शूटींग (रिओ ऑलिंपिक्स)

Submitted by Adm on 7 August, 2016 - 16:43

रिओ ऑलिंपिक्स मधल्या शूटींगच्या सामन्यांबद्दल चर्चा करण्यासाठीचा धागा.. ... ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग | 7 August, 2016 - 00:39

बघताय का कोणी ?
पुरूषांच्या १० मिटर एअर पिस्टोलची फायनल भारी झाली. व्हिएटनाम आणि ब्राझिलच्या खेळाडूंमध्ये जोरदार चुरस!
व्हिएटनामी खेळाडूने सलग चार शॉट १० च्या खाली मारले आणि ब्राझिलचा वू पहिल्यानंबरवर गेला. पण व्हिएटनामी होंग ने शेवटच्या शॉटला तब्बल १०.७ पॉईंट मिळवून पिछाडी भरून काढली आणि सुवर्णा पदक मिळवलं.
वू ने शेवटचे बरेच शॉट सलग १०.२ च्या वर मारले. हार्ड लक वू ! स्मित

भारताचा राज आठवा आला.

भरत. | 7 August, 2016 - 08:24

आज भारताच्या महिला तीरंदाज, शूटर हीना संधू (कधी वर्ल्ड नं १ आणि रेकॉर्ड होल्डर) .

महिलांच्या १० मिटर पिस्तोल मध्ये चीनच्या झँगने सुवर्ण पदक मिळवलं! तिने एकसे एक अचूक शॉट्स मारून बाकीच्यांना काई चान्सच दिला नाही.

बिंद्रा आणि नारंग दोघांची क्वॉलिफिकेशन राऊंड चालू झालीये.. सध्या तरी नारंग मस्त शॉट्स मारतो आहे.

बिंंद्रा फायनल्स मध्ये... तिथे नीट शॉट्स मारले पाहिजेत राव.. आत्ता शेवटी शेवटी मस्त सूर गवसला होता त्याला..

आठ शूटर्समध्ये दर दोन फेर्‍यांनंतर एकेक स्पर्धक एलिमिनेट होत होता. शेवटच्या एलिमिनेशनला बिंद्रा वॉज टाइड अ‍ॅट थर्ड. लॉस्ट इन शूट आउट.

His olympics is over. A champion retires (At least from olympics)

इटलीचा निकोलस कॅप्रियानी गोल्ड मेडल. त्याची आणि बिंद्राची कोच एकच आहे

फार रुखरुख लागली जीवाला. >>>> हो ना.. मला कालचा ज्योकोचा चेहेरा आणि आजचा बिंद्राचा चेहेरा पाहून फार सॅड वाटलं. Sad

आता जे व्हायचं ते होऊन गेलं, त्याचं कवित्व राहू द्यावं.
बीजिंगममध्ये त्याने गोल्ड घेतलेलं तेव्हाही त्याच्या रायफलचं सेटिंग कोणीतरी गुपचूप बदललेलं. त्यामुळे त्याचे पहिले एकदोन शॉट्स जरा चुकीचे गेले मग त्याने ते सेटिंग पुन्हा नीट केलं असल्या काय काय स्टोर्‍या येत होत्या.

आज पन्नास मीटर पिस्तूल ची मॅच.. जितू राय आणि प्रकाश नन्नजप्पा खेळणार.. सध्या क्वॉलिफिकेशन चालू आहे...