Submitted by जयदीप. on 6 July, 2016 - 14:46
उगवली कागदावरती पुन्हा हिरवळ
किती समृद्ध झाली आतली अडगळ
तुला तर दूर आहे जायचे पुष्कळ
रिकामी व्हायची तोवर तुझी ओंजळ
विकत आहेत त्यांनी घेतले नेते
कुठे नेतील नेते आपली चळवळ
नवा उपचार केला पाहिजे आता
चहाने जायची नाहीच ही मरगळ
कधी भागेल तृष्णा शुष्क डोळ्यांची
कधी बघशील ह्या डोळ्यांमधे मृगजळ
जयदीप
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा