तुम्हाला आवडलेली माबो वरची भय किंवा गूढ कथा

Submitted by वेडा कल्पेश on 4 August, 2016 - 07:49

नमस्कार मा. बो. कर मी तुम्ही सगळ्यांनी लिहलेल्या कथांचा चाहता आहे. पण तुमच्या सारखं लिहणं मला मात्र जमत नाही. म्हणून मी तुमच्या कथा आवडीने वाचतो . भयकथा भुतकथा मला आवडतात. म्हणून मला जाणून घ्यायचे आहे कि आतापर्यंतची मा. बो. वर वाचलेली तुम्हाला आवडलेली भय किंवा गूढ कथा कोणती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

वेडा कल्पेश ,मायबोलीवर अनेक भूतकथा आहेत ,त्यातली कोणती तरी एक सांगता येत नाही.अमानवीय नावाचे दोन धागे आहेत,त्यावर खरेखुरे अनुभव आहेत .नक्की वाचा.

तुम्ही फक्त हुकुम करा सरकार, आज रात्रीच साडेबारानंतर समशानाफुडल्या उकिर्ड्यावर भुतांचा वास हुंगून येतो आणि घडला अनुभव जस्साच्या तस्सा लिहितो की वाचणार्‍याचा हात प्रतिसाद द्यायलाही चळचळ कापला पाहिजे..

बाकी माझ्या पाहण्यात गेल्या वर्ष दिड वर्षभरात अशी कथा नाही मायबोलीवर की मी वाचली आणि मला त्या रात्रीचे एकटे बाथरूमला जायला भिती वाटली.. अशी कोणती कथा असेल जुनीपुराणी तर वाचायला आवडेल ..

असे आहे होय. मला वाटलं त्यांना वाचायच्या असतील म्हणून तुमच्या धाग्याची लिंक दिली.

माझ्या आवडत्या :

मात - कवठीचाफा.
सावट (भाग १ ते ११) - बेफिकीर.
मला खात्री आहे (भाग १ ते ४) - विशाल कुलकर्णी.

अरे, त्यांनी कथा वाचल्यात. तुम्हाला कोणत्या आवडल्या आहेत हे त्यांना जाणून घ्यायचंय. >>>> Rofl

मामी सही, यावरुन तो डिक्टो वाला जोक आठवला, वाट लागली हसुन

बेफिकीर, विशाल कु., कवठीचाफा आणी कौतुक यांच्या सर्वच भयकथा खुप छान आहेत.