प्रवासाला निघाल्यावर वळण येणार अपघाती

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 June, 2016 - 15:24

विषारी-बिनविषारी ह्या तुझ्या ठरल्या तरी जाती
'न मागे दंशता पाणी '....मनुष्याची अशी ख्याती

बियाणे पेरल्यावरती फळांनी झाड़ लगडावे
मनाची एवढ़ीही राहिली नाही सुपिक माती

स्वतः तेवून जीवनभर घरादारास उजळवती
वयस्कर मंडळी घरची तुपामधल्या जुन्या वाती !

कितीही घाल टाके वा उसव अवघे कितीदाही
जमीनीवर नव्हे स्वर्गामधे विणलीत ही नाती !

मनाची कर तयारी जर शिखर गाठायचे आहे
प्रवासाला निघाल्यावर वळण येणार अपघाती

इथे गणगोत कोणाचे कुण्या कामास ना येती
म्हणाया भारतामध्ये हजारो नांदती जाती

तुझ्या विस्तीर्ण अवकाशी स्वतःला झोकल्यावरती
तुटावे की फिरावे भोवताली हे कुठे हाती ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या विस्तीर्ण अवकाशी स्वतःला झोकल्यावरती
तुटावे की फिरावे भोवताली हे कुठे हाती ?<<< वा वा

एकंदर गझल छान