Submitted by सुप्रिया जाधव. on 19 July, 2016 - 07:50
ह्या जीर्ण देहाची नसेना शाश्वती
नेसून असली फेडली लुगड़ी किती !
काट्यांमधे उमलून आनंदी कशी
संपादली सिध्दी फुलांनी कोणती ?
वास्तव्य कायमचे असे परक्या घरी
उपऱ्या मनाला कोठुनी माझी क्षिती ?
वारीस येणे शक्य नाही विठ्ठला
घ्यावी स्वतःची भेट म्हणते धावती
फुलपाखराला मोकळे सोडून दे
फुलपाखरे उडण्याचसाठी बैसती
हे कोडगे मन मठ्ठही आहे तुझे
होते जगामागून साऱ्या उपरती
तो घट्ट कवटाळेल छातीशी तुला
मृत्यूस घ्यावी लागते का अनुमती ?
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वास्तव्य कायमचे असे परक्या
वास्तव्य कायमचे असे परक्या घरी
उपऱ्या मनाला कोठुनी माझी क्षिती>>
छान!