धन्यवाद!!! आभार!!!

Submitted by भागवत on 22 June, 2016 - 09:30

लहानपणी आई मला भोजन करताना विचारायची स्वयंपाक कसा झाला आहे. मी कितीही चांगला झाला तरी बरा आहे सांगायचो. मी आपला जेवण करण्यात मग्न असे. एकदा चांगला स्वयंपाक होऊन सुद्धा आईला मी उत्तर दिले स्वयंपाक बरा आहे. आई म्हणाली अरे शहाण्या चांगल्या स्वयंपाकाला तरी चांगला झाला आहे असे म्हणत जा. आमचे बोलणे ऐकून बाबांनी मला एक अनुभव सांगीतला.

वडीलांची पूर्ण हयात BSNL कंपनीत गेली. त्यांना सार्वजनिक जीवनात खुप अनुभव आले. त्या वेळेस बाबा अकाउंट डिपार्टमेंट ला होते. ऐके दिवशी त्यांना सकाळी फोन आला. फोन वर एक महिला होती. त्या खुप रागात होत्या. त्यांची complaint होती त्यांचा landline फोन खराब झाला होता २ दिवसा पासून आणि दुरूस्ती साठी बोलवून सुद्धा कोणी आले नव्हते. त्या फोन वर भडकल्या आणि खुप जोर जोरात भांडत होत्या. रागाच्या भरात त्यांनी डिपार्टमेंट बद्दल नाराजी व्यक्त केली. वडीलांनी त्यांचे पूर्ण बोलणे ऐकून घेतले. वास्तविक हे त्यांचे काम नव्हते. त्यांची काहीही चुकी नसताना दिलगिरी व्यक्त केली. आणि सांगीतले फोन आज संध्याकाळ पर्यंत दुरूस्त होईल. त्यांनी संबंधित माणसाला सांगून आणि त्यांच्या कडे पाठवून फोन दुरूस्त केला. मग दोन दिवसांनी त्यां महिलेला फोन लावला आणि ताई फोन दुरूस्त झाला का याची विचारपूस केली. तो पर्यंत बाईचा राग निवळला होता.

"वडीलांनी त्यांना प्रश्न विचारला बाई तुमच्या कडे किती दिवसा पासून फोन आहे."
“2 वर्ष पासून.”
"2 वर्षात काही प्रॉब्लेम आला का?"
“नाही”
“फक्त एकदा फोन बिघडला म्हणून तुम्ही एवढ्या बोललात पण 2 वर्षे सतत चांगली सेवा दिली त्या बद्दल कधी आभार मानलेत का?”
बाई, कंपनीत मध्ये काम करणारी सुद्धा लोकच असतात. त्यांच्या कडून सुद्धा चुका होऊ शकतात. एका चुकीसाठी एवढे बोलण्याची गरज नव्हती. तेव्हा बाईला चूक उमजली आणि झालेल्या चुकी बद्दल माफी सुद्धा मागीतली.

आपण कधी कोणी चांगले काम करत असेल तर त्याचे कधीच आभार मानत नाही किंवा धन्यवाद सुद्धा म्हणत नाही. मात्र त्याने एखादी चूक केली कि त्यावर तुटून पडतो. चांगलं काम करणार्‍याला आभार मानल्यास हुरूप येतो आणि प्रेरणा मिळते.

वडीलांनी सांगीतले त्यासाठी तू सुद्धा आभार मानायला शिकत जा.

काही महिन्या खाली मी तिरूपती ला गेलो होतो. तिथे अन्न प्रसादम मध्ये भोजन प्रसाद घेतला. अतिशय सुंदर स्वयंपाक झाला होता. माझे जेवण संपवून मी तेथील वाढणाऱ्याला धन्यवाद म्हटले. तर तो खूप खुष झाला. त्याने मला रजिस्टर मध्ये एन्ट्री करायला सांगितली. 2 मिनिटे का होईना त्याच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. मला सुद्धा खूप प्रसन्न वाटले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख.

धन्यवाद आणि आभार म्हणणे खरंच चांगली सवय आहे. आपल्याला जे कोणी सेवा देत आहेत त्यांना त्यातून आनंदच वाटतो आणि पुढच्याला आणि आपल्यालाही पुढील वेळी चांगलीच सेवा मिळते.

सहीये.
विचार आणि तुमचे बाबाही.
सहमत आहे.
धनि यांच्या पोस्टशीही..

चांगल्या सर्विसबद्दल धन्यवाद सहसा कमी बोलले जाते. अर्थात जे चांगले सर्विस देतात त्यांचा बिजनेस वाढतो आणि पैश्याच्या स्वरुपात मोबदला मिळतोच. पण कौतुकाचे दोन शब्द ऐकायचे मोल पैश्यात नेहमीच मोजता येत नाही.

खर आहे. धन्यवाद आभार द्यायचे राहून जातात ब-याचदा. माबोवर सुध्दा भले/बुरे वाचून पुढे जाणे होते, प्रतिसाद देणे राहून जाते.. न आवडलेल्याला न दिला तर चालेल, पण जे लिखाण आवडले प्रतिसाद द्यायला हवा असे वाटायला लागलेय.. Happy

धन्यवाद धनि ,ऋन्मेऽऽष , बेफ़िकीर, अनघा, हर्पेन, मी अमि ,नँक्स

न आवडलेल्याला न दिला तर चालेल, पण जे लिखाण आवडले प्रतिसाद द्यायला हवा असे वाटायला लागलेय. >>+१

छान सकारात्मक लेख. खरेच अनेकदा अगदी नात्यातही गृहीत धरून काम केले जाते.
उन्हात कुरियर घेऊन आलेल्याला साधे एक ग्लास पाणी दिले तरी हसू फुलते त्याच्या चेहऱ्यावर. या लेखामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी करायचे लक्षात येईल आता.

बाकी कोकणात 'बरा' हा शब्द 'उत्तम'च्या तोडीचा आहे बरे! आई सांगते चाळीसेक वर्षांपूर्वी ती प्रथम कोकणात गेली तेव्हा या 'बऱ्या'चा त्रास व्हायचा. चाय बरी झाली हा, इडल्ये बरे करतंस गो तू.... वगैरे ऐकून तिला राग येई आधी. पुढे ते भाषावैशिष्ट्य आहे हे कळून मौज वाटली.

मस्त ! असे अनुभव मला ब र्‍याचदा येतात. त्यातही जास्त मद्यपी लोकांकडून

ईंग्रजी मधे 'थँक यू' ला 'यू आर वेलकम' असा प्रतिसाद आहे. तसा मराठीत 'धन्यवाद' ला प्रतिसाद काय आहे? ('च्यायला, थँक यू काय यार!, किंवा बस क्या, लगेच थँक यू वसोडून)किंवा अरे आपल्या माणसांचे आभार नाही मानत हे सोडून).

काँप्लिमेंट देण्याप्रमाणेच, ती घेता येणं हे सुद्धा एक कला आहे. जितक्या जेन्युईनली काँप्लिमेंट देता यायला हवी, तितक्याच ग्रेसफुली काँप्लिमेंट घेता यायला हवी.

मस्त लेख, आवडला.

कोणी आपल्या कामाचे कौतुक केलं कि छान वाटतच. काही वर्षांपूर्वी मी एका Third party inspection कंपनी मध्ये कामाला होतो. त्या निमित्ताने बऱ्याच व्हेंडर्स कडे client inspector म्हणून तपासणी साठी जायचो.

एकदा सातारच्या एका कंपनी मध्ये गेलो होतो. Final inspection होतं. मी त्या जॉब्सचं फिनिशिंग बघून त्याची बरोबर tolerence मधली सगळी रिडींग पाहून चाटच पडलो. पुण्या मुंबईतल्या कित्येक मोठ्या कंपनी मध्ये पण असं फिनिश आणि रिडींग मिळत नाहीत. व्हेंडर च्या माणसाला सांगितलं कि हे जॉब ज्या वर्कर ने केले त्याला भेटायचं आहे. तो माणूस कामात असेल म्हणून त्याला डिस्पॅच यार्ड ला न बोलावता आम्ही शॉप फ्लोअर वर गेलो. साधारण चाळीशी मधले काका होते. त्यांच्याशी हात मिळवून त्यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं. त्यांचा फुललेला चेहरा अजून आठवतो आणि ते काम करून करून घट्टे पडलेले हात पण......

माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा असं केलं होतं. पण त्यानंतर मी हे नियमितपणे चालू केलं. शक्य असेल तेव्हा चांगला जॉब दिसला कि जाऊन त्या वर्कर्सला भेटून यायचं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपला दिवस पण छान जातो.

खर आहे. धन्यवाद आभार द्यायचे राहून जातात ब-याचदा. माबोवर सुध्दा भले/बुरे वाचून पुढे जाणे होते, प्रतिसाद देणे राहून जाते.. न आवडलेल्याला न दिला तर चालेल, पण जे लिखाण आवडले प्रतिसाद द्यायला हवा असे वाटायला लागलेय.. स्मित >>>>>+११११११११११

अतरंगी - सुंदर अनुभव ..... Happy

धन्यवाद चनस,Hemantj82,अगो,अमेय२८०८०७,मुक्तेश्वर कुळकर्णी , मंजूताई , कृष्णा , निर्मल, प्राची,निसर्गा ,
फेरफटका, अतरंगी ,पुरंदरे शशांक | !!!

धन्यवाद अतरंगी - मस्त अनुभव >>+१

काँप्लिमेंट देण्याप्रमाणेच, ती घेता येणं हे सुद्धा एक कला आहे. जितक्या जेन्युईनली काँप्लिमेंट देता यायला हवी, तितक्याच ग्रेसफुली काँप्लिमेंट घेता यायला हवी. >>+ १ खर आहे