नाते

Submitted by रेनी on 30 June, 2016 - 03:02

काल रात्री दुःख गेले होते निरोप देऊन
सकाळी पायाशी बसले होते पुन्हा जुन्या नात्याची शपथ देऊन

किती हट्ट पुरवले, समजावले पण ते नाही जात
माझ्यावर आणि सुखांवर शेवटी ते करते मात

खूप निरोप पाठवल्यावर सुख आलेय भेटायला
क्षणिक असतात नाती ह्यावर लागलेय ते जास्त बोलायला

किती समजावले पण सुखही नाही समझत
उद्या येईन सांगून लागते गोल गोल फिरवत

नाते माझे कुणाशी, दुःखाशी की सुखाशी
जे ह्या क्षणी आयुष्य जगेल त्या नात्याशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users