गुन्हेगार

Submitted by रेनी on 11 July, 2016 - 13:04

ह्या रस्तावर कधीच कुणीच नाही दिसत
रात्री ही आकाशात येथे तारे नाही चमकत

रस्त्यावर ना झाड, ना फुले, ना पालापाचोळा
भक्त नसतानाही देव बनू पाहतोय एक दगड वाटोळा

येते ढग भारावून येतात खरे
बरसण्याआधीच पळवून लावतात त्यांना कोडगे वारे

कळत नाही काय आहे ह्या रस्ताची कहाणी
जो येतो, तो जाताना घेवून जातो डोळ्यात पाणी

ह्या रस्तावर आहे शेवटी एक खोल दरी
बरीच पाऊले अदृश्य झाल्याची गोष्ट आहे खरी

दरीत जीव देताना प्रत्येक जण बनवतो ह्या रस्त्याला साक्षीदार
ह्या गर्द रानात अलिप्त राहून रस्ता मानतो स्व:ताला त्यांचा गुन्हेगार

Group content visibility: 
Public - accessible to all site users