Submitted by सुप्रिया जाधव. on 27 July, 2016 - 12:57
बनणे शिकवा ह्याला थोडेसे व्यवहारी
सूर्य राबतो बारा महिने बिनापगारी
सर्व नियम ती मोडत जाते प्रेमाखातर
नियमाने तो पाळत बसतो दुनियादारी
सताड़ उघड्या डोळ्यांनी दुर्लक्षित करते
घरोघरी सापडेल बघ डोळस गांधारी
नटवलीस बेमिसाल सुखदुःखांनी दुनिया
तुझ्यासारखा होणे ना दुसरा रंगारी
चंद्र एक वाटणीस यावा कुणाकुणाच्या ?
मात्र चांदण्यांवरती त्याची मक्तेदारी
जग़ण्यामागे धावत सुटलो उर फूटेस्तो
संपत आला रस्ता वळुया का माघारी ?
पायामध्ये पैंजण बांधू परिस्थितीचे
दैवाच्या तालावर नाचू ...तेच मदारी !
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा