तुला नाही म्हणाले? माहिती नाही!

Submitted by जयदीप. on 8 July, 2016 - 02:42

तुला नाही म्हणाले? माहिती नाही!
कधी बेभान झाले ... माहिती नाही!

नजर चोरून मी दुर्लक्ष केलेले
तुला उत्तर मिळाले? माहिती नाही!

पहाटे लागला डोळा तुझा- माझा
कधी मग ऊन आले, माहिती नाही

इथे अपघात झाला आणि गेले ते
कुठे होते निघाले माहिती नाही

ठरवली वेळ, जागा सर्व मित्रांनी
कधी येतील साले माहिती नाही

जिथे होत्या तिथे पडल्या म्हणे भिंती
कुठे छप्पर उडाले माहिती नाही!

जरा मैत्रीत आपण आणला पैसा
किती शत्रूत्व आले माहिती नाही

हजारो शेर तू आहेस लिहिलेले
किती आतून आले माहिती नाही

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहाटे लागला डोळा तुझा- माझा
कधी मग ऊन आले, माहिती नाही

इथे अपघात झाला आणि गेले ते
कुठे होते निघाले माहिती नाही

>>> छान.