सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 5

Submitted by Suyog Shilwant on 21 June, 2016 - 21:12

चिरंतरने सुयुध्दला जवळ बोलावल. काया ला घडलेले सगळं पाहुन तोंडी शब्द काही फुटत नव्हते. तिला सुचतच नव्हते काय बोलावे. सुयुध्द जसा चिरंतर जवळ गेला चिरंतरने त्याला पडलेल्या एका प्रश्नाच उत्तर दिलं.

' हे बघ सुयुध्द….मला माहीत आहे तुला खुप प्रश्न पडलेत पण एक नक्की सांगेन मला खरंच दिसत नाही. तरीही मी कसा लढू शकलो हे मी तुला आश्रमात गेल्यावरच सांगेन'

हे ऐकुन सुयुध्दने डोळे विस्फारले तो आश्चर्यात पडला. त्याच्या वडिलांना कस काय कळालं तो काय विचार करत आहे. आपल्या बापाकडे तसेच पाहात तो विचार करु लागला. काही मनाशी ठरवून तो पुन्हा चिरंतरला बोलला.

' पप्पा मला माहीत आहे तुम्ही सर्व गोष्टींची उत्तर मला आश्रमात द्याल पण…तुम्हाला कसं कळलं मी काय विचार करत आहे.'

चिरंतर शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून उत्तरला.
' हे बघ तुला सर्व काही लवकरच कळेल. पण आधी आपल्याला इथुन निघायला हवं. इथे थांबणे आता आपल्यासाठी योग्य नाही.'

हे ऐकल्यावर सुयुध्दने त्यांच्या जवळ्पास उभ्या चैतन्यकडे बघीतले. मगाशी मारलेले दैत्य कसे आहेत हे पाहण्यासाठी म्हणुन त्याने आजुबाजुला नजर टाकली. पण तिथे काहिचं नव्हत. ना दैत्य ना त्यांची हत्यारं. तो डोळे चोळत पुन्हा एकदा बघु लागला पण कुठेच त्याला त्यांच नामोनिशाण दिसत नसत. आत्ताच तर चैतन्य आणि पप्पांनी त्यांना मारल होत. मग अचानक ते कुठे गायब झाले? असा प्रश्न त्याला पडला.

आकाशाकडे पाहत त्यांच्या जवळ उभा चैतन्य आता बोलला. ' चला. सुर्य आता मावळला आहे. आपण निघुया.'

सुयुध्दने गरकन मान चैतन्य कडे वळवली. चैतन्यला तो पहिल्यांदाच निक्षुण पाहत होता. विशी पंचवीशीतला तो तरुण हातात काठी व अंगात भगवे वस्त्र परिधान करुन तटस्थपणे उभा होता. एखाद्या साधु सारखा तो दिसत होता. सगळेजण आता नदीकडे चालु लागतात. सुयुध्दने मागे वळुन गावाकडे बघीतल. त्याला या गावात राहुन केलेल्या मस्तीच्या अनेक आठवणी येऊ लागल्या. घरात बसुन टिव्ही बघणं, गावातल्या मित्रां बरोबर खेळणं हुंदडण, शेतातल्या आंब्याच्या झाडावर चढुन आंबे खाणं. अशा अनेक गोष्टी त्याला आठवत असतात. तेवढ्यात मागुन त्याच्या आईने त्याला हाक मारली.

' सुयुध्द…मागे काय करतोयस. ये चल.'

तसा आठवणीत हरवलेला सुयुध्द मागे वळला आणि पळतच आपल्या आई जवळ गेला. त्याला खुप वाईट वाटत असत गाव सोडुन चालल्याबद्दल. त्याचा पडलेला चेहरा बघुन कायाने विचारले.
' काय झाल बाळा असा उदास का झालायेस? '

सुयुध्दने 'काही नाही' बोलुन उत्तर द्यायचे टाळले. पण कायाला कळाले होते तो का उदास आहे. इथे कायाच्या मनात ही उलथापालथ झालेली असते तरी ती हसुन त्याला जवळ घेते.

सगळे आता नदीच्या काठावर येऊन थांबले. चैतन्यने आपली काठी जवळ उभ्या सुयुध्दच्या हातात दिली. त्याने नदीत उतरुन ओंजळीत पाणी घेऊन मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. सुयुध्दला तो काय बोलतोय हे कळत नव्हते पण त्याला बघुन नवल जरुर वाटलं. त्याने हातात असलेली काठी बघण्याचे ठरवले. तो काठीकडे बघतच होता कि नदीतुन एक मोठी होडी बाहेर आली. सुयुध्द दररोज नदीवर आजोबां सोबत यायचा पण त्याला नदीवर कधीच कुठली होडी दिसली नव्हती. आश्चर्याने तो होडीला बघु लागला. त्या सगळ्यांना आरामात बसता येईल एवढी मोठी ती होडी होती. पण होडीत कोणीच नव्हते. दोन्ही बाजुला वल्हव लटकत होते. सुयुध्दने यापुर्वी कधीच होडी पाहीली नव्हती. तो होडीला उत्सुकतेने पाहू लागला. लाकडाची ती होडी नदीच्या पाण्यावर हिंदोळे देत त्यांच्याजवळ काठापर्यंत आली. काठावर येताच सर्वजण त्यात एक एक करुन चढू लागले. पहिले अभिनव आजोबा वर चढले. त्यामागे आज्जीला चैतन्य नी वर चढवले. सुयुध्दने काठी चैतन्यकडे दिली व होडीत चढला. काया व चिरंतर एकत्र चढले. मागे चैतन्य अजुन काठावरच उभा होता. त्याने पटकन उडी मारली व होडीत आला.

सुर्य आता मावळला होता पण पुर्ण अंधार अजुन नव्हता झाला. क्षितिजावर प्रकाशाचे पडसाद अजुन दिसत होते. पक्षी घरट्याच्या परतीला लागलेले उडताना दिसत होते. नदीच्या खळखळत्या वाहत्या पाण्यात होडी पश्चिमेला जाऊ लागली. त्यांचा आश्रमाकडे जाण्याचा प्रवास आता सुरु झाला.

चैतन्यने वल्हव पाण्यात मारायला सुरुवात केली. सगळे आरामात जागा धरून बसले. सुयुध्द आता नदी बघु लागला. होडीच्या कोपऱ्यावर मान ठेवून नदीत बघताना त्याला साफ पाण्यात वेगवेगळ्या रंगाचे मासे दिसत होते. नदीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत त्याने नजर फिरवली. नदी फार मोठी होती. आता ते नदीच्या मधोमध पोहचले होते. पाण्यात वल्हव मारत चैतन्य होडीला पुढे नेत होता. तो चैतन्यकडे बघुन हसला तसा चैतन्य ही त्याच्याकडे बघुन हसला. आता सुयुध्दने आपली नजर आजुबाजुच्या झाडांवर वळवली. काही पक्षी झाडावर बसलेले दिसले. त्यांना बघतच तो विचार करु लागला.
होडी नदीवर हिंदोळे देत पुढे सरकत होती. आकाशातला प्रकाश हळुहळु कमी होऊ लागलेला. नदीच्या पाण्याच्या आवाजा सोबत त्यांना पक्ष्यांचा किलबिलाट ही ऐकु येत होता. सगळी कडे अंधार पसरु लागला नदीच्या आजुबाजुला असलेल्या घरांच्या लाईट एक एक करुन चालु होऊ लागल्या. काया चिरंतर एकमेकांच्या बाजुला बसलेले. कायाने सुयुध्द्ला बघुन त्याला विचारले.
' बाळा भुक लागलेय का तुला. दुपारी आपण कोणच जेवलो नाही.'
सुयुध्द्ने वळुन आई कडे बघीतले त्याला तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. पण त्याने मान हलवुन नाही असे दर्शवले. वल्हव मारत असलेला चैतन्य मधेच बोलला.

' माझ्याकडे खायला फळे आहेत देऊ का?'

हे ऐकताच सुयुध्दने चैतन्य कडे बघितले. चैतन्य ने वल्हव मारणे आता थांबवले. त्याच्या खांद्याला असलेल्या झोळीतली काही फळं काढून त्याने समोर ठेवली. कायाने उठून ती फळं उचलली. सुयुध्दला जवळ बोलवुन त्याला केळी खायला दिली. बाकी सर्वांनी एक एक फळ खात आपल्या पोटाची तात्पुरती भुक भागवली. पोटाची खळगी भरताच सुयुध्दला विचांरांच्या वादळाने घेरले. अस का घडल? कोण आहे ह्याचा मागे? अशा विचारांचा गोंधळ सध्या त्याचा मनात चालु लागला.
होडी नदीवर हिंदोळे देत अंधारात जात होती. विचार करता करता कधी त्याला झोप लागली कळाले नाही. कायाने पाहीले कि सुयुध्द झोपी गेला आहे. तस तिने त्याला उचलुन जवळ घेतले. एका बाजुला आपली बॅग ठेवत त्याचे डोके त्यावर टेकवुन निट झोपवल. धीर गंभीरपणे तिने नवऱ्याकडे पाहिलं अन बोलायला सुरुवात केली.

' चिरंतर तुम्ही मला एवढ्या सर्व गोष्टी आधी का नाही सांगितल्या? एवढ्या वर्षात तुम्हाला कधीच सांगावस वाटलं नाही का? आज बाबांमुळे मला सर्व कळालं. गोष्ट सांगुन झाल्यावर् घरात अचानक दैत्य बघुन मला धडकीच भरली. नशिब हा चैतन्य आला म्हणुन. आपल्या सुयुध्दला काही झाल असत तर. थोडी तरी कल्पना द्यायला पाहिजे होती तुम्ही मला. मी एक अनाथ आहे पण मला तुमच्या सोबत लग्न करुन एक कुटुंब मिळालं. आई, बाबा, एक प्रेमळ नवरा, गोड मुलगा ह्या जगात मला आणखी काही नको. देवाची कृपा कि कोणाला काही झाल नाही. पण आपल्या एवढ्या वर्षांचा संसार असा अचानक सोडावा लागला. मग आता आपण कुठे राहणार? तुमच्या कामाच काय होणार?'

एवढ्या प्रश्नांचा भडीमार ऐकुन चिरंतर गप्पच राहिला. काया अचानक हताश होऊन रडायला लागली. चिरंतरने तिच्या खांद्यावर हात ठेवला व सांत्वन करत बोलला.

' मला माफ कर काया. मी तुला आधीच हे नाही सांगितले कारण तुला अस घाबरत घाबरत जगताना मला नव्हत बघायच. तुला जर कळाल असत तर सतत तु माझी आणि सुयुध्दची अशी काळजी करत राहिली असतीस. योग्य वेळी तुला हे सर्व कळणारच होत आणि कळलं सुध्दा. आपलं जगच जर नष्ट होणार असेल तर संसार कसा केला असता आपण. सुयुध्दच नशिब त्याला ह्या गोष्टींशी कधी न कधी सामना करायला लावणारच होत आज तो दिवस आलाच. त्रिनेत्री परिवाराच्या प्रत्येक योध्दाला त्याला सामोर जाव लागतच.'
हे ऐकुन कायाला अजुन रडु आलं. ती चिरंतरच्या खांद्यावर डोक ठेवून रडु लागली. त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला समजावुन सांगण्याचा आणखी एक प्रयत्न केला.

' काया रडु नकोस. आपल्याला काही होणार नाही. आपण जिथे राहत होतो ते घर आपल नाही तर गुरु विश्वेश्वरांच होत आणि तस ही जिथे आपण सर्वजण एकत्र असु तिथेच आपल घर आहे अस मला वाटत. सुयुध्द बदद्ल काळजी नको करुस तो आपल्यावर आलेल्या सर्व संकटांचा सामना करणार आणि ती संपवुन ही टाकेल. माझ्यावर विश्वास ठेव गुरु विश्वेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त तोच हे करु शकतो.'

कायाने रडु आवरत झोपलेल्या सुयुध्द कडे पाहिले व म्हणाली.
' अजुन किती लहान आहे तो. त्याला जमेल का हे सर्व?'

तिचे बोलणे ऐकुन इतका वेळ गप्प बसलेला अभिनव आजोबा पटकन बोलला.

' त्याच्यावर अशी शंका करनं योग्य नाही काया. आपल्याला वेळ आल्यावर कळेलच त्याला हे जमेल का नाही. पण त्याआधी आपण आश्रमात पोहचणं फार महत्वाच आहे. आणि तसाही खुप वेळ आहे आपल्याला पोहचायला. आपण सर्वांनी थोडी तरी विश्रांती आता घ्यायला हवी. सुयुध्द तर झोपला आपण पण झोपुयात. सकाळी आपल्याला आश्रमात जायला खुप चालाव लागणार आहे.'

काया फारच घाबरल्याने तिला झोप लागेल का हे माहित नव्हत. तिच्या मनात नाही ते विचार येऊ लागले. बराच वेळ विचार करता करता होडीच्या हिंदोळ्यात तिला आता पेंग येऊ लागली आणि ती कधी झोपुन गेली तिचं तिलाच कळले नाही.

चैतन्य सर्व ऐकुन ही गप्प वल्हव मारत होता. एक एक करुन आता सर्वच शांत झोपले. चैतन्यने सुयुध्द कडे पाहिले शांत झोपलेल्या सुयुध्दने कुस बदलुन चैतन्यकडे तोंड वळवले. चैतन्य त्याच्याकडे पाहत विचार करत पाहु लागला. गुरुंनी मला सांगितल्या प्रमाणे मी आजपर्यंत ह्यांच्या घरावर नजर ठेवली. पण कधीच मला सुयुध्द मधील अद्-भुत शक्ती चा आभास झाला नाही. गुरुंच्या वाणीवर शंका नाही पण हा एवढासा मुलगा खरचं कालाशिष्टला हरवु शकेल का? एवढा विचार करुन तो वल्हव मारत राहिला.

त्याने पुन्हा आजुबाजुला नजर फिरवली असता. रात्रीचा बराच काळोख पडला होता. आजुबाजुच्या झाडांची पाने हवेने हलत होती. थंड हवेचे झुळुक अधुन मधुन त्याला लागत होते. वल्हव मारत तो गावापासुन आता बराच लांब आला होता. नदीच्या प्रवाहात होडी हळुहळु पुढे सरकत जात होती. वर बघताच त्याला आकाशात चांदणं दिसलं. चंद्राच्या मंद प्रकाशात त्याला झाडांच्या सावल्या हलताना दिसत होत्या. त्यांना अजुन खुप अंतर कापुन जायच होत. तस त्याने वल्हव मारायचा वेग वाढवला.

पाण्यात वल्हव मारत मारत बराच वेळ निघुन गेला. चंद्र आता रात्रीच्या आकाशात मध्य ठिकाणी पोहचलेला. मध्य रात्री चंद्राच्या प्रकाशात चैतन्यला सगळं स्पष्ट दिसत होत. वल्हव मारुन मारुन त्याचे हात आता दुखु लागलेले. जरा वेळ थांबण्याचा विचार करत त्याने वल्हव थांबवुन होडीच्या दोन्ही बाजुला असलेल्या काट्यावर अडकवुन् ठेवले. इकडे तिकडे बघत त्याने होडी एका ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेतला. वल्हव मारत त्याने होडी एका बाजुच्या काठावर नेऊन थांबवली. उडी मारुन तो होडीतुन उतरला व होडीतल्या दोरीने त्याने जवळ्च्या एका झाडाला दोरीची गाठ बांधली. आळस झटकत त्याने नदीच पाणी ओंजळीतं घेत तोंडावर मारले. थोडसं बरं वाटताच उठुन त्याने सर्वांना एक नजर पाहिले. सगळे अजुन झोपलेलेच होते. मागे वळुन त्याने आजुबाजुच्या झाडांवर नजर टाकली. पण कुठेही त्याला वस्ती किंवा फळांचे झाड दिसले नाही. जवळच्याच एका झाडावर त्याला घुबड आवाज करताना दिसलं. अचानक त्याला कोणी चालत जवळ येतानाचा आवाज येऊ लागला. क्षणभरासाठी त्याने विचार केला एवढ्या रात्री कोण असेल? तसा तो झाडाच्या आडोशाला टेकुन कानोसा घेऊ लागला. आवाज आता त्यांच्या जवळ येऊ लागला होता कोणीतरी ढमढम आवाज करत जोरात पाय आपटत त्यांच्या दिशेने येत होते. तो पटकन आपली काठी घ्यायला होडीकडे धावला. काठी उचलून तो पटकन वळला. त्याने झोपलेल्या चिरंतर ला हाक मारली. हाक ऐकताच चिरंतर पटकन उठला. त्याची हाक ऐकुन अभिनव आजोबा आणि बाकीचे सर्व ही आता उठलेले. चैतन्य सगळी कडे नजर फिरवत बोलला.

' चिरंतर मी थोड्या विश्रांतीसाठी म्हणुन होडी काठावर आणली आहे. पण इथे थांबणे मला योग्य वाटत नाही. कोणीतरी आपला मागं घेत आहे. होडी थांबवताच मला इथे कोणी चालत येण्याचा आवाज आला आणि माझ्या अंदाजानुसार इथे जवळपास कोणतीही वस्ती नाही. आपल्याला सावध रहायला हवं.'

इतक बोलुन संपवताच अचानक त्याला उग्र वास येऊ लागला. तो परिसर घाणेरड्या वासाने न्हाऊन निघाला होता. अचानक एक जोराचा आवाज त्यांना ऐकु आला. पाय आपटत कोणी त्यांच्या जवळ येत होते. समोर एक झाड अचानक खाली पडल. तसा त्यांना झाड पाडणारा उंच दानव दिसला. पण या दानवाचं डोक झाडांच्या वर कुठेतरी लपलं होत. उंच उंच झाड त्याच्या तुलनेने फारच छोटी वाटत होती. त्याच्या चालण्याने जमिन हादरत होती. तो जिथे जिथे पाय टाकत येई तिथे एक मोठा खड्डा पडत होता. हे बघुन चैतन्य मागे सरकला. त्याने पटकन होडीची दोरी झाडापासुन सोडवण्याचा प्रयत्न चालु केला. चिरंतर होडीतुन खाली उतरला. चैतन्य दोरीची गाठ सोडतो न सोडतो तोवर त्याला त्या दानवाने उचलुन लांब फेकले. चैतन्य हवेतच उडत जाऊन एका झाडाला धडकला आणि जागीच बेशुद्ध पडला. सुयुध्दने या पुर्वी कधीच इतका मोठा दानव पाहिला नव्हता. त्याला भितीने कापरं फुटली चैतन्यला फेकुन दिल्यावर त्यांना ह्या भयानक दानवा पासुन कोण वाचवणार होत. त्या दानवाने चिरंतर च्या दिशेने हात फेरत त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. काया जोरात किंचाळली. पण चिरंतर त्याच्या हातात सापडला नाही. पटकन त्याने बाजुला उडी मारली. दानव त्याच्या दुसऱ्या हातातला लाकडाचा ओंडका जमिनीवर फिरवु लागला. पण चिरंतर अगदी सहजपणे उडी मारत येणाऱ्या प्रत्येक वारा पासुन वाचु लागला. चिरंतर उभ्या असलेल्या ठिकाणी त्याने जोरात ओंडका आपटला. चिरंतरने पटकन बाजुला उडी मारली. पण उडी मारताच त्याला त्या विशाल दानवाच्या हाताने जकडले. त्याच्या मुठीत चिरंतर एखाद्या लहान बाहुली सारखा अडकला. त्याने बाहेर पडायचे अतोनात प्रयत्न केले पण एवढ्या सहजा सहजी त्याची सुटका होणे शक्य दिसत नव्हते. दानवाने आपल्या हातातला ओंडका खाली टाकत त्याने कायाला होडीतुन उचलले. तशी काया जोरजोरात ओरडु लागली. तिला ओरडताना पाहुन झाडामागुन एक एक करुन छोटे दैत्य बाहेर येऊ लागले. दैत्य सात आठ फुट उंच होते पण त्या विशाला दानवा समोर सगळे अगदीच लहान वाटत होते. प्रत्येकाच्या हातात एक एक हत्यार दिसत होत. चेहऱ्यावर क्रुर हास्य करत सगळे आता मोठ्या दानवाच्या पायाशी येऊन थांबले. सुयुध्द आपल्या आई वडिलांना अस पकडलेले बघुन खुप घाबरलेला. त्याला काय करावे सुचत नव्हते. अखेर त्याने हिम्मत करत पटकन होडीतुन बाहेर उडी टाकली. काहीही करून मला पप्पा मम्मीला सोडवाव लागणार असा विचार करत तो पुढे जाऊ लागला. तशी त्याची आज्जी मागून ओरडली.

' सुयुध्द बाळा नको जाऊस तिकडे. परत ये.'
मागे वळुन बघतो तोच त्याच्या आजोबांनी त्याच्या दिशेने एक लहान काठी फेकली त्याने लगेच ती पकडली आजोबा म्हणाले.

' सुयुध्द घाबरु नकोस. ही काठी वापर. पुर्ण श्रद्धा ठेवून महादेवाचे स्मरण कर आणि लढं त्यांच्याबरोबर.'

काठी हातात धरुन त्याने काठीला नमस्कार केला आणि डोळे बंद करुन मनापासुन महादेवाचे स्मरण करू लागला. इकडे त्या दैत्याने चिरंतरला ज्या हातात पकडलेले तो हात आवळायला सुरुवात केली. चिरंतर खुप मोठ्याने ओरडू लागला. काया किंचाळत त्याला आवाज देऊ लागली. दैत्याने कायाला हातातुन खाली आपटले. जोरात जमिनीवर पडताच ती बेशुद्ध झाली. सुयुध्दने डोळे उघडले. बघतो तर त्याची आई जमिनीवर बेशुद्ध पडली होती. त्याला राग येऊ लागला. त्याचे डोळे रागाने भरलेले त्याच नजरेने त्याने सर्व दैत्यांकडे पाहिले. त्याला आता राग अनावर झाला.
अचानक सुयुध्द पासुन एक प्रकाश पडु लागला. आजुबाजुचा परिसर आता त्या प्रकाशाने उजळुन निघाला होता. सुयुध्द चमकत होता एक वेगळ्या प्रकारचा सोनेरी प्रकाश त्याच्या शरीरातुन पडत होता. सुयुध्दने आपल्या हातातली काठी उचलुन समोर धरली. काठी रुपांतरीत होऊन तलवारीत बदलली. तसा सुयुध्द कायाच्या दिशेने धावला. जवळ उभ्या एका दैत्याने त्याच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. सुयुध्दने हातातल्या तलवारीने वार रोखत त्याला लांब फेकले. बाकिचे दैत्य जागेवरुन हलले. त्यातला एक पटकन सुयुध्दवर धावुन आला. सुयुध्दने सरळ तलवार त्याच्या पोटात घुसवली. तलवार लागताच दैत्य राख झाला. त्याला पाहुन दैत्य घाबरुन मागे सरकले. सुयुध्द पळत काया जवळ पोहचला व तिच्या कडे पाहिले. तिच्या डोक्यातुन घळाघळा रक्त वाहत होते. आता त्याच्या रागाला सिमा उरली नव्हती. त्याने धावत जाऊन मोठ्या दानवाच्या पायात तलवार घुसवली. तलवार घुसताच दानव मोठ्याने ओरडला. त्याचे ओरडने असे होते जसे ढग गडगडत असावे. त्याने हातात पकडलेल्या चिरंतरला सोडुन दिले. पायात घुसलेली तलवार बाहेर काढत तलवारी सहीत त्याने सुयुध्दला लांब फेकले. पण सुयुध्द पडला नाही तो हवेत तरंगत उडु लागला होता. रागच्या भरात सुयुध्दला आपण उडत आहोत हे कळलेच नाही. उडतच तो दानवाच्या डोक्यावर जाऊन बसला. त्याने तलवार दानवाच्या डोक्यात घुसवली. तसा तो महाकाय दानव खाली कोसळला. त्याला कोसळताना पाहुन सगळे दैत्य सैरा वैरा पळु लागले. दानवाच्या डोक्यातली तलवार काढुन सुयुध्दने पळत असलेल्या दोन दैत्यांना एका वारात राख केले. ऊरलेले दैत्य बरेच लांब पळुन गेले होते. त्यांना बघतच सुयुध्द पळत पहीले काया जवळ गेला. तिच्या जवळ वाकुन तो तिला उठवण्याचा प्रयत्न करु लागला. पण ती काही उठत नव्हती. सुयुध्दने हातातली तलवार बाजुला ठेवली. त्याच्या पासुन अजुनही सोनेरी प्रकाश पडत होता. त्याने आज्जीकडे बघत तिला बोलावले.

' आज्जी लवकर इकडे ये. बघ ना मम्मी उठत नाही.'

आज्जी सर्व बघुन थक्क झाली होती. त्याची हाक ऐकताच ती होडीतुन उतरुन धावत त्याच्या जवळ गेली. तिच्या मागोमाग अभिनव आजोबा पण होडीतुन उतरला. आवाजाचा माग घेत तो जवळ इव्हळत पडलेल्या चिरंतर कडे गेला. त्याने चिरंतरला विचारले.
' फार लागलेय का रे तुला उठता येईल का?'

चिरंतरने म्हाताऱ्याला म्हटल.
' बाबा मी ठिक आहे. तुम्ही पहिले कायाला बघा काय झालंय?'
तसा म्हातारा पटकन उठला आणि सुयुध्दच्या आवजाच्या दिशेने वळला त्याने सुयुध्दला आवाज दिला.
' सुयुध्द…. बाळा इकडे ये… मला काया पर्यन्त घेऊन चल. '

सुयुध्द काया जवळुन उठला आणि आजोबाला घेऊन आई पर्यंत नेले. म्हाताऱ्याने सुनैनाला विचारले.
' काय झालय तिला कुठ लागलय का तिला. ' आज्जी रडतच बोलली.

' डोक्याला मार लागलाय तिच्या. रक्त वाहतय घळाघळा. बेशुद्ध आहे ती.'

म्हाताऱ्याने लांब श्वास टाकत तिला म्हंटलं.
' हे बघ सुनैना तिच्या जखमेवर लगेच काही तरी बांध. जास्त रक्त जायला नको तिच. मी चैतन्य कुठे आहे ते बघतो.'

त्याने सुयुध्दला जवळ बोलावलं आणि म्हंटला.
' बाळा चैतन्य कुठे दिसतोय का ते बघ. त्यालाही मार लागला असेल. '

सुयुध्द विसरलाच होता कि चैतन्यला दानवाने फेकुन दिलं होत. त्याने पटकन सगळीकडे नजर फिरवली. लांब एका झाडा खाली चैतन्य पडलेला त्याला दिसला. तसा सुयुध्द बाबांना बोलला.

' तो बघा. पण तो हलत नाही. चला पटकन आपण त्याला बघु.'

म्हाताऱ्याला हाताला पकडुन त्याने पहिलं चिरंतर जवळ नेले. तो आता उठुन बसला होता. त्याला उचलुन म्हाताऱ्याने खांद्याचा आधार देत त्याला उभे केले. तिघे जण आता चैतन्य च्या दिशेने चालु लागले. जवळ जातच सुयुध्द थांबला.
अभिनव आजोबा म्हणाला.

' सुयुध्द बघ जरा त्याला कुठ काही लागल आहे का? '
सुयुध्दने बघितले पण कुठ दुखापत झाल्याचे त्याला दिसलं नाही.

' बाबा अस बघुन तर वाटत नाही कि काही लागल असेल पण तो बेशुद्ध आहे.' सुयुध्द बोलला.

म्हातारा व चिरंतर त्याच्या जवळ खाली बसले आणि त्याला उचलुन झाडाला टेकवुन बसवले. म्हातारा सुयुध्दला बोलला.

'बाळा जा पटकन पाणी आण.'

'पण कशात आणु बाबा. '

म्हाताऱ्याने चाचपत चैतन्य च्या झोळीत हात घातला त्याला एक वाडग हाताला लागलं. ते बाहेर काढून त्याने सुयुध्दला दिले. सुयुध्द पळत नदीकडे गेला काठावर येऊन त्याने वाडग्यात पाणी भरले आणि परत चैतन्य पडलेल्या ठिकाणी गेला. वाडगा त्याने बाबां समोर धरला.

'हे घ्या बाबा'
म्हाताऱ्याने वाडगं हातात घेतल आणि पाण्याचे शिंतोडे चैतन्यच्या तोंडावर मारले. शिंतोडे मारताच चैतन्य शुध्दीवर आला. डोळे उघडत त्याने आपल्या समोर उभ्या सुयुध्दला पाहिले. सुयुध्द एखाद्या तेजस्वी दिव्यासारखा सोनेरी प्रकाशाने चमकत होता. त्याला बघुन विश्वासच नाही बसला. डोळे चोळत त्याने परत पाहिले पण सुयुध्द तसाच चमकताना दिसला. त्याने हडबडुन आपण मेलो तर नाहीत ह्याची खात्री केली. नाही तो मेला नव्हता. मग असा चमत्कार कसा घडला. असा विचार आला. तो काहीच बोलत नाही हे कळताच म्हाताऱ्याने पुन्हा एकदा पाण्याचे शिंतोडे चैतन्यच्या तोंडावर मारले. तसा चैतन्य बोलला.

'अहो त्रिनेत्री मी शुध्दीवर आलोय. मी ठिक आहे. ते दैत्य कुठे गेले. '
बोलता बोलता सुयुध्द वरुन नजर हटवत त्याने आजुबाजुला पाहिले. बघतो तर त्याचे डोळे उघडेचे उघडेच राहीले. एक महाकाय दानव जमिनीवर पडलेला. बाजुला त्याला काया जमिनीवर पडलेली दिसली. कायाला पाहताच तो बोलला.

' काया वहिनींना काय झाल? लागल आहे का त्यांना.'

'हो … तिच्या डोक्याला मार लागलाय. तुझ्याकडे काही औषध आहे का? ' आजोबा म्हणाला.

'हो आहे माझ्या झोळीत पण तात्पुरता उपचार होईल. त्यांचा पुर्ण योग्य उपचार आश्रमातच करता येईल.'
चैतन्य बोलत उठला. त्याच्या मागोमाग आता आजोबा आणि चिरंतर दोघेही उठले. ते कायाच्या दिशेने चालु लागले. एवढ्या वेळात आज्जीने तिच्या साडीची चिंधी फाडुन कायाच्या डोक़्याला बांधली होती. तिने वळुन सगळ्यांना येताना पाहिले तशी ती चिंताग्रस्त चेहरा करत बोलली.

' हे बघा तिचं फारच रक्त वाया गेले आहे. लवकरात लवकर जर तिच्यावर उपचार नाही झाला तर तिच्या जिवाला धोका होईल.'

हे ऐकताच चिरंतर काया जवळ खाली बसला. त्याने तिचे डोके आपल्या मांडीवर घेतले अन चैतन्यला म्हणाला.

' चैतन्य काहीही कर पण लवकर कर. तिला काही झाल नाही पाहीजे. '
चैतन्यने एक नजर काया कडे बघत सुयुध्दला जवळ खेचले. व बोलला.
' सुयुध्द तु मी सांगेन तस करशील.'

हे ऐकुन सुयुध्द पटकन उत्तरला. ' हो '

चैतन्य सुयुध्दला जवळ घेत त्याच्या कानात काही बोलला. तसा सुयुध्द चमकला आणि पटकन आपल्या आई जवळ बसला. तिच्या डोक्याला बांधलेली पट्टी त्याने काढली.
आपले हात कायाच्या जखमेवर धरले आणि मंत्र बोलु लागला. त्याच्या हातातुन निघणारी सोनेरी चमक आता कायाच्या डोक्यावरील घाव भरत होती. बघता बघता कायाचा घाव नाहीसा झाला. तिचा चेहरा जो पांढरा पडला होता हळुहळु पूर्ववत होऊ लागला. पण तिला शुध्द आली नव्हती. तिचा घाव पुर्ण भरताच. चैतन्यने त्याला थांबायला सांगितले. सुयुध्द थांबला आणि प्रथमच त्याचे लक्ष आपल्या चमकत्या अंगाकडे गेले. एवढा वेळ त्याचे लक्षच गेल नव्हते. रागाच्या भरात त्याने उडुन त्या विशाल दानवाला सुध्दा मारले होते. तो कस काय उडला त्याला प्रश्न पडला पण त्याकडे पुन्हा दुर्लक्ष करत त्याने आपल्या आईला पाहीले. आज्जी ने कायाच्या डोक्यावर हात फिरवत बघितले जखम झालीच नसावी असे दिसत होते पण काया अजुन बेशुद्धच होती. तिला पाहुन सुनैना आज्जी बोलली.

' ती शुध्दीवर का नाही आली?' चैतन्य लगेच बोलला.

'आज्जी हा तात्पुरता उपाय आहे. त्याना पुर्ण उपचार हे आश्रमातच भेटु शकतात आणि इथे जास्त वेळ थांबणे खुप धोक्याचे आहे.'

हे ऐकताच चिरंतर उठला. सुयुध्दने जवळच ठेवलेली तलवार उचलली. चिरंतरने खाली पडलेल्या कायाला आपल्या हातात उचलून घेतलं सुयुध्द त्याला होडी पर्यन्त घेऊन गेला. चैतन्य होडीत चढला आणि कायाला अलगद होडीत एका बाजुला झोपवले. चिरंतर त्याच्या मागे चढून काया जवळ बसला. सुयुध्दने आज्जीला होडीत बसायला मदत केली. आजोबा सुध्दा चढले.

सुयुध्दला पुन्हा एकदा उडायचे मनात आले. सुयुध्दने हातातल्या तलवारीने झाडाची दोरी कापली. होडी काठापासून दूर जाऊ लागली. तसा सुयुध्द उडुन होडीवर अलगद जाऊन उभा राहीला. चैतन्य त्याला आश्चर्याने बघतच राहीला. त्याला आता विश्वास बसला होता कि सुयुध्दच तो आहे जो कालाशिष्टला संपवु शकतो. तो एवढ्या बारीक वयात ते करु शकत होता जे कोणीच करु शकले नव्हते. सुयुध्दच्या देहातुन चैतन्यला एका खुप मोठ्या अद्-भूत दिव्य शक्तीचा आभास होत होता. होडी नदीच्या प्रवाहात जाऊ लागली चैतन्य ने पुन्हा वल्हव मारायला सुरुवात केली आणि त्यांचा प्रवास परत सुरु झाला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वेल. तुम्ही सांगितल्या प्रमाणे खुप बदलं केले. आपल्या अमुल्य सल्ल्या बद्दल शतश: आभार. तुम्ही मला shilwantsuyog10@gmail.com वर किंवा प्रतिसादात बदल सांगु शकता.