सिंडी

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 07:12

सिंडी
एकदा काय झाले , सिंडी पडली आजारी . सिंडी हि अनुश्री ची लाडकी अल्सेचिअन कुत्री . फार अवखळ होती . नुसती मस्ती करण्यात हुशार . फिरायला नेले कि इकडे पळू कि तिकडे पळू असे तिला व्हायचे .
एके दिवशी रस्त्यावर कावळ्याने आणून टाकलेले काहीतरी तिने खाल्ले व पडली कि ती आजारी. तिच्या बहिणीने म्हणजेच अनुश्री दीदीने तिला नेले हॉस्पिटल मद्धे .
डॉक्टरांनी तिला तपासले व एक दिवस हॉस्पिटल मद्धे ठेवायला लागेल असे सांगितले . डॉक्टर्स सिंडीची छान काळजी घेणार हे माहित असल्यामुळे दीदीने सिंडीला हॉस्पिटल मध्दे दाखल केले .
ते हॉस्पिटल मुंबईत परळ येथे आहे . त्याला बैल घोडा हॉस्पिटल असेही म्हंटले जाते . ते खास जनावारांचेच हॉस्पिटल आहे. तेथे सर्व प्रकारच्या जनावरांवर उपचार केले जातात . सिंडीला तेथे दाखल केल्यावर तिने पहिले कि त्या हॉस्पिटल मद्धे नुसते कुत्री मांजरीच नाही तर गाई, बैल, घोडे , बकरी , डुकर , गाढव व माकड सुद्धा होती. शिवाय विविध प्रकारचे पक्षीही होते .
त्यामुळे सिंडी कुतूहलाने सर्वांकडे पाहू लागली . प्रत्येकाला काहीना काही झालेले . कुणाचा पाय मोडला होता तर कोण आजारी होत. कोणी अशक्त तर कोणी खूप म्हतार झालेलं . काही जनावरांना कोणी वालीच नव्हत , म्हणून त्यांना तेथे ठेवलेलं.
सिंडीला कुत्र्यांच्या वार्ड मद्धे नेत असताना प्रत्येक पिंजर्यातील कुत्रा तिला जणू आपले दुखः सांगत होता. कोणी नुसतेच हाई म्हणत होते तर कोणी म्हणत होते कि," काय बघतेस सिंडी? अग रस्त्यावर धावलोना तेव्हा गाडी दिसलीच नाही आणि पाय मोडला माझा ." दुसरा कुत्रा म्हणाला ," माझे अंग खूप खाजवते म्हणून मला इथे ठेवले . तिसरा म्हणाला," बघतेस काय नुसती ? आलीस आहे तर ते दार उघड कि. मला जायचं माझ्या मालकाकडे . इथे मला अजिबात करमत नाही. "
कोणी मालकाच्या आठवणीने रडतोय तर कोणी दुखतंय म्हणून रडतोय. सिंडीला हे सर्व पाहून खूपच वाईट वाटल . ती मनात म्हणाली, मी माझ्या मालकाला पण असाच तर त्रास देते . पण माझा मालक व माझी दीदी तर सर्व विसरून माझे कित्ती कित्ती लाड करतात . मला कधीच रागे भरत नाही . पण मी करू तरी काय? मला मोकळे सोडले कि इकडे तिकडे खूप खेळू वाटते . लांब लांब धावू वाटते. रस्त्यावर पडलेले खावू वाटते. अश्या वेळेस रस्त्यावरून जाणार्या गाड्या दिसतच नाहीत इतकी मी मग्न होऊन जाते.
पण आता मी अशी चूक अजिबात करणार नाही. आपण दंगामस्ती केली तर आपल्यालाच किती त्रास होऊ शकतो हे मी आता नीट पाहिलंय . मी आता माझ्या मालकाच ऐकीन . ते सांगतील तस करीन . मग मला कधीच ती कडू औषध घ्यावी लागणार नाही व injection हि टोचून घ्यावे लागणार नाही.
दुसर्या दिवशी दीदीला बघताच सिंडीने दीदीला घट्ट मिठी मारत चाटले जणू मी परत कधीच मस्ती करणार नाही असे तर तिला नव्हते ना सांगायचे ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users