शाखा उडवणे म्हणजे काय रे भाऊ !

Submitted by अनिल रामचंद्र on 7 July, 2016 - 07:41

वास्तविक हे लिखाण, शिवसेना- वाघाची पन्नाशी या लेखास प्रतिसाद म्हणुन केले होने पण त्याचे रुपांतर एक लघु कथा म्हणुन झाले म्हणुन येथे पोस्ट करत आहे

--------------------------------

३ नोव्हेंबर १९९९ दुपारी ३.०० वाजता वडीलांची तब्येत अतिशय खालावली तातडीने अँम्ब्युलन्सने इस्पितळात दाखल करणे अत्यावश्यक होते.
पप्पा शिवसेनेचे कार्यकर्ते होते गाव तेथे सेना या बाळासाहेबांच्या हाकेला प्रतिसाद देउन परिश्रमाने गावात सेनेला प्रवेश मिळवून दिला होता.
अँम्ब्युलन्स साठी लगेचच नजिकच्या म्हणजेच सँडहर्स्ट रोड शिवसेना शाखेत गेलो, त्या वेळेस प्रत्येक शाखेत नागरीकांच्या सेवेसाठी(?)
अँम्ब्युलन्स उपलब्ध असायच्या, तर तेथे पोहोचल्यावर मला असे कळाले की ड्रायव्हरला रात्री १० वाजता गावी जायचे असल्या कारणाने अँम्ब्युलन्स मिळणे शक्य नाही, असेल काही माणसाच्या जीवा पेक्षा महत्वाचे काम असा विचार करुन तेथुन जवळच असलेली दुसरी शाखा उमरखाडी, तेथे धाव घेतली, कारण वाद घालण्या इतपत वेळच नव्हता, तेथे गेल्यावर कळाले की ड्रायव्हर उपलब्ध नाही, तेथुन निघालो मस्जिद बंदर येथील भातबाजार शाखा गाठली पण तेथेही आता संध्याकाळी कोण ड्रायव्हर मिळणार शिवाय गाडी ही पंक्चर आहे असे उत्तर मिळाले आत्ता काय करावे? टँक्सीतून वडीलांना न्हेण शक्यच नव्हत जवळ कुठे अँम्ब्युलन्स सदृष्य वाहन दिसत नव्हत अत्युच्च कोटी च्या निराशेने ग्रासत चाल्लो होतो पप्पांचे काय होइल या विचाराने वाट मिळेल तिथे धावत सुटलो मला आठवतय मस्जिद बंदर कडुन मो. अली रोड पर्यंत पोहोचणार तेवढ्यात एक अँम्ब्युलन्स दिसली सैफी अँम्ब्युलन्स असे लिहले होते त्यावर, मिठाई वाल्यांच्या दुकाना शेजारी पार्क केली होती, चौकशी करावी की नाही हा विचार मनात घोळत होता कारण ९२/९३ च्या दंगलीच्या जखमा तश्या ताज्याच होत्या, विचार करतच अँम्ब्युलन्स जवळ पोहोचलो एवढ्यात एक कळकट्ट सँन्डो बनियन व निळया रंगाची चट्टेरी पट्टेरी लुंगी चढवलेला दाढीवाला इसम पुढे आला त्याने, क्या चाहिए? अस विचारलं, ये अँम्ब्युलन्स वाला कहा है ? अस विचारताच क्यो? असा प्रती प्रश्न मिळाला पिताजी की तबियत बहोत खराब है हाँस्पिटल ले जाना है अस सांगताच बैठो एवढच म्हणाला, तो आहे त्या अवस्थेतच अँम्ब्युलन्स मध्ये बसुन गाडी सुरु केली आणखी दोन माणसांना हाक मारली तीही माणस आपल हातातल काम सोडून आमच्या बरोबर निघाली, वाटेत मी पैसे किती लागतील ते विचारताच म्हणाला, पहेले तुम्हारे अब्बू ठिक हो जाये फिर दे देना जीतनी मर्जी आणि आम्ही घर गाठलं. वडीलांना केईएम मधे दाखल करे पर्यंत ६ वाजले आणि त्यांना गमवे पर्यंत रात्री चे ९.००.
शिवसेनेचा वाघ १९९५ ला सत्तेत आल्यावर तो सामान्य माणसांसाठी लढणारा, धडपडणारा वाघ न रहाता कामचुकार संधीसाधू बोका झाला याची शिक्षा जनतेने त्याना दिलीच आणि हाच १९९५ नंतरचा माजोर्डेपणा त्यांच्यात आजहीआहे. आजही करून दाखवलं चे बोर्ड जिथे तिथे पहायला मिळतील वास्तविक पहाता काम करायची इच्छा हरवलेला पक्ष आहे शिवसेना, काहीतरी फुटकळ काम करायची आणि करुन दाखवलं सारखी फालतू प्रसिद्धि करायची मुळात माकड म्हणतो......सारखी अवस्था का व्हावी? १९९५ अगोदर इतकी वर्ष कधीही अश्या थिल्लर प्रसिद्धिची गरज लागली नाही शिवसेनेला, मला तर आजही शिवसेनेची शाखा आणि अँम्ब्युलन्स बघितल्यावर किळस वाटते. आमच्या मित्रांमध्ये तर एखादा थापा मारत असेल तर शाखा उडवणे हा वाक्प्रचार प्रसिद्ध झालाय त्या साठी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा व्ययक्तिक अनुभव म्हणून ठीक आहे,

पण सरसकट शिवसेनेच्या शाखांना नावे ठेवणे काही पटले नाही. आणि लेखात लिहिलेल्या मुंबईच्या ज्या भागात तुम्ही अँम्ब्युलन्स साठी फिरलात त्याच भागात शिवसेनेच्या शाखा सोडून १९९९ साली, अँम्ब्युलन्स उपलब्ध असणारी अनेक हॉस्पिटलस् व संस्था होत्या आणि आहेत.

{पप्पा शिवसेनेचे कार्यकर्ते होते गाव तेथे सेना या बाळासाहेबांच्या हाकेला प्रतिसाद देउन परिश्रमाने गावात सेनेला प्रवेश मिळवून दिला होता.}
हे वाचलं नाही का? मग अँब्युलन्सची गरज भासल्यावर अन्यत्र का जावं त्यांनी?

मग अँब्युलन्सची गरज भासल्यावर अन्यत्र का जावं त्यांनी?

अहो, शिवसेनेचे प्रेम नि त्यांचीच अँब्युलन्स मिळाली पाहिजे या आग्रहापेक्षा वडिलांची तब्येत महत्वाची नाही का?
खरे महत्वाचे काय नि काय नाही? वडीलांची काळजी की अभिमान, हक्क?

तो कळकट्ट सँन्डो बनियन व निळया रंगाची चट्टेरी पट्टेरी लुंगी चढवलेला दाढीवाला इसम जे म्हणाला ते किती खरे!

जाऊ दे - कदाचित वडील जाणारच आहेत, मग आपला स्वाभिमान, हक्क का सोडा असा विचार आला असेल मनात.

- कितीहि हुषार, श्रीमंत, अधिकारी व्यक्ति असली तरी ऐन क्षणाला जे मनात येते तसेच होते त्या व्यक्तीकडून. त्यानंतर आपल्यासारखे - ना घेणे ना देणे पण दुसर्‍याच्या क्षणिक प्रसंगावर वर्षानुवर्षे चर्चा!!

नंतर शिवसेनावाल्यांना हे सांगितल्यावर ते काय म्हणाले?

ते मात्र आपल्यालाही खटकले राव! इमर्जन्सीला अँब्युलन्स अगदी शिवसेनेचीच मिळवायचा प्रयत्न कशाला करावा?

पण तरी मुद्दा राहतोच की शिवसैनिकाला तरी अश्या वेळी मदत मिळायलाच हवी.

एक, दोन शाखांमधील परिस्थितीवरून थेट अख्खा पक्ष खराब आहे असे म्हणता येत नसले तरी आजकाल सुरू असलेल्या घटना बघता हा पक्ष कुठे चाललेला आहे हे समजतच नाही. भाजपही अगदी 'मी मरेन पण तुला विधवा करेन' थाटात आहे. तेही पवारांनी 'स्थिर सरकारसाठी काय पण' असे विधान केल्यामुळे बहुधा!

बेफीजी,

त्यांनी १९९९ साल लेखात लिहिलेय, त्याकाळी बाळासाहेंबाचा दरारा इतका जबरदस्त होता, आणि धागा लेखकाचे वडिल(पप्पा) इतके हाडाचे शिवसैनिक होते तर धागा लेखकांनी त्यांच्या वडीलांच्या मॄत्युनंतर मातोश्री वर जाऊन वरिल प्रसंग बाळासाहेबांना सांगितला असता, तर खरडपट्टी निघाली असती ह्या घटनेला जबाबदार असणार्‍यांची, पण त्यांनी असे काहीच न करता त्यांना शिवसेनेची शाखा आणि अँम्ब्युलन्स बघितल्यावर किळस वाटायला लागली.

आजच्या उदोजीराजांच्या शिवसेनेबद्दल तर न बोललेच बरे. सर्कस झालेय ती एकप्रकारची.

त्यात हक्क, आग्रह दिसले? मला जिव्हाळा आपुलकी दिसले. अडचणीच्या वेळी शाखेत जावंसं वाटलं. शाखेत नागरिकांसाठी अँब्युलन्स असते हे आठवलं असणार
शिवाय १९९९ साली आतासारख्या अँंब्युलन्सच्या रांगा नसणार लागत..

आणी शाखेत अँब्युलन्स सारखी उपयुक्त गोष्ट ठेवायची तर तिचा योग्य वापर होतो की नाही हे बघायची जबाबदारी कुणाची?

अवांतराबद्दल आधीच क्षमस्व !
अ‍ॅम्ब्युलन्सच्या उद्घाटनाला जो कोणी भाषण करतो तो काय म्हणत असेल ?
जास्तीत जास्त लोकांनी या अ‍ॅम्ब्युलन्सचा उपयोग करावा ? Sad

मनस्कार!

सध्या येऊ घातलेल्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला जास्तीत जास्त बदनाम करा, असे आदेश निघालेले दिसताहेत. त्यानुसार लेख, व प्रतिसादकांची नृत्येही दिसत आहेत.

शाखा उडवणे वरून मला पटकन शाहरूख खान आठवला, असो पण जिथे तिथे त्याचा विषय नको.

तुमच्या वडिलांबद्दल ऐकून वाईट वाटले.

पण तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या भरवश्यावर राहायला नको होते.
जे लोकं आपल्या देशाचे राज्याचे शहराचे होऊ शकत नाहीत, जे सत्तेसाठी शत्रूची चाटतात आणि जिवलगांच्या पाठीत सुरा खुपसतात अश्या राजकारण्यांकडून निस्वार्थ मदतीची अपेक्षा आपण नाही ठेवू शकत. जर तुमच्याकडून यांना काही फायदा असेल किंवा तुमची काही चालत असेल तर च हे तुमच्या कामाला येतात..

हे मी एका व्यक्तीला किंवा एका पक्षाला नाही बोलत आहे. आपले सारे राजकारणच सडलेले आहे. उद्या यात मी जरी उतरलो तरी मी असाच नालायक बनेन किंवा तसे बनने नाही जमले तर बाहेर पडेन किंवा फेकलो जाईन.. जिसका ईमान बिकता है वही यहा टिकता है..

असा अनुभव असणे शक्य आहे, पण म्हणून शिवसेनेची शाखापद्धती वा तो पक्ष याला नावे ठेवणे, त्याबद्दल किळस वगैरे वाटणे हे बौद्धिक म्याच्युरिटीचे लक्षण नै वाटले. असो.
आमच्या इकडे शिवसेना/मनसे/बीजेपी/वगैरे कोणीच नस्ते... Proud अगदी तांदळात खडा शोधावा तर तो सापडेल, पण हे सापडणार नाहीत. मात्र साहेबांची लोक भरपुर असतात. अन वेळेला मदतीला धावुनही येतात. गेल्या साली आई वारली, तर तिच्याकरता "पास" आणायला माणूस गेला असताना आमच्या त्या नगरसेवक/नेत्याने तत्काळ "गुरुजिंनाही" फोन करुन सुचना देऊन ठेवल्या होत्या की अमक्या तमक्या ठिकाणी अमुक तमुक वाजता पोहोचा. हे आम्हाला नंतर कळले, कारण गुरुजी स्मशानात वेळेत येऊन पोहोचले, अन आम्हालाच निघायला उशीर झाला. अ‍ॅम्ब्युलन्स वगैरे सगळ्याची सोय फोनाफोनी करुन त्यांनीच केली.
इतकेच काय, वेळेस जर मृतकाचे घरच्यांकडे ऐनवेळी पैसे उपलब्ध नसतील, तर ते देखिल तेच भरतात अशीही उदाहरणे आहेत. शिवाय धावपळ करायला माणूस नसेल, वा आलेल्या निरोप्यासोबत माणुस देऊन अंतिम विधीचे सामानही घरपोच करतात हा अनुभव आहे. याबाबतीत इकडच्या साहेबांच्या लोकांवर कसलेही "कॉन्गी/कम्युनिस्ट" कल्चरचा प्रभाव नाहीये, अन नाहि ते सुचवायला येत की कशाला धार्मिक विधी करताय, थोतांड अस्ते सगळे, बामणांचे प्वॉट भरायचे धंदे ते, वगैरे बरळत नाहीत. यामुळे आपणतरी मानतो बोवा आमच्या इकडच्या (पिंचीमधिल) साहेबांच्या लोकांना....

पिंडविधी न करणारे ते सगळे काँगी व कमुनिस्ट ( बिर्गेडी लिवायचं राहिलं ! )

अन उरलेले ते सगळे कोण ? भाजप सेनावाले का ?

अनिल रामचंद्र, सर्वप्रथम तुम्ही एक लक्षात घ्या शिवसेना म्हणजे कुणी सर्व्हिस प्रोव्हायडेड कंपनी नव्हे. ती एक संघटना आहे. जी तुमच्या आमच्या सारख्याच सामान्य माणसातून बनली आहे. फक्त त्यांना संघटित करणार कुणी एक अवलिया या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला होता. तुमच्यावर आलेल्या एका वैयक्तिक प्रसंगावरून तुम्ही हे ठरवून टाकले की संपूर्ण शिवसेनाच कामचुकार आहे. म्हणजे हे असे झाले. तुमच्या धाकट्या भावाने कुठे तरी चोरी केली आणि गावाने तुमचे संपूर्ण खानदानच चोर आहे असा शिक्का तुमच्या माथ्यावर मारला. चालेल का हो असे......
तुमच्या वरील बेतलेला प्रसंग नक्कीच दुर्दैवी आहे यात शंका नाही. माझे मुळीच असे म्हणणे नाही की सर्व शिवसैनिक धुतल्या तांदळा प्रमाणे आहेत. पण म्हणून तुम्ही समस्त शिवसैनिकांना नालायक म्हणू नका ही कळकळीची विनंती. मी पालघर वरून स्वखर्चाने के.इ.एम, नायर या इस्पितळा शेकड्याने रुग्ण आणून त्यांचे प्राण वाचविले आहेत. आणि ज्यांचे नाही वाचले त्यांचे अंत्यविधी ही केले आहेत. त्यात हिंदू,मुस्लीम ,ख्रिश्चन, विविध प्रांतातील लोक ही आलेच. सांगण्या साठी बरेच प्रसंग आहेत पण थोडक्यात थांबतो. जय महाराष्ट्र.....! (मी आजही फक्त एक शिवसैनिकच आहे. पदाधिकारी नाही.)

जय महाराष्ट्र जय भाऊ! मुंबईमधे थोडा आवाज चढवून मराठी बोलायला सुरुवात केली, की लोक गुमान ऐकतात, याचं क्रेडीट फक्त शिवसेनेला.

मुंबईतला मराठी टक्का आता बराच कमी झालाय.थोड्या दिवसांनी मुंबईत रहाणे सर्वसामान्य मराठी माणसाला परवडणार नाही.ट्रेड युनियनच्या काळात मराठी टक्का बराच होता. पण नंतर मिल मालकांनी राजकारण्यांना हाताशी धरून गिरण्या संपवल्या तेथुन टक्का घसरायला सुरु झाला.

आमदार नितेश राणे ह्यानी मुंबईतल्या खड्डयांचे फोटो प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार संघात करण्याचे योजले आहे. मुख्यमंत्री, पालिका आयुक्त, महापौर, उध्दव ठाकरे यांना निमंत्रण धाडण्यात आले आहे.

जय
तुम्ही जुने शिवसैनिक दिसतात. मला तुम्हा लोकांबद्दल फार आदर आहे. माझे वडिल देखील याच जमातीतील आहेत. जनसेवेसाठी तत्पर. फरक ईतकाच आता त्यांनी सेनेचा किंवा कुठल्याही पक्षाचा टॅग लावणे सोडले आहे.
पण तुमच्यासारखे लोक पदाधिकारी नाहीत किंवा न होण्यात धन्यता मानतात हे पटत नाही.
घरची मागची पिढी शिवसैनिकांची असल्याने एक सॉफ्ट कॉर्नर आहे. पण हल्लीची सेना, काँग्रेस, भाजपा मला सगळे सारखेच वाटतात. बाळासाहेबांनंतर मराठीचा मुद्दा किंवा मराठी अस्मिता देखील लुप्त पावल्यासारखे झालेय. फार तर दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने त्यांना मत देऊ शकतो ईतकेच.

ऋन्मेष, सेना काय किंवा इतर पक्ष काय पदाधिकारी होणे तुम्हाला वाटतय तितक सोप राहिलेल नाही.

हे विजय टी उर्फ पगारे सर्व विषयातील तज्ञ आहेत. आपापला प्रतिसाद आधी त्यांना इमेलवरून पाठवून अ‍ॅप्रूव्ह करून घ्यावा अशी सर्वांना विनंती!

९९ सालातील सेनेबद्द्ल जर असं तर आताच्या त्या शेंबड्या आदित्य आणि उधोजीरावाच्या सेनेकडे बघून काय वाटत असावे याची कल्पनाही करवत नाही...