वारी

Submitted by भागवत on 16 July, 2016 - 04:17

मा‍झ्या काही पुणेरी मित्रांना वारी मुळे प्रॉब्लेम होतोय. त्यांच्या समोर माझे मत सांगण्यासाठी हा लेख प्रपंच.

बऱ्याच मित्रांना वारीचा त्रास वाटतो. एवढे सगळे वारकरी मिळून जायची काय गरज आहे? देव तिथे वर्षाचे 365 दिवस तर उभा आहे. मला एक कळत नाही आपण आपल्याला सर्दी किंवा ताप आल्या नंतर डॉक्टर कडे जातो. आधी किंवा खूप वेळा नंतर जाऊन काही फायदा नाही. त्याच प्रमाणे वारीला त्या ठराविक वेळेत गेलेत तरच वारीचा साधेपणा आणि वैभवशाली परंपरा अनुभवता येईल. काही जण म्हणतात खुप पाणी वाया जाते आणि अस्वच्छता होते. ज्या वेळेस 40000 हजार लोक क्रिकेट सामना बघतात. तिथे पाणी वाया जात नाही का? सिंहगडावरती जाऊन कचरा करणारे आणि भूशी डँम वर जाऊन विदेशी पेय रिचवणारे आणि तो ऍरियाच कचराकुंडी समजून तिथेच बाटल्या टाकणारे कोणाला दिसत नाहीत का? पावसाळ्या आधी खडकवासला धरणातून पाण्याचा दोंड आणि इंदापुरसाठी विसर्ग केला त्या वेळेस कोणाला काही प्रॉब्लेम का झाला नाही?

ट्रॅफिक जॅम होतो? एखाद्या पार्टीचा कार्यक्रम असेल तर ते लोक रस्ताच अडवतात त्या वेळेस का प्रॉब्लेम होत नाही का? पुण्यात दिवसा सकाळ आणि संध्याकाळ ट्रॅफिक जॅम होतो तर घराच्या बाहेर पडू नये कि काय? स्वारगेटला सतत जॅम असतो. तिथला प्रॉब्लेम सर्वजण सहन करतात की.

वारीची गरजच काय? बहुजन समाज एकत्र घेऊन पंढरीची वाटचाल करणारी वारी खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाचे काम करते.

`पंढरीची वारी, आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत।।’

हा अभंग तुकाराम महाराज यांनी लिहिला आहे. त्यांनी स्वत: सांगितले आहे की वारी असताना दुसरं काहीही करायची गरज नाही. पालखीची भव्यता आणि शिस्त हा तर मँनेजमेंटचा विषय आहे. एवढ्या माणसांना शिस्तीत 18 दिवस पायी प्रवास करणे हे खुप अवघड काम आहे. मुख्य पालखी मागे आणि पुढे दिंड्या असतात. त्यांचे दररोजचे नियोजन आंखूनच पालखी मार्गक्रमण करते असते. सगळ्यात जास्त वारीत अन्नदान पुण्यात होते. प्रत्येक जण आपल्या कामात आनंद शोधतो. बरीच पुणेकर मंडळी अन्नदान करून आनंद वाटतात. तसेच वारकरी चालत प्रवास करून आणि पांडुरंगाच्या दर्शनाने आनंद मिळवतात.

पालखी बऱ्याच वेळेस प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पुढे जात असते. वारकर्‍याला पंढरीची आस लागलेली असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी पाऊस, ऊन आणि वाटेत सोई सुविधेची पर्वा न करता वाटचाल करीत असतात. पालखी रिंगण सोहळा तर लाजवाब असतो. त्यांना आपण काही देऊ शकत नाही कमीत कमी सन्मान देऊन १ दिवस ट्रॅफिक जॅम सहन करू या.

चला चला रे पंढरी
दिंड्या पताका धरा करी
म्हणा म्हणारे वाचे
गोड नाम विठोबाचे

टाका टाकारे आळस
सोडुनिया मोहपाश
सोडी सोडीरे निंदा
त्यागोनिया सर्व धंदा

(अभंग - व्यंकटेश बलशेटवार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा ...मला वाटले की वारी चा पुढचा भाग आला की काय???..
खुपच खुश होऊन चटकन उघडला..कोण लेखक ते आठवत नहिये पण 'वारी' नावाने कथा यायच्या चार पाच भागानंतर बंद झाल्या Sad

असो ...तुमचा लेख ही चांगला आहे

अहो तुम्हाला माहीत नाही का , पुणे तिथे काय उणे ? मग अशा आगळ्या वेगळ्या लोकांची कमतरता कशी असेल?
चालायाचचं आपण ' पाऊले चालती पंढरीची वाट' म्हणत आपली वारी चालु ठेवायची.
आदि ती 'वारी ' टण्याने लिहिली आहे.

या तुमच्या आक्षेप घेणार्‍या मित्रांना म्हणाव की वारी ही पुणे शहर "पुनवडी" नावाचे खेडे होते तेव्हापासुन आहे. हा जो त्रास वर लिहिला आहे तो माझ्यासारख्या "बाहेरच्यांमुळे" आहे.
---
कानडा

Happy