स्वभाव

Submitted by रेनी on 15 July, 2016 - 08:40

स्वभाव नसतो कधीच सरळ
उभे असते बाजूला शांत वादळ

सांग कसे ओळखू ह्या स्वभावाला
औषध नाही ना ह्या रोगाला

हा सुंदर की कुरूप कसे ओळखणार
उजवी विचारताच तो डावी दिशा दाखवणार

ना त्यास जात ना धर्म
चूक वा बरोबर हाच धर्म

स्वभावात आहे तसे बरेच भाव
कधी सरळ तर कधी वाकडी जाते स्वभावाची नाव

कधी फुलाचा तर कधी रागाचा तीर
ज्याने जिंकले स्वभावास तोच खरा वीर

विस्मरून जगाला डोळे मिटता ओळखले स्वतःला
काहीही घडत नसताना पाहिलेय आनंदी स्वभावाला

Group content visibility: 
Public - accessible to all site users