मी

Submitted by रेनी on 6 July, 2016 - 10:11

ध्यानात मी मलाच शोधतोय मी
आरश्यात पाहता प्रतिबिंबात हरवतोय मी

रोज नवा मुखवटा घेतो विकत
चेहरा बदलताना क्षणभर खरा चेहरा पाहतो मी

आहे मला हव्यास सुंदरतेचा
माझ्याच कुरुपतेला शाप देतो मी

सारे विकार जगलेत ह्या डोळ्यांनी
शिक्षा समझून काळोखात जगतो मी

आज नक्की मी मला होते पाहिले
नवख्याची ओळख आजकाल टाळतोय मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users