त्याच्यापरीने तो क्षमाशिल वागला

Submitted by सुप्रिया जाधव. on 22 June, 2016 - 13:07

त्याच्या विचारांनीच आहे व्यापला
कप्पा मनाचा एकही नाही खुला

जाणार आहे तो कितीसा लांबवर ?
येणार आहे परतुनी झुलता झुला !

कोणा-कुणाला एकटा पुरशील तू ?
माझा नको होवूस पण हो म्हण तिला !

विझवू नको ज्योतीस फड़फड़ते तरी
तितका तरी अंधार आहे पांगला

मी मोजल्या अक्षम्य झालेल्या चुका
त्याच्यापरीने तो क्षमाशिल वागला

होईल तिथवर एकटीने चाल तू
येईल धावत वेदना गाठायला !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users