पॅरोल

Submitted by वैवकु रीटर्न्स on 29 June, 2016 - 02:20

काय जे होईल त्याची काळजी नाही मला
वेदना कुठलीच आता प्यायची नाही मला

काय आहे फायदा भेटून हा पॅरोल मग
जर तुला भेटायची परवानगी नाही मला

मी मनावरचे जरी हे ओढले आहे शटर
पण कुलुप लावेन ह्याची शाश्वती नाही मला

कोणती जादू तुझ्या प्राप्तीत आहे नेमकी
वेगळी इच्छा तिच्याविण होतही नाही मला

खूपकाही मांडले पण राहिले काहीतरी
एकसुद्धा ओळ 'माझी' वाटली नाही मला !

~वैवकु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मनावरचे जरी हे ओढले आहे शटर
पण कुलुप लावेन ह्याची शाश्वती नाही मला

>> आवडल्या या ओळी.

पॅरोल 'भेटला' अशी शब्दरचना जेलवासीयांच्यात कॉमन असली तरी या गझलेत खटकली.

सातींच्या म्हणण्यात तथ्य वाटले मात्र

"काय आहे फायदा पॅरोल मिळण्याचा तरी" अशी वाक्यरचना करून ते टाळता येईल परंतू फारशी आवश्यकता दिसत नाहीये मला तरी.

सर्वांचे आभार

साती आपला मुद्दा बरोबर आहे खरा पण त्या भेटून मुळे लहेजाची जी मजा येते आहे ती गमवायची नाही आहे हा विचार मी ही गझल इथे आणि इतरत्र सादर करण्यापूर्वीच खूपदा जे जे बदल सुचत होते त्या प्रत्येक बदलाच्या वेळी केला आहे

धन्यवाद