भावेस्कुल

Submitted by नात्या on 19 February, 2009 - 01:16
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पीपी बीबी वर झालेली चर्चा! जमली तेवढी इथे पुन्हा टाकली हे

limbutimbu | 19 फेब्रुवारी, 2009 - 09:57
अरे व्वा, टण्या नाट्या, तुम्ही पण का! वा वा
अरे एस्व्ही ने आम्हालाही खुप पिडले, मला नव्हते, माझ्या भावाला अकाऊण्ट्स शिकवायला होते, त्यान्च्यामुळे अकाऊण्ट्स पक्के झाले असे भाऊ म्हणायचा, पण एकेक कथा हेत! भाऊ जाम हुषार होता, नेहेमी पहिला नम्बर, पण त्यान्चा दोघान्चा छत्तीसचा आकडा! गृहपाठ पुरा करत नाही, वर्गात हजर असत नाही वगैरे अनेक कारणान्मुळे जाम डूख धरुन असायचे ते सर, एकदा तर एका तिसर्‍याच वर्गात मला बोलावुन मागे बसवले, मग भावाला बोलावले, अन त्याच्या कडून सगळे कबुल करुन घेतले, अन नन्तर मला सान्गितले की याला न घाबरता हे सगळे आता बाबान्ना जाऊन सान्ग! मी नन्दिबैलासारख्या माना डोलावत होतो,
वर्गातुन बाहेर पडताना भावाने नेहेमीच्या सवईने माझ्या खान्द्या वर हात ठेवलेला!
घरी कस्ल काय सान्गतो कप्पाळ?????
नाट्या, मग तुला गॅदरिन्गला पोवाडे म्हणणारा काळे माहित असेल कदाचित!
७४ ला शताब्दीवर्ष की कायतरी होते, आम्हि वरच्या बॅच मधल्या मुलान्नी तिसर्‍यामजल्यावर जाम गोन्धळ घातला होता असे पुसटसे आठवते!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
****************
naatyaa | 19 फेब्रुवारी, 2009 - 10:07
७४ ला शताब्दीवर्ष की कायतरी होते, आम्हि वरच्या बॅच मधल्या मुलान्नी तिसर्‍यामजल्यावर जाम गोन्धळ घातला होता असे पुसटसे आठवते >> हीच परंपरा चालु राहिल्याने आम्ही शाळेत असताना कधीच गॅदरींग झाले नाही..
****************
kandapohe | 19 फेब्रुवारी, 2009 - 11:22
नमस्कार लोक्स. कसे आहात सर्व जण?

आशु, त्या तुनळीला लिंब्याचा उपाय कर.

मी इतकी वर्ष होतो ना शाळेत त्यामुळे अजुन कालावधी आठवत नाहीये. अहाहा काय ते दिवस. तो फुटबॉल मुख्य मैदान व फरशीवरचा, ती झोपडपट्टी, ते शनिवारीच नेमके पडणारे नारळ, लॅबच्या मागे केलेली शेती व त्यात आलेली कणसे बेबी असताना (बेबी कॉर्न ही कंसेप्ट यायची होती तेव्हा) खाण्यातली मजा , मागच्या गेटवरुन पळुन जाण्यातली मजा, साधारण मास्तर वाटणारे काही विद्यार्थी, बगळ्या, टकल्या, चिमणी अशी शिकवणारी जनता, दुटांगी धोतर घालणारे केमीस्ट्रीचे शिक्षक, तो भय्या, रामचे आईसक्रिम, पानाच्या गोळ्या, पंचपोरांचा वडापाव ..............यादी संपणारच नाही. आयुष्यातील सुवर्णकाळ. ललीत लिहावे का? परवा कुठल्यातरी चॅनलला विचारत होते की तुम्हाला कुठल्यातरी वस्तुचे सोन्यात रुपांतर करता येत असेल तर कुठली कराल. या सगळ्या काळात जे सोने (काही लोक आयुष्याची माती झाली म्हणतात) झाले त्यामुळे आणखी सोने नकोच.
***************

limbutimbu | 19 फेब्रुवारी, 2009 - 11:47
कान्द्या, लिहीच रे ललित!
मागच्या गेटवरुन उडी मारुन जायचो, तेव्हा बरेचदा शिपाई ओरडत यायचे, एकदा तर मुख्याध्यापक (बहुधा वाघ आडनावाचे) देखिल आले होते पळत पळत! मी बुटका, लहान, सगळ्यात शेवटी शिल्लक राहिलो होतो! तिथे भिन्तीचे दगड काढून खोबण्या केलेल्या, त्या धरुन कसातरी पलीकडे उडीमारुन पोचलो बोवा! हुश्श, अजुन आठवले तरी काटा उभा रहातोय अन्गावर!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
*************
naatyaa | 19 फेब्रुवारी, 2009 - 11:48 नवीन
सही रे केप्या, लिंब्या.. नविन धागा सुरु केला आहे मी.. तिकडे पण लिहा.. इथले लगेच वाहुन जाईल.. http://www.maayboli.com/node/5921

भावे स्कूलच्या माझ्या सगळ्यात जास्त आठवणी ह्या कॅन्टीनच्या बाजूच्या दरवाज्यावरुन उड्या टाकून पळून जाण्याच्या आहेत.. वर्गात बसण्याच्या आठवणी कमीच त्यामानाने Proud

मी १९९० ते १९९५ मध्ये भावे स्कुल मध्ये होतो. ५ वी ड ते १० ब असा प्रवस झाला...कोणी आहे का इथे त्या वर्षातले ?

मी १९९० ते १९९५ मध्ये भावे स्कुल मध्ये होतो. >> नक्की कुठल्या भावेस्कुलात होतात तुम्ही? पेरुगेट भावेस्कुल ही फक्त मुलांची शाळा होती.. आपल्या प्रोफाईलमध्ये तर आपण स्त्री आहात असे लिहीले आहे Happy

Happy मला वाटतं की account बनवतना..चुकुन झाला..बरोबर कसे अपडेट करु ?