खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालिकेच्या कथेचा गाभा तकलादू आहे.
इतकी शिकलेली सवरलेली मुलगी प्रेग्नंट आहे आणि तिला कळत नाही हे मुर्खपणाचं लक्षण आहे. इतर कोणतीही लक्षणं नसली तरिही पिरियड्स न येणं हे मुख्य लक्षणही तिच्या लक्षात येऊ नये? Uhoh
प्रेक्ष़कांना इतकं मुर्ख का समजलं जातं? Uhoh

गर्भपात करणं हा कायद्याने गुन्हा असला तरिही बेकायदेशीर प्रॅक्टिस करणारे ढिग लोक असतात. सगळेच डॉक्टर विक्रांतला ओळखत असतील असं नाही ना? मार्ग काढायचा म्हणला तर कसाही काढूच शकतो.

विक्रांत हे एक विचित्र कॅरेक्टर दाखवलं आहे. जर तो मॉनिकाला तिच्या गुणदोषांसकट स्विकारणार म्हणतोय आणि त्याचं मन जर इतकंच मोठं असेल तर हसूनच स्विकार कर ना तिचा. सतत तोंडावर साडेबारा का वाजवून असतोय? Uhoh

एक ती उषा नाडकर्णी सोडली तर कुण्णी घडाघडा बोलत नाही. विक्रांत आणि मॉनिका एकत्र बसून नीट का बोलत नाही हा एक मोठा प्रश्न आहे.
शिवाय सिरियलमध्ये कोणताही संवाद (जो अती महत्वाचा असतो) तो समोरच्याने तोडलाच पाहिजे. मग ते बोलणं राहून जाणं वगैरे इतकं स्वाभाविकरित्या घडतं की बास.
मला असं कुणी बोलताना तोडायचा प्रयत्न केला तर त्या माणसाचं भिंत न मुस्काड एक करून आधी मी काय सांगतेय ते ऐक नाहीतर दुसरी पण लगावीन असं बोलले असते Rofl

मंजूडी, मी तुझं वाक्य फक्त उचलल ते *माझा मुद्दा* मांडण्यासाठी. तुझं statement contradict करण्याचा उद्देश नव्हता, कारण ते अगदीच योग्य आहे.

(*नको असलेली मुलं जन्माला घालुन अनाथाश्रमात सोड्णं हा मुद्दा)

मी ही मालिका पहाणं दुसर्‍या एपिसोडलाच थांबवलं. आता इथे फक्त कथा आणि चर्चा वाचायला आले होते.

मला एक कळत नाही त्या विक्रांतला मॉनिकाचा इतका पुळका का आहे?>>>> मग त्याने तिला घरातून हाकलून दयावे अशी अपेक्षा आहे का तुमची?

abortion करणं दु:खद आहे, पण गुन्हा ठरवणं मला चुकीचं वाटतं आहे. मी विनिता, नताशा आणि पियुच्या पोस्टशी सहमत आहे. मानसिक, आर्थिक तयारी नसणे, अपघाताने कन्सिव होणे, किंवा (मुलगा हे एक कारण सोडता) इतर काही कारणाने आईला मुल नको असेल तर कायद्याने सक्ती करणं कितपत योग्य आहे? मग अशा मजबुर आयांनी मुलांना सोडुन द्यायचं आणि अनाथाश्रम भरायचे, हे त्याहुनही क्रुर आहे. आजारी आईने सक्ती असल्यामुळे मुलाला जन्म देवुन unhealthy प्रजा निर्माण करणं त्या बाळासाठी योग्य नाहीच.

अर्थात abortion गुन्हा ठरवताना त्यात काही sub clauses नक्कीच असणार, कारण कायदा लिहिणारे सगळा विचार करुनच लिहित असतील.>>>> सहमत

त्याचं मन जर इतकंच मोठं असेल तर हसूनच स्विकार कर ना तिचा. सतत तोंडावर साडेबारा का वाजवून असतोय? >>>>>

नाही तर मालिकेचं शीर्षक सार्थ कसं ठरणार? Happy

abortion करणं दु:खद आहे, पण गुन्हा ठरवणं मला चुकीचं वाटतं आहे. मी विनिता, नताशा आणि पियुच्या पोस्टशी सहमत आहे. मानसिक, आर्थिक तयारी नसणे, अपघाताने कन्सिव होणे, किंवा (मुलगा हे एक कारण सोडता) इतर काही कारणाने आईला मुल नको असेल तर कायद्याने सक्ती करणं कितपत योग्य आहे? मग अशा मजबुर आयांनी मुलांना सोडुन द्यायचं आणि अनाथाश्रम भरायचे, हे त्याहुनही क्रुर आहे. आजारी आईने सक्ती असल्यामुळे मुलाला जन्म देवुन unhealthy प्रजा निर्माण करणं त्या बाळासाठी योग्य नाहीच.

अर्थात abortion गुन्हा ठरवताना त्यात काही sub clauses नक्कीच असणार, कारण कायदा लिहिणारे सगळा विचार करुनच लिहित असतील.>>>> सहमत + सहमत. आणि जरी एखादी बेजबाबदार मुलगी अश्या गायनॅककडे आली तरी तिचे मूल जन्माला घालून त्याचे हालहालच होतील. कारण अशी मुलगी अश्या नकोश्या बाळाची पण जबाबदारी घेईल हे कश्यावरून? त्यापेक्षा ऊलट तिचे अबॉर्शन आधी केले पाहिजे नाही का?

ता.क. हे मालिकेच्या धाग्यावर लिहित असलो तरी जनरल आहे. मोनिकाच्या संदर्भात नाही.

मॉनिका आत्तापर्यंत मलातरी जराशी वेडसर वाटली.>>>> मला जरा वेगळी शन्का वाटते, मोनिकाला split personality तर नसेल ना,म्हणजे दिवसा वेगळी व्यक्ती ,रात्री दुसरी व्यकती. सो, जेव्हा ती दुसर्या व्यक्तीमत्वात असते तेव्हा तिने कुणाशी तरी शारीरीक सम्बध ठेवले असतील, पण पहिल्या व्यक्तीमत्वात ती ते विसरली असेल.

किवा असेही असेल कि, हिला तो मानसिक आजार माहीत असेल, पण सासरी कळल तर आपल्याला घरातून हाकलून देतील या भीतीने ती सान्गत नसेल.

एक चित्रपट असा येऊन गेला होता ना ज्याच्या मध्ये नायकाला split personality असते, तो दुसर्या व्यक्तीमत्वात खून करत सुटतो, पण पहील्या व्यक्तीमत्वात असताना त्याला हे आठवत नाही.

पुढे मागे हा suspense उघड होईलच म्हणा.

चीकू >>> अगदीच मला हेच वाटलं. आता परत ही सिरियल पहायला सुरुवात करते. Happy

मग त्याने तिला घरातून हाकलून दयावे अशी अपेक्षा आहे का तुमची? >> हो अर्थात. एकतर मोठ्या मनाने अ‍ॅक्सेप्ट करावं नाही तर सोडुन द्यावं. सल्किंग ने स्वतःला त्रास, तिला त्रास आणि शेवटी ज्यासाठी लपवतो तो उद्देशही सफल नाही कारण त्याची रोंदु आई सुन लग्नाच्या एका महिन्यानंतर, सुन ३ महिने प्रेग. कळल्यावर टपकणार आहेच. ( लग्न का मोडत नाही यावर तोच म्हणाला होता अशा अर्थाचं काही)

हो अर्थात. एकतर मोठ्या मनाने अ‍ॅक्सेप्ट करावं नाही तर सोडुन द्यावं. सल्किंग ने स्वतःला त्रास, तिला त्रास आणि शेवटी ज्यासाठी लपवतो तो उद्देशही सफल नाही >>>> अनुमोदन.

हो अर्थात. एकतर मोठ्या मनाने अ‍ॅक्सेप्ट करावं नाही तर सोडुन द्यावं. सल्किंग ने स्वतःला त्रास, तिला त्रास आणि शेवटी ज्यासाठी लपवतो तो उद्देशही सफल नाही >> +१

हो अर्थात. एकतर मोठ्या मनाने अ‍ॅक्सेप्ट करावं नाही तर सोडुन द्यावं. सल्किंग ने स्वतःला त्रास, तिला त्रास आणि शेवटी ज्यासाठी लपवतो तो उद्देशही सफल नाही >>> +१ सोडून नाही, हाकलूनच द्यावं. पण हे सिरीयलमधे होणार नाही. फटक्यात गोष्ट संपून चालणार नाही ना गुंते निर्माण करून गुंतवळी काढण्यात भाग वाढवायला हवेत Wink

पियू, गर्भपात हा स्वतंत्र बाफचा विषय आहे.

मालिकेच्या कथेचा गाभा तकलादू आहे.
इतकी शिकलेली सवरलेली मुलगी प्रेग्नंट आहे आणि तिला कळत नाही हे मुर्खपणाचं लक्षण आहे. इतर कोणतीही लक्षणं नसली तरिही पिरियड्स न येणं हे मुख्य लक्षणही तिच्या लक्षात येऊ नये? अ ओ, आता काय करायचं
प्रेक्ष़कांना इतकं मुर्ख का समजलं जातं? अ ओ, आता काय करायचं>>+१

शिवाय सिरियलमध्ये कोणताही संवाद (जो अती महत्वाचा असतो) तो समोरच्याने तोडलाच पाहिजे. मग ते बोलणं राहून जाणं वगैरे इतकं स्वाभाविकरित्या घडतं की बास.
मला असं कुणी बोलताना तोडायचा प्रयत्न केला तर त्या माणसाचं भिंत न मुस्काड एक करून आधी मी काय सांगतेय ते ऐक नाहीतर दुसरी पण लगावीन असं बोलले असते हसून हसून गडबडा लोळण>>प्रचंड अनुमोदन. अगदी समोरचा listening mode मधे नसला तरीही आपण (खऱ्या आयुष्यातली माणसं) सांगतो. किमान आपण योग्य वेळी ती महत्वाची गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगितली याचं समाधान तरी मिळतं. आणि डोकं शांत झाल्यावर समोरचाही आपल्या बोलण्यावर विचार करतो. पण मालिकेत असं काही दाखवणं हाच मुळी मोठा गुन्हा आहे. मालिका सुरू होताच संपेल ना!

इतकी शिकलेली सवरलेली मुलगी प्रेग्नंट आहे आणि तिला कळत नाही हे मुर्खपणाचं लक्षण आहे. इतर कोणतीही लक्षणं नसली तरिही पिरियड्स न येणं हे मुख्य लक्षणही तिच्या लक्षात येऊ नये? >>>>

काल रात्री सगळे न पाहिलेले भाग पाहुन टाकले, त्यामुळे डिटेल्स एकदम ताजे ताजे लक्षात आहेत. मॉनिकाने सांगितलं कि एका भागात, कि तिचे मेन्सेस कधीच रेग्युलर नव्हते, त्यामुळे तिला मिस झालेले लक्षात आलं नाही. असं होवु शकतं. देवुन टाकु तिला कन्सेशन.

मुस्काड एक करून आधी मी काय सांगतेय ते ऐक नाहीतर दुसरी पण लगावीन असं बोलले असते हसून हसून गडबडा लोळण>>>> खरंय.

FORM C
( See rule 8 )
I _____________________________________________ daughter/wife
of _____________________________________________
aged about __________ years of __________________________________________
____________________________________________________________________________________
( here state the permanent address)
at present residing at _____________________________________________________________________
do hereby give my consent to the termination of my pregnancy at ____________________________________
_______________________________________________________________________________________________
( State the name of place where the pregnancy is to be terminated)
Place :
Date : Signature
( To be filled in by guardian where the woman is a mentally ill person or minor )
I_____________________________________________ son/daughter/wife of __________________________
aged about __________ years of __________________________________________________ at present residing at
( Permanent address ) __________
_________________________________________________________________do hereby give my consent to the termination of the
pregnancy of my ward _______________________________ who is a minor/lunatic at __________________________________
( place of termination of my pregnancy)
Place :
Date :

वरील फॉर्म प्रमाणे नाव देताना डॉटर / वाईफ ऑफ असे म्हणलय, म्हणजे लग्न झालय वा नाही हे देखिल विचारल नाहीये. वाईफ ऑफ ऐवजी डॉटर ऑफ असे देता येणार आहे.

फॉ र्म खाली सदर स्त्रीनेच सही करायची आहे.
जर ती मायनर्/मेंटली इल असेल, तरच "गार्डियन" ने करायची आहे.

मोनिका नेमकी कोणापासून प्रेग्नेंट आहे. पीरिअड्स रेग्युलर नाही ठीक आहे पण आपण कुठे तोंड (_________) केले त्यामुळे जी एक रुख रुख किंवा या गोष्टीमुळे प्रेग्नेंट होऊ शकतो हे तिला माहीत न्हवते

>>> मोनिका नेमकी कोणापासून प्रेग्नेंट आहे. <<
काहीतरी मेडिकल स्वरुपाचा चमत्कार सांगणार असतील झी वाले. (गुल्म नामक एक प्रकार असतो, मला पुरेशी माहिती नाही, पण प्रत्यक्ष गर्भा ऐवजीच गर्भधारणेची बाकी सर्व प्रक्रिया सुरु होते. ऑपरेशन मस्ट ठरते, अन्य प्रकार असल्यास कल्पना नाही)

अन तसेही संग न करताही गर्भार रहाणे अशा स्वरुपाच्या गोष्टी पुराणातही आहेत(च) की ! कदाचित त्याचेही संदर्भ काढू शकतील... काय की.... खरे खोटे देव जाणे/ब्रह्मदेव जाणे/ अन झी लेखक/दिग्दर्शक/निर्माता जाणे....! तुम्ही आम्ही मालिका बघत रहा, मग (यथावकाश) तुम्ही ही जाणे Proud

अन तसेही संग न करताही गर्भार रहाणे अशा स्वरुपाच्या गोष्टी पुराणातही आहेत(च) की ! कदाचित त्याचेही संदर्भ काढू शकतील... काय की.... खरे खोटे देव जाणे/ब्रह्मदेव जाणे/ अन झी लेखक/दिग्दर्शक/निर्माता जाणे....! तुम्ही आम्ही मालिका बघत रहा, मग (यथावकाश) तुम्ही ही जाणे फिदीफिदी
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आधुनिक कुंतीमाता ............

पियू, गर्भपात हा स्वतंत्र बाफचा विषय आहे.

>> मला एकदम ऋन्मेषची आठवण झाली. असो.. सध्या तरी माझ्या बेसिक शंकांचे इथेच समाधान झाले.

गर्भपातासंदर्भातः मूल नकोच हवे अशी आईची धारणा असेल तर तिला गर्भपातासाठी बारा आठवड्याच्या आत करता येतो. कायदा त्यासाठी कुठलेही कारण मागत नाही. त्यासाठी नवर्‍याची परवानगी लागत नाही, मात्र बरेच गायनॅक (जे एथिकल प्रॅक्टिस करतात) घरामधल्या कुणातरी व्यक्तीला सोबत आणायला सांगतात. अथात हे केसपरत्वे बदलू शकते. गर्भपात ही मायनर सर्जरी नाही. त्यामधले एकंदर धोके लक्षात घेता सर्जरीवेळी सोबत कुणीतरी असणे त्या डॉक्टरांना आवश्यक वाटते. बारा आठवड्यान्म्तर गर्भपातामधले इतर कॉम्प्लिकेशन्स जास्त असल्याने कायदा सरसकट गर्भापाताला परवानगी देत नाही. काही अपवाद उदा: बाळाला/आईला धोका वगैरे केसमध्येच परवानगी आहे. या सर्जरीसाठी (D& E ) गार्डीयनची सही लागते. (नवरा वा कायदेशीर गार्डीयन) ही सर्जरी कशी केली जाते ते गूगलवर वाचल्यास त्याम्धले धोके आणि कॉम्प्लिकेशन्स समजू शकतील.

अधिक माहिती डॉक्टर लोक देती.

कालचा एपिसोड पाहीला. मोनिकाचा खरा चेहरा उघडकीस आला. खरतर तिला आपण प्रेग्नन्ट आहोत हे लग्नाआ धीच माहीत होत. तिला श्रीमन्त माणसाशी लग्न करायच होत , ती इच्छा पुर्ण झाली. आणि नवरा मिळाला तो ने मका gynec. तिने हे सगळ pre-planned केल होत. तिला तिच श्रीमन्त सासर अस तस हातच जाऊ दयायच नव्हत. आपण प्रेग्नन्ट आहोत हे जर सासरच्यान्ना कळल तर ते तिला हाकलून देतील. म्हणूनच ती विक्रान्तकडे "मला हे मूल नकोय" म्हणून सतत धोशा लावत असते.

मुख्य म्हणजे झी चा प्रोमो आणि प्रत्यक्ष सिरीयलचा काहीही संबध नसतो. आठवा कुंकुचा प्रोमो.

झी पाऊस, बस स्टॉप, छत्री आणि दाढीवाल्या हिरोत आडकली.

तसेही हे कलाकार खरेतर वेठबिगार मग त्यातल्यात्यात चांगल काम केल म्हणून प्रमोशन मिळतात.
मग साईड कलाकार हीरो, नोकराचा मामा, काकू ची आजी .

किती प्रयत्न केला तरी तो शिन्दे हिरो वाट्त नाही आणि डॉक्टर तर मुळीच नाही. फारतर पोस्ट्मन गिरणी कामगार शेत मजुर वगैर म्हणून ठिक. एरंडेल घालुन त्रिफळा घेतल्यासारख का चेहरा.
ती मयुरी फारतर हिरोईनची बहीण किंवा मोलकरीण या पलिकडे नाही. ती अमराठी मराठी का बोलते. भाषा अशुद्ध.
माझी बहीण म्हणून नाही म्हणत पण कधी नव्हे ते अभिज्ञा बरी दिसतेय आणि चांगल कामही करतेय.

आतली खबर अशी आहे की शिरेल फसलेय पण झीकडे पैसा आहे शिवाय एव्हढा गोतावळा जमवलाय तेव्हा रेटतील वर्षभर

गुगु, अभिज्ञा ह्याच्यापेक्षा छान ती स्टार प्रवाह वर सिरियल होती त्यात दिसली होती, लगोरी नांव होतं. हि सिरीयल मी नाही बघत पण पहीला भाग बघितला त्यावरुन मला असं वाटलं. लगोरी पण काही एपिसोडस बघितले होते.

मॉनिकाचे ड्रेसेस आवडतायेत आणि ती स्वत:ला कॅरी पण मस्त करते .
शर्वरी फारच आवडत चाललिय Happy . तिचाही कपडेपट मस्त आहे.

आजी कडक शिस्तिच्या पेक्शा कजाग आणि फटकळ जास्त वाटतायेत .

Pages