मायबोली गणेशोत्सव २०१६ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by admin on 7 July, 2016 - 01:53

या गणेशोत्सवात मायबोलीला २० वर्षे पूर्ण होतील.
मायबोली गणेशोत्सव २०१६ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! आली पण घोषणा!!
यावर्षी संयोजन जमणार नाही पण संयोजकांना आर्टवर्क रिलेटेड काहीही मदत करू शकेन.. Happy

Mi adhich sangital mala awadel.
Navin koni milat asel tar this ahe.... Nasel tar mala ghya

काही मदत लागली तर सांगा, समितीत ह्या वेळी नाही जमणार. काही कल्पना सुचली तर कळवेन Wink

रीया, अमितव, माणिकमोति, भास्कराचार्य हे यंदाचे संयोजक असतील. अजून कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर कळवा,