वळण..."प्रेम" ज्याचं नाव

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 19 July, 2016 - 03:09

वळण..."प्रेम" ज्याचं नाव

किती सोप्प आहे ना... एखाद्या नजरेत किंवा मग काही दिवसांच्या ओळखीवर, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगणं... मग ते नेहमीच झुरणं .. पण का असत कठीण निभावणं..? एकत्र राहणं.. जगणं... कारण असत… एकमेकांना "अति" गृहीत धरणं... हे तो करेलच किंवा हे तिने करावं अशी अपेक्षा ठेवणं.. मग होतात मतभेद... दुरावा अन मग कळते चूक कधी प्रेम करणार्यांना तर कधी त्या निर्णय क्षमतेला तिला जातो दोष.. पण खरी परिस्तिथी किंवा मनःस्तिथी का नाही येत लक्षात? का तो समजूतदारपणा नसतो नात्यात.. ? प्रेम तर हवंच पण विश्वास, समजूतदारपणा... आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो खंबीरपणा ... तो असेल ना सोबत दोघांच्या तर मग निभावून जात सगळंच...

हवंहवंसं वाटणार असत ना हे धोक्याचं वळण.. मग तेवढंच असावं सक्षम... सामोरं जायला येणाऱ्या प्रत्येक संकटाला... आणि जेव्हा होते ना ती जाणीव... की ती किंवा तो नाही देणार साथ... मग थांबावं तिथेच.. करावा प्रयत्न एक-दोनदा... नसत सोप्प केलेलं प्रेम विसरणं... पण मग ज्यावर प्रेम केलं त्या व्यक्तीला सोबत नाहीच राहायचं आहे तर का करावी जबरदस्ती? पण मग का झुरावं त्या नसलेल्या प्रेमाला मिळवण्यासाठी?...

करावी उजळणी आपल्याच प्रेमाची... अन चालावं पुढे... कारण आयुष्य एका वळणावर नसत ना थांबत.. ते तर सरतंच असत पुढे... मग आपणही चालावं ... पुढच्या वाटचालीकडे... याचंच तर नाव आहे जीवन... आयुष्य... जगावं ते... कधी एकटं जगून तरी कधी साथीदाराच्या जोडीने... पण जगावं नक्की जगावं... कारण कठीण वळणानंतर सोप्प वळण हे असतंच ... नेहमीच…

मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान.
कारण कठीण वळणानंतर सोप्प वळण हे असतंच>>>
पण काय सांगावं .. आपण घाटात असलो तर ? कठीण वळणानंतर अजूनच कठीण वळण आलं तर ?

पण काय सांगावं .. आपण घाटात असलो तर ? कठीण वळणानंतर अजूनच कठीण वळण आलं तर ?>>>>>>>> कठीण वळणं असलेला घाट पण संपतोचं ना ? सच६४८६ ?

@मयुरी छान. मोजक्या शब्दात वर्णन केले आहेस .
"जीवनगाणे गातच रहावो, झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे. .... जीवनगाणे "

छान विचार!!!
ह्यावर मी बनवलेलं एक टेम्पलेट आठवलं ते खाली टाकतोय.

textgram_1493822146.png