तो

Submitted by रेनी on 7 July, 2016 - 02:30

मी भडभडा बोलतो त्याच्याशी जीव एकटवून
तो बनतो तटस्थ किनारा उथळ नदीला पाहून

मी खऱ्याचे खोटे अन खोट्याचे खरे करतो
अंधारात आणि प्रकाशात तो फक्त सत्य शोधतो

तो देत नाही प्रतिक्रिया कुठल्याच गोष्टीवर
आभाळात ध्रुव तारा राहतो कायम एकाच दिशेवर

माझ्या सवांदात असते कधीतरी आक्रोशाची तळमळ
पाहिलीय तेव्हा त्या शांत झाडावर थोडीशी पानांची सळसळ

सवांद लांबतो, तरी तो थांबतो, राहतो ऐकत
त्या दिपस्तंभा समोर मी जातो नश्वर वादळी लाटे सारखा फुटत

Group content visibility: 
Public - accessible to all site users