते दुरून आहे..

आणून चंद्र दे ना.. आणून चांदण्या दे
मनही खुळेच माझे... बसले अडून आहे

तू कोसळून ये ना, हो चिंब सोबतीने
ऐकेल काय साजण? तो तर दडून आहे!

ओठावरील लाली, डोळ्या मधील काजळ
घेशील तू टिपूनी, सजले म्हणून आहे

मी झाड पिंपळाचे, तू पाखरू दिवाणे
ये सावलीत माझ्या, बाहेर ऊन आहे

झोपावयास द्या ना, थोडे अजून मजला
आत्ताच स्वप्न नयनी आले फुलून आहे
- प्राजू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज ब र द स्त !

>>>ओठावरील लाली, डोळ्या मधील काजळ
घेशील तू टिपूनी, सजले म्हणून आहे>>>अहाहा...

ओठावरील लाली, डोळ्या मधील काजळ
घेशील तू टिपूनी, सजले म्हणून आहे

मी झाड पिंपळाचे, तू पाखरू दिवाणे
ये सावलीत माझ्या, बाहेर ऊन आहे

छान ....

>>>>ओठावरील लाली, डोळ्या मधील काजळ
घेशील तू टिपूनी, सजले म्हणून आहे

मी झाड पिंपळाचे, तू पाखरू दिवाणे
ये सावलीत माझ्या, बाहेर ऊन आहे

झोपावयास द्या ना, थोडे अजून मजला
आत्ताच स्वप्न नयनी आले फुलून आहे<<<<

सुरेख