गोळ्या-औषधांमधील कंटेंटची पडताळणी होते का?

Submitted by टोच्या on 1 August, 2016 - 09:12

गोळ्या-औषधांमधील कंटेंटची पडताळणी होते का?
आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर विविध आजारांवर डॉक्टर आपल्याला त्यानुसार विविध गोळ्या, औषधे लिहून देत असतात. ती आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून घेत असतो. पण, या गोळ्यांवर किंवा औषधांवर एफडीएकडून कुठेच असा शिक्का नसतो किंवा लिहिलेले नसते की हे प्रमाणित केलेले आहे. यात मूळ औषधात सांगितलेलेच कंटेंट आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात कंपन्या या गोळ्या औषधांची निर्मिती करतात. त्यातील मूळ पेटंटमध्ये असलेल्याप्रमाणेच कंटेंट असेल, याची काय खात्री? त्यातही त्यांच्यात इतकी प्रचंड स्पर्धा असते, की स्वस्तात औषध बनविण्यासाठी त्यात भेसळ केली जात नसेल कशावरून? यावर नियंत्रण ठेवण्याची किंवा ते तपासण्याची भारतात एखादी यंत्रणा अस्तित्वात आहे का? या गोळ्यांची पाकिटे भरण्याचे काम दूरवरच्या गावांमध्ये, प्रसंगी अगदी झोपडपट्ट्यांतील लोकांकडे दिले गेल्याचे उदाहरण एका डॉक्टरनेच मला सांगितले आहे. पण याबाबत काही उजेडातच येत नाही. जर त्याबाबत एवढा निष्काळजीपणा केला जात असेल, तर हा लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकारच नाही का? याबाबत मायबोलीवरील जाणकारांनी प्रकाश टाकावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोच्या,
सगळ्या गोळ्यांची बॅचवाईज तपासणी होत असते आणि अध्येमध्ये काही फॉल्ट निघाला तर ती बॅच परतही बोलावली जाते.
माझ्या हॉस्पिटलचं मेडिकल स्टोअर आहे. (फार्मसिस्ट ही) आणि माझा मोबाईल क्रमांक हा इथल्या ड्रग कंट्रोल बोर्डला रजिस्टर्ड आहे.
तर दिवसातून किमान तीन चार तरी वेळा कुठल्या तरी ड्रगला इनव्हॅलीड केल्याचे, सेल स्टॉप करा असे सांगळ्याचे मेसेजेस येत असतात.

उदा.

Alert NSQ Drug: अ( CALCIUM CITRATE & VITAMIN D3 SUSPENSION ); Batch No: क्षयज्ञ ;Dt.MFG: 03/2015 ;Dt.Exp.:08/2016 ;MFG Name: अमुक तमुक लॅब्ज. अमुक तमुक चा पत्ता.
Reason of Declaring NSQ: THE SAMPLE HAS BEEN DECLARED AS "NOT OF STANDARD QUALITY" WITH RESPECT TO "DESCRIPTION" ONLY.; Action: STOP Use/Sale/Distribution and Recall-
CSO,Bangalore .

असा मेसेज.
म्हणजे वर्णिल्याप्रमाणे यातले घटक मॅच होत नाहीयेत.

आणि हे अगदी दररोज.

सुदैवाने आमच्याकडे आम्ही अतिशय स्टँडर्ड मेडिसीन्स ठेवत असल्याने कधी स्टॉक परत पाठवावा लागला असे व्कदाच झालेय.
त्यावेळी पॅकेजिंगवरची लाल रेषा (शेड्यूल एच ड्रग सूचविणारी) त्या कंपनीने टाकली नव्हती.
सगळा माल परत बोलवून रिप्लेस करून दिला.
कंपनी अत्यंत रेप्यूटेड आणि मल्टिनॅशनल होती.

साती,
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
या बाबी सामान्य व्यक्तींना माहिती असण्याची शक्यता नसते. पण तरीही कंपन्यांकडून भेसळीचे प्रकार घडू शकतात का? एखाद्या ब्रॅण्डसारखी हुबेहुब औषध बनविणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात असतात. औषधांच्या बाबतीत ‘बॉम्बे मार्केट’ असाही काही प्रकार असतो का?

टोच्या, सामान्य माणसाला बर्‍याच गोष्टीची माहिती नसते.
मी कंप्यूटर घेतला तर त्यातले पार्टस अप टू द मार्क आहेत का, हे मलाही कधीच उमगणार नाही.
मग मी काय करते तर जास्तीत जास्त भरवशाच्या माणसाकडून किंवा भरवशाच्या कंपनीचा घेते.

सो कॉल्ड बाँबे मार्केट प्रत्येकच गोष्टीत असते. महंमद अली रोडवर किंवा चोर बाजारात अगदी वॉशिंगपावडरीही नकली मिळतात.

स्टँडर्ड कंपन्यांकडून भेसळीचे प्रकार शक्यतो होत नाहीत. कारण त्यांना आपले रिझल्टस आणि रेप्युटेशन जपायचे असते.
कुठल्या एखाद्या कंपनीच्या औषधाने माझ्या पेशंटचे बीपी कमी होणारच नसेल तर मी त्या कंपनीने फुकटात युरोप फिरवून आणला तरी लिहेन का? मलाही माझ्या पेशंटला रिझल्टस द्यायचे असतात आणि कंपन्यांनाही डॉक्टरला आपली औषधे रिझल्टस द्यायला वापरायचीत हे माहिती असते.

बाकी फालतू/चालू/ स्वस्त अशा चार दोन औषधे मॅन्युफॅक्चर करणार्‍या कंपन्या भेसळ करतात किंवा कसे हे कोण सांगणार?

त्यांच्या औषधांची नावेही कन्फ्यूजिंग असतात.
म्हणजे एका कंपनीचे 'टोचा' नावाचे ड्रग चालत असेल तर हे 'टोच्या' नावाने काढतात.

अगदी असेच एका बीपीच्या औषधाचे दोन तीन वर्षांपूर्वी पण चुकून झाले हिते.
दोन्ही मल्टीनॅशनल्स आणि दोन्ही रेप्युटेड. एकच केमिकल दोन्ही ब्रँडमध्ये आणि स्पेलिंगात फक्त एका अक्षराचा फरक. उच्चार तोच.
नंतर ब्रँडनेम घेणार्‍या कंपनीला पहिल्या कंपनीला कोट्यावधींची नुकसान भरपाई द्यावी लागली होती.

या गोळ्यांची पाकिटे भरण्याचे काम दूरवरच्या गावांमध्ये, प्रसंगी अगदी झोपडपट्ट्यांतील लोकांकडे दिले गेल्याचे उदाहरण एका डॉक्टरनेच मला सांगितले आहे.
<<
सांगोवांगीचे असण्याची शक्यता जास्त आहे.
एकतर गोळ्यांची पाकिटे मशीनने भरली/बनवली जातात. व ती मशीन्स गोळ्या बनवल्यावर लगेचच पुढच्या असेंब्ली लाईनमधे असतात.
हवाबाण हरडे स्टाईलच्या गोळ्या असतील तर पॅकिंग असे आऊटसोर्स होतही असेल. त्या डॉक्टरांची गोळ्या बनवायची फॅक्टरी असल्याने कदाचित त्यांना जास्त डिटेल ठाऊक असतीलच.

साती,
<<स्टँडर्ड कंपन्यांकडून भेसळीचे प्रकार शक्यतो होत नाहीत. कारण त्यांना आपले रिझल्टस आणि रेप्युटेशन जपायचे असते.
कुठल्या एखाद्या कंपनीच्या औषधाने माझ्या पेशंटचे बीपी कमी होणारच नसेल तर मी त्या कंपनीने फुकटात युरोप फिरवून आणला तरी लिहेन का? मलाही माझ्या पेशंटला रिझल्टस द्यायचे असतात आणि कंपन्यांनाही डॉक्टरला आपली औषधे रिझल्टस द्यायला वापरायचीत हे माहिती असते.>> खरे आहे. पण औषध कंपन्यांनी देऊ केलेल्या प्रलोभनांना भुलणारे डॉक्टरही असतीलच की...!
< म्हणजे एका कंपनीचे 'टोचा' नावाचे ड्रग चालत असेल तर हे 'टोच्या' नावाने काढतात.>> हे उदाहरण चपखल दिलेत तुम्ही.. 
अकलेचा कांदा,
<त्या डॉक्टरांची गोळ्या बनवायची फॅक्टरी असल्याने कदाचित त्यांना जास्त डिटेल ठाऊक असतीलच.> त्या डॉक्टरांनी सांगितलेली पॅकिंगची ‘ती’ घटना उत्तर प्रदेश किंवा हरियाणाकडची होता. याबाबतची बातमी वाचल्याचे त्यांनी मला सांगितले होते.

साती, अश्या प्रकारची व्यवस्था आहे ते वाचून फार आनंद झाला.

पुर्वी आमचे फॅमिली डॉक्टर होते ते क्वचितच बाहेरुन औषधे आणायला सांगायचे आणि सांगितली तरी मला दाखवल्याशिवाय घ्यायची नाहीत असे बजावायचे.

याबाबतची बातमी वाचल्याचे त्यांनी मला सांगितले होते.
<<
याला हिअरसे एविडन्स म्हणतात व त्याला काडीचीही किम्मत नसते. Wink त्यामुळे, ओळखीच्या डॉक्टरांनी बातमी वाचल्याचे मला सांगितले, असे लेखात अ‍ॅड केलेत तर तुमच्या लेखाची क्रेडीबिलिटी थोडी वाढेल बर्का.

बाकी औषध, अन्न, यांत भेसळ करणारे आपल्याकडे फार स्वस्तात सुटतात, व तुम्ही विकत घेतलेल्या कोणत्याही प्रॉडक्टमधे भेसळ नसेलच, किंवा जाहिरात केलेल्या ब्रँडेड वस्तूतही (उदा. पतंजलीला नुकतेच खोट्या जाहिरातींबद्दल फटकारले) रद्दी खपवली गेली नसेल, असेही नसते.

बर्‍याच गोष्टी आपण डोळे झाकून विश्वासावर घेत असतो. डॉक्टरांनी त्यांच्या अनुभवाने, नक्कीच गुण येतील अशी औषधेच लिहिली असावीत असा विश्वास ठेवायला हरकत नसावी.

फॉर सिंपल रिझन, तुम्हाला गुण न येणारे डूप्लिकेट औषध लिहून दिले, तर तुम्ही नेक्स्ट टाईम त्या डॉक्टरकडे जात नाही. मुदलात स्वतःचा मूळ धंदाच बुडत असेल, तर कंपनीकडून मिळणार्‍या "कट"ला भुलून डॉक्टर डूप्लिकेट औषधे लिहिल अशी शक्यता कमी असते. त्यापलिकडे जाऊन औषधे जनरिकच हवी असतील, तर 'नेटाने संशोधन' करून आपल्या जबाबदारीवर खावीत. नंतर गुण आल्यास स्वतःला व न आल्यासही स्वतःलाच बोल लावावा, ही नम्र विनंती.

ऒषधे जरी योग्य ब्रांडची असली आणि तरीही ती योग्य प्रकारे साठवली गेली नसतील (कोल्ड स्टोरेज) तरीही त्यांची गुणवत्ता योग्य आहे असे म्हणता येणार नाही.

एखादे ऒषध जर २५ डिग्री सेल्सियस खालीच साठवायचे असेल आणि पुरवठा साखळीत कुठेतरी ऒषध ३० डिग्री किंवा त्याहून जास्त तापमानाला एक्सपोझ झाले तर ते निकामी किंवा कमी प्रभावी होऊ शकते ना?

एखाद्या वेळेस वीज नसेल, उन्हाळा असेल तर? आपल्या देशात तर हे घडणे असंभव नाही.

गमभन, हो.
अगदी शक्य आहे.

इन्स्युलिन्स, हिपॅरिन्स, काही इम्युनोग्लोब्युलिन्स अशी लो टेंपरेचरलाच साठवावी लागतात.
काही नविन प्रकारची प्रोबायोटिक्स औषधेही अशी ठराविक तापमानालाच साठवावी लागतात.

मी मागे लिहिलं होतं ते उदाहरण परत देते.
डायबेटीक किटोअ‍ॅसिडिसिसची पेशंट - औषधे काकाच्या इटुकल्या फार्मसीतूनच आणणार , तुमच्या फार्मसीतून नाही घेणार, आम्हाला कन्सेशन मिळते या अट्टाहासापायी डिनेचर्ड इन्स्युलिन घेऊन आले नातेवाईक . भसाभसा इन्स्युलिन टोचूनही शुगर कमी व्हायचं नाव नाही. शेवटी फुकटात आमच्याकडचं इन्स्युलीन दिलं. पटकन रिवईज्ड झाली.
आता काकाच्याच फार्मसीला ब्लेम कुठनं करणार रिलेटीव्हज!

आमच्या एच के रिजनात तर हे अगदी कॉमन आहे.

कंटेटबद्दल धागा आहे पण दोनतीन ड्रग एकाच गोळीत मिसळलेले औषध लिहून देतात तेव्हा तसं मिश्रण खरंच गरजेचं आहे का असा प्रश्न पडतो.

दोनतीन ड्रग एकाच गोळीत मिसळलेले औषध लिहून देतात तेव्हा
<<

काही कॉम्बिनेशन्स 'रॅशनल कॉम्बिनेशन्स' असतात, काही उगं बळजबरी केलेली. याबद्दल फार्मॅकॉलॉजी विषयात शिकवतात व परिक्षेत प्रश्नही असतो.

एफडिएवाले विचित्र कॉम्बोवाल्या औषधांवर बॅनही आणत असतात, व अशी औषधे मार्केटमधून काढून घेतली जातात.