सहज

Submitted by रेनी on 2 July, 2016 - 14:08

प्रेमाला नाही शब्दांची गरज
ते उमलते अगदी सहज, अगदी सहज

आठवणींना नसते अंतराची गरज
प्रवास करतात मनातून मनात अगदी सहज

गरजूना लागते स्पर्शाची गरज
प्रेमाची गुंतवणूक होते सहज

भेट वस्तूची नाही गरज
हातात हात येतील सहज

तुला नाही बोलायची काही गरज
तुझ्या डोळ्यात दिसतेय सारे अगदी सहज

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेतली भावना छान आहे. पण तेवढं ते `हाथात हाथ` (अगदी सहज) जमलं तर `हातात हात` करून घ्या राव. आणि हो, जीवाला जीव लागत नसतो. जिवाला जीव लावावा लागतो!