सोहळा

Submitted by रेनी on 16 July, 2016 - 11:59

एकदा पाहून जा हा सोहळा
बघ, साऱ्या बंधनातून मी मोकळा मोकळा

न कुणाची आस, न कुणाची वाट पाहणे
संपले चुकीच्या प्रवाहात अगतिकपणे वाहणे

सुख अन दु:ख संपलाय फरक आता
मौनातही आता येते गीत गाता

चुकीचे लोग चुकीच्या कृत्यांचा आहे आभारी
घडली त्यामुळेच सत्याची वारी

Group content visibility: 
Public - accessible to all site users