ज्योत आणि अंधार

Submitted by पल्ली on 4 July, 2016 - 05:55

ज्योत जेव्हा अंधाराच्या गोष्टी बोलू लागली,,,,,
अंधाराला तिचाच ज़रा आधार वाटू लागला,,,,
अंधार बिचारा जीव जडवून बसला,
ज्योतीला मात्र वास्तवाचा विसर नव्हता पडला,,,,
म्हणाली मी जगले तर तू विझशील,
तो म्हणाला, अग पण मी मिटता मिटता
एकदा तरी भेटशील,
आणि किती क्षणांना उजळवशील,
ज्योत ज़रा स्थिरावली,
अंधाराला बिलगलि,
अंधार आतून आतून सुखावला,,,,
दूर होत तिलाच पाहत राहिला,,,
ज्योतीसभोवार गोल घुटमळत राहिला,,,,,

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users